ऐसी दिवाळी अंक - एक सिंहावलोकन

ऐसी अक्षरे ह्या संस्थळाने आजपर्यंत मराठी रसिकांसाठी गेली ६ वर्ष दिवाळी अंकांची मेजवानीच सादर केली आहे. ह्यात प्रतिथयश लेखकांनी सदाबहार विषयांवर विविधतेने नटलेली शेकडो पुष्प रसिकांसमोर पेश केली आहेत. दर वर्षी नवनवीन संकल्पनांचे नाविन्यपूर्ण सादरीकरण ही तर ऐसीची खासियत! त्यात पुन्हा चोखंदळ वाचकांच्या प्रतिक्रिया हे ऐसीचे आणखी एक वैशिष्टय. तर आता आपण एसीच्या गेल्या काही वर्षातील दिवाळी अंकांबद्दलची मराठी साहित्याच्या दृष्टीने समीक्षेच्या अंगाने होणारी वाटचाल पाहू.
.
- ह्या ऐसी दिवाळीसाठी माझ्यातर्फे इतकाच विनोद.
.
माझ्या ह्या लेखाचा मुख्य विषय म्हणजे ऐसीच्या सर्व दिवाळी अंकांचे सिहावलोकन करणे हा आहे.
आणि त्यासाठी ह्या लेखाला दिवाळी अंकातून वगळतो आहे, म्हणजे मला संपूर्णपणे तटस्थ सिंहावलोकन करता येईल.
शिवाय असे डिस्क्लेमर देऊन ठेवले की मग तुम्ही काहीही द्वारकानाथ संझगिरी टाईप शाईरूपी हागलात तरी चालतं.

पण एक मिनिट. रूढ मराठी भाषेत लिहितात तसं "रसिक वाचक" वगैरे चुत्या शब्दांत लिहिलं तर मजा काय? आपण एसीच्या दिवाळी अंकांची कट्टा-समीक्षा करू. म्हणजे टिपिकल कट्ट्यावरच्या भाषेत दिवाळी अंकांचा लेखाजोखा.
.
लंबर १.
सुरुवात करतो माझा लाडका अंक म्हणजे "२०१७ साक्षात पश्चात :श्रोडिंजरची मांजर बॉक्सात?" अशा अगडबंब नावाने प्रसिद्ध झालेलं जालीय बाड.
हा दिवाळी अंक एका फटक्यात पूर्ण संपवणारी व्यक्ती एक तर मानसिकदृष्ट्या अस्थिर असेल किंवा पुरोगामी तरी. किती काय लिहिलंय राव! आणि एक अक्षर कळेल तर शपथ! पुन्हा झोल कसा की हे लोक संपादकीय वगैरे लिहून असा फील आणतात की खरंच काहीतरी महत्त्वाचं लिहितायेत! म्हणजे संपादकीय वाचून पुढे बाकीचे लेख वाचाल तर वर आपल्यालाच स्वतः एक जालीय न्यूनगंड - की गड्या काहीतरी भरभक्कम लिहिलंय पण आपल्यालाच कळत नाही.
असे न्यूनगांडु बनू नका वाचकहो. अंक वाचायला खरोखरीच जड आहे.
.
उदा. हे वाक्य पहा (जरी परिच्छेद वाटत असला तरी वाक्यच आहे ते ) -
"एका अत्यंत ढोबळ आणि आदर्शवत (ideal type) अर्थानं Intellectuals६ म्हणजे विवेकी, ज्ञानी, सम्यकदर्शी, स्वार्थत्याग करण्याची (सामाजिक, आर्थिक, बौद्धिक, नैतिक) पात्रता असलेले, दूरदर्शी, त्यामुळेच पथदर्शक किंवा मुक्तीचा रस्ता दाखवण्याची पात्रता आणि ऐतिहासिक जबाबदारी असलेले असे बिनीचे शिलेदार (vanguard). तर 'लोक' म्हणजे सामान्यतः अज्ञानाच्या अंधारात चाचपडणारे, षड्रिपुंनी ग्रस्त, सामाजिक-आर्थिक-राजकीय-सांस्कृतिक बंधनात बद्ध असलेले, रोजच्या जगण्याची भ्रांत असलेले आणि त्या रहाटगाडग्यात मशगुल होणारे, मुक्तीची आस असलेले परंतु तिचे रस्ते स्वतःहून माहीत नसणारे, तिची भाषा (discourse) स्वतः घडवू न शकणारे, त्यामुळे एका ऐतिहासिक अर्थाने परावलंबी. आपल्या रोजच्या बोलण्यात, विचारात, सामाजिक अर्थनिर्णयनात ह्या आदर्शवत रचितांच्या वेगवेगळ्या ऐतिहासिक प्रतिमा (versions or imaginaries) डोकावत असतात."
.
या खुदा, उठा ले.
एवढं वाचलं तरी बद्धकोष्ठ व्हावा असा हा लेख. लेखकाला काही म्हणायचं असावं असा बेनिफिट ऑफ डॉट देणं कठीण.
मांजराने कीबोर्ड बडवला तरी वाचनीय काही उमटू शकेल इतका अ-वाचनीय लेख आहे हा. संपूर्ण लेख वाचून आपले डोळे काढून हातात दिले तरच लेख वाचल्यानंतरची हतबल भावना कदाचित कुणाला उमटू शकेल. आणि त्याहून भारी म्हणजे खाली काही प्रतिक्रिया - की म्हणे लेख उत्तम आहे. काही लोकांनी शालजोडीतील ठेवून दिलीये की "तीनदा वाचल्यावर कळला" वगैरे. कमाल करते हो प्रजापती पांडे.
.
जाऊ दे. आमचं लेखकाला इतकंच सांगणं आहे की दुसरा काही तरी व्यवसाय/छंद बघा ज्यात तुमचं मन रमेल, तुम्ही पूर्ण वेळ देऊ शकाल असा छंद. म्हणजे असलं काहीतरी परत लिहायला तुम्हाला वेळच मिळणार नाही. नमस्ते!
.
ह्याच लेखाची जुळी भावंडं शोभतील असे किचकट आणि मुख्य म्हणजे अति-पकाऊ लेख ह्या दिवाळी अंकात जागोजाग सापडतील.
अंधाधून चित्रपटाचा नायक म्हणतो त्याप्रमाणे - "बिल्ली को टट्टी करने के लिये" वापरता यावेत ह्या(च) वाचनीयतेचे.
वानगीदाखल केवळ शीर्षके पहा
‘लेट कॅपिटलिझम’मधला सिनेमा - उलरिक जायडल
धुरिणत्वाच्या छायेतील विखुरलेली सत्ये ( माझ्या मते हे शीर्षक अ-वाचनीयतेत लंबर वन.)
ऑडन : संक्रमण, प्रत्यय आणि चार कविता
.
ह्या अंकाची एक सपशेल भीषणता म्हणजे विश्वातल्या प्रत्येक गोष्टीचा post Truthशी जोडलेला संबंध. आपण आपलंच सर्टिफिकेट देऊन टाकायचं, मोदीजी म्हणतात तसं.
सकाळी गाडी उशीरा आली, आज दूध नसलं , कांदा महागलाय!, आसाममध्ये पण दंगल झाली, पण कॅल्क्युलेटर कशाला पाढे पाठ हवेत, कंडोम नको नुसताच हवाय, बॉस छुट्टा नही है उतरो यार, आज पण दोडका?, वरची टाकी गळतेय, पगार एवढा पण टाय केवढा, नकोय मला चहा -
ह्या आणि असल्या वाक्यांनासुद्धा post truth करून टाकलं ह्या अंकाने. चलो ठीक है.
.
लंबर २
त्यानंतर वळूया "पॉर्न ओके प्लीज" अर्थात संपूर्ण केएलपीडी.

जर तुम्हाला कुणी म्हणालं की चल तुला चॉकलेटच्या फॅक्टरीत घेऊन जातो, तर मनात एक अपेक्षा असणं सहाजिक आहे - एक तरी चॉकलेट चाखायला मिळेल. पण अख्खी फॅक्टरी फिरून आल्यावर तुम्हाला चॉकलेट कसं करतात, ते आरोग्याला हानीकारक आहे की नाही, अनेक थोर लोकांना चॉकलेट आवडतं तरी ते कसे धडधाकट आहेत, चॉकलेटचं रासायनिक पृथकरण, त्याचे आर्थिक, सामाजिक, शारीरिक, वैश्विक इत्यादी पैलू , माननीय लेखकांची चॉकलेटबद्दलची मतं - एवढंच कळलं आणि प्रत्यक्ष चॉकलेटचा "च" सुद्धा मिळाला नाही तर तुम्हाला काय वाटेल?
खडे लंड पे धोका अर्थात KLPD.
.
हा अंक हाती आल्यानंतर तसंच काहीसं वाटलं मला.
.
आणि संपादकीय किंवा ऋणनिर्देश वाचून अपेक्षा भलत्याच "उंचावल्या होत्या". म्हणजे स्पष्ट भाषेत सांगायचं तर उत्तम शृंगारिक साहित्य वाचायला मिळणार अशी माझी काहीशी रास्त अपेक्षा होती. मी तर बरेच दिवस थांबलो की पुरेसा माल गोळा होईल मग होऊन जाऊ दे. कित्येक दिवस अंक वाचायचं टाळून शेवटी रात्री बेडवर "तयार" होऊन बसलो राव.
.
आणि वाचायला लागलो तर हे! पॉर्न सोडून अंकात सगळं काही होतं. म्हणजे पॉर्न यंव आणि त्यंव , त्याचे परिणाम, कसं कुठे कशाला वगैरे.
पण भेंडी पॉर्न कुठेय? मग अंकाची चित्र तरी प्रक्षोभक टाकू नका ना. संपादकीयावर एका सुंदरीचे क्लीवेज दाखवून नंतर कुछ भी नाही?
कुठे फेडाल हे पाप?
.
गेलाबाजार १०००० शब्दांत किमान १०० वेळा तरी नितंब, स्तन , कुचद्वय, योनी, शिश्न, स्तनभार, वीर्य इत्यादी नेहेमीचे यशस्वी कलाकार असावेत ही अपेक्षा काय गैर आहे का? पिवळी पुस्तक लिहा असं म्हणणं नाय पण निदान "तिच्या टंच उरोजाकडे आणि चंट शरीराकडे पाहून जनावरासारख्या अनावर झालेल्या भावना आता त्याच्या धोतराच्या मावत नव्हत्या ... " टाईप सूचक लिखाण तरी असावं की नाही ?
.
नाही, अंकात काहीच दम नाही असं माझं मुळीच म्हणणं नाही. इथे काही कथा, तिथे काही गोष्टींनी मन चाळवलं जरूर, पण नंतर खडे बोचो लागले.
उदा. हा एक वानगीदाखल लेख - विषय सर्वथा...! (निमित्त : 'पु पु पिठातली उर्फ भाषाभीरूची गोष्ट')
आता ह्या लेखकूंनी एक कथा लिहिली. की कोणी एक मनुष्य सदैव लज्जीत असतो आणि पिठाची एक पुच्ची तयार करतो. सुंदर. कथा बरी होती.
पण मग नंतर हा लेखही अडकवला की हि कथा कशी सुचली वगैरे. अरे लेको काय हे? उद्या पॉर्न व्हिडीओ बघून पुढचा व्हिडीओ जर "पॉर्नच्या शूटिंगची कथा" म्हणून दाखवला तर काय लोक घंटा उत्सुक असणार? स्वतःचीच पोस्ट लाईक करण्यात आणि ह्यात काय फरक मग?
.
"मी नाही त्यांतला..." नामक एका ललितात मासा नावाच्या लेखकांनी संकल्पनेला पूर्ण न्याय द्यायचा प्रयत्न केला खरा, पण तेही मध्यमवर्गीय पॉर्नमधेच अडकले. दादा कोंडकेसारखे द्वयर्थी संवाद सोडून सरळ मुद्द्यावर आले असते तर ... मासाजी कृपया मला व्यनी करा, मी नक्की तुम्हाला टिप्स देईन. मराठी पॉर्नच्या तुमच्याकडून अपेक्षा आहेत हो. असो.
.
एका इच्छुक मित्राला मी हा अंक येणारे म्हणून सांगितलेलं. "मचाक"चा आजीवन सभासद असलेला तो येरू अख्खा आठवडा चातकासारखी वाट पाहात होता.
त्याने अंक आल्यानंतर दोन दिवसांनी फोन केला -
.
"भेन्चोद काय हे? हा काय दिवाळी अंकय? आणि तो पण पॉर्नवर? एक बूब नाय साधा अख्ख्या अंकात त्या. आणि वाचायला गेलो तर कायतरी संकल्पना, विस्तार, प्रेरणा असली चोदूगिरी आत. आबे नाय लीता येत तर नका ना लिहू- पण वर आवाज तरी नका करू कि आपन पॉर्न अंक काढला वगैरे. असली चुत्यागिरी भेन्चोद. आपल्या मचाकवर बघ - फॉरेनची गोष्ट टाकलीये आणि २ हिरो एकीलाच घेतात डायरेक, फोटोबिटो टाकलेत. आपण वाचायला आलो की मोठे लोक कायतरी साहित्यिक वगैरे लिहितील तर हे सालं असलं. पिक्चर बघायला गेलो आणि निघाली डाकुमेंटरी. भेन्चोद वाईट फसवलं आपल्याला तू"
.
इतकं सगळं बोलून ठेवून दिला. खरं तर ही अस्सल पॉर्न-प्रतिक्रिया आहे पण ह्या अंकात ती छापली गेली असती "अंकात पोर्नविषयक कल्पनेचा विस्तार तितका झाला नाही" अशा बुळबुळीत भाषेत. ह्या अंकाचं नाव खरं तर "मराठी मध्यमवर्गीयांच्या पोर्नविषयक आवाक्याची यादी" असं द्यायला हवं होतं. ते दुरुस्त करता येईल काय? धन्यवाद.
.

लंबर ३.
आता आपण (नाईलाजाने ) वळू २०१५ च्या "नव्वदोत्तरी" नामक दिवाळी अंकाकडे.
रेडी? स्टेडी ? चला.
मला अशी प्रामाणिक शंका आहे की एसीच्या संपादकांना क्लिष्ट आणि बोजड भाषेचं काहीतरी गूढ आकर्षण आहे.
किंवा काही मातबर लेखकानी "नव्वदोत्तरी" असं म्हटल्यावर काहीही वाट्टेल ते फेकून लेख पाठवले आणि संपादकांनीही "छानच असतील" म्हणून छापले.
.
उदा. हा राजीव साने नामक सत्पुरुशांचा "संप्राप्ते नैच्छकलहे : दर्शनविद्येला ध्वस्त करू पाहणारे प्रवाह" नामक लेख. शीर्षकाचा अर्थ कळाला?
आणि हे एक वाक्य - " माझ्या मते जीवनदृष्टीला सुयोग्य अशी सद्वस्तुस्वरूपमीमांसा पुरवणे आणि जीवनदृष्टीला स्थैर्य व धैर्य मिळवून देणे हेच तत्त्वज्ञानाचे खरे कार्य आहे. विशेषतः मूल्यात्मक व ब्रीदात्मक प्रश्नात खुलासे हा मुद्दाच नसून समर्थने हा मुद्दा असतो. तुम्ही 'कारणमीमांसा' करत नसून 'प्रयोजनमीमांसा' करीत असता."
अगं बाबौ!
.
एखादी गांजा पार्टी संपल्यावर ४-५ लोकांनी साईट उघडून "वा वा मस्त"वगैरे लिहिलंय पण एकूण जमालगोटाच आहे लेख. तीच गत इतर काही ठिकाणी आहे. क्लिष्टपणा आणि दुर्बोधता हे नव्वदोत्तरीचं वैशिष्ट्य माय फूट.
.
पण ते ठीके. मुख्य मुद्दा असा की नव्वदोत्तरी म्हणून लेखात जे काही आहे ,ते इतकं भुसभुशीत का बरं? इतकं अमूर्त आणि ठिसूळ?
.
अरे मग गोविंदा, इंडिपॉप, झी टीव्ही, आज तक, चेतन भगत, इंटरनेट, सचिन तेंडुलकर, ब्रायन अॅडम्स, ब्रिटनी स्पिअर्स, हॅरी पॉटर, यूट्यूब, मॅच फिक्सिंग, कारगिल युद्ध, ९/११, ओसामा ते ओबामा व्हाया बुश, मारुती ते बी.एम.डब्ल्यू , रिलायन्स, मोबाईल फोन, कॉम्प्युटर ते टेब्लेट आणि इतर बंधू, Apple नावाचा ब्रँड, पुण्याचं बदलेलं पुणेपण, शिवसेना नावाचा ठेंगू राक्षस, बाबरी ते राधाबाई चाळ, १९९३ चे बॉम्बस्फोट, सत्तेच्या शोधात भाजपा आणि सात बुटके, वाय टू के हे भारताला लाभलेलं अकस्मात डबोलं, इन्फोसिस नावाचं मध्यमवर्गीय तीर्थक्षेत्र, मॅचमेकिंगचं बदलेले रूप असे आणि हे सगळे विषय गेले कुठे? की आम्ही जगलो ते नवदोत्तर ह्या महान लोकांनी अनुभवलंच नाही?
कदाचित त्यांच्या परिप्रेक्ष्यात ते ज्या अमूर्त स्वरूपात आलं त्याची आशयघनता फार तीव्र असल्याने त्यांना ह्या मूर्त घटनांचा परामर्श घ्यावासा वाटला नसेल.
चालता है.
.
कुंडलकरांनी ह्यातलं बरंच पकडायचा प्रयत्न केलाय आणि थँक्स यार.
.
"मन्या जोशी" नामक मनुष्यास आमचे स्पेशल धन्यवाद. त्यांच्या कविता वाचून खूप बरं वाटलं. कुणीही कवी म्हणवून घेतो, त्यामुळे सगळ्यांना शिरेसली घ्यायची गरज नाही हे कळलं. थँक्यू जोशी.
.
ह्या अंकाचं अजून एक साईड वैशिष्टय म्हणजे पाहुण्यांकडून काम करवून घेतलेलं आहे. घराचे लेखक बहुतेक आयड्या ऐकून चीप पडले असावेत. त्यामुळे away match प्रमाणे पाहुणे लेखक येऊन खेळून गेलेत आणि प्रेक्षक बिचारे इतके तारे बघून चकित! एक दोन घराच्या लोकांचे लेख बघून मला तर ढवळून आलं पोटात. (नव्वदोत्तर असल्याने असं म्हटलं नाहीतर डोळ्यात पाणी आले असंच म्हणणार होतो.)
.
.

उत्तेजनार्थ
२०१४/२०१३/२०१२ चे अंक मला तसे गरीब बिचारे वाटले. घरचं कार्य समजून लोकांनी मजबूत काम केल्याचं दिसतंय. आणि लिहिलंय ही बर्याच जणांनी.
लेखात, कवितेत, कथांमध्ये उणेअधिक असेलही, पण प्रयत्न समजला हेही नसे थोडके!
आता १४चा अंक "चळवळ विषेशांक" होता त्यातखुस्पटं काढता येतीलही पण असो.
.
२०१८- यंदाचं काय
तर ह्या विषेशांकांचे सखोल विश्लेषण करून मी ह्या वर्षीच्या दिवाळी अंकाबद्दल काही निष्कर्ष काढले आहेत.
हा ऐसीचा "विनोद" विशेषांक आहे. आपण अजाण वाचक त्याचा अर्थ "विनोदी कथा/लेख/कविता असलेला अंक" असा चुकीचा घेऊ.
ऐसीचा इतिहास पाहिला तर "विनोद" विशेषांक म्हणजे "विनोदाबद्दल प्रतिथयश लेखकांचं आकलन/ स्मरण/ जलन इ. इ." असा अर्थ अभिप्रेत आहे.
.
त्यातले काही लेख साधारण असे असतील असा आमचा होरा आहे -

  • विनोद : फ्रेंच साहित्यातील [एक रॅन्डम लेखक निवडा ] सतरा उतारे
  • मराठी साहित्यातील विनोदाचे स्थान: कालसापेक्ष गतिमानतेतली हनुमान उडी
  • राजकारण्यांना विनोद न आवडण्याची कारणं
  • मराठीतील विनोदी साहित्य जागतिक दर्जाचे का नाही? प्रा. [माहीत नसलेले नाव] ह्यांची प्रकट मुलाखत
  • तीन विनोदी कथा (खर्डा)
  • नेहेमीची भावनिक आणि रटाळ "मराठी विनोदाचा बादशहा" छाप वगळून पुलंबद्दल एक लेख पुलंवर २०००उत्तरी कॉमेंटरी.

.
शिवाय ऑलरेडी वापरलेल्या लेखकांचे ५ ते ८ लेख/कथा पुनर्प्रकाशित केले जातील. (मानधनाचा प्रश्न मिटला.)
आजकालच्या काही लेखकांचे लेखन विनोदी ह्या सदरात खपवले जाईल. (उदा. पंकज भोसले. परीघ पुरेसा विस्तारला तर त्यांच्या कथा विनोदी, गूढ, ललित किंवा पशुपक्षी संगोपन ह्यापैकी कुठल्याही लेबलाखाली वापरता येतात.)
.
ह्या अंकात काय नसेल - (हा अंदाज चुकावा अशी आमची फार्फार्फार्फार इच्छा आहे बाय गॉड. )
विनोदी लेखन.
.
मराठीतलया सांप्रतकालीन एकमेव विनोदी कवींचे (नाव सांगत नाही, त्यांना प्रसिद्धी आवडत नाही) शब्द उधार घ्यायचे झाले तर -
.
शाळेमध्ये कॉलेजमध्ये
लेक्चर केले बंक
मेंदूमध्ये घालत होतो
नवदोत्तरी जंक

पॉर्न बघून फुगा फुटला
झालो पुरते खंक
श्रोडिंजरची मांजर करते
विंचवासारखा डंख

क्रेडिट कार्डवर नसतो राजा
सगळे असतात रंक
इतकं लिहिलं आम्ही
आता येऊ द्या की अंक!

field_vote: 
4.666665
Your rating: None Average: 4.7 (3 votes)

प्रतिक्रिया

अस्वल आलं. ऐसीचे दिवाळी अंक हे मधाचं पोळं आहे, असं म्हणायला आपण मोकळे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नमन माझे ओ बेअर | बट यू डु केअर | कीप पुलिंग अप द हेअर | एव्हरी दिवाळी || १ ||

नमन माझे गुरुवर्या | समीक्षरूपा तू स्वामिया | स्फूर्ति द्यावी अंक करावया | जेणे वाचका सुख वाटे || २ ||

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

खास अस्वली गुदगुल्या!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अस्वलरावांच्या लेखणीत बाय गॉड हा शब्द खुपला. बाकी अस्वल सिग्नेचर आहे.
ते प्रसिद्धी नको असणारे प्रसिद्ध कवी म्हणजे न बा का ?
की अस्वल म्हणजेच न बा ?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिक्रिया द्यायला भाग पाडलंत, प्रतिग्या मोडली माझी.
न बा हे न बा आहेत.
आमचे केवळ तळवे. त्यांच्या त्या तळटीपा.
========
सगळ्यांना मार्मिक दिली. टच गेला होता, बरं वाटलं.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अस्वला, बरं वाटलं रे तुला बघून. माझा म्हातारीचा जीव टांगणीला लागला होता, कुठे गेला आमचा लाडका अस्वल. चहाचं व्यसनतर लागलं नाही ना त्याला! कसं होणार आता आमचं.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ओचकाऱ्यांपेक्षा गुदगुल्या भारी.
---
माशा उठल्या तरी चालतील, मध मिळू द्या अस्वलाला.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अस्वलाची पोळधाड!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गमतीदार आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

सत्यकथन!! सामान्यांच्या दु:खाला वाचा फोडल्याबद्दल आम्चे पुढारी मा श्री अस्वल्जी यांचा इथे हार घालुन आणी शाल व श्रीफळ देउन सत्कार करण्यात येत आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शुचिताई, तुमचा अंक वाचून जीव जातो आणि आमचा खेळ होतो. Wink

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हाहाहा खरे आहे. पोस्ट ट्रुथ अंक वाचुन खरच जीवावर बेतलं होतं Smile

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे न्यूनगांडु वगैरे भारी शब्द कोणाच्या सुपीक डोक्यातून निघतात ना खरच. Biggrin
भन्नाट आहे लेख.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसीवर रोखठोक चानेल सुरू झाला!!!
दिवाळीआधी फटाके.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जयदिप चिपलकट्टी यांना लक्ष्य केलं नाही अस्वलाने त्यांच्या दी र्घ कथेसाठी. बरीच दोस्ती दिसतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण2
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आचरटबाबा, त्यांचं आडनाव चिपलकट्टी आहे हो.
प्लीज!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाव चांगले लक्षात आहे पण 'ल' खाल्ला होता तो आणलाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अस्वलाच्या सिंहवलोकनाशी सहमत खास करून KLPD अंकाबाबत. ऐसी वर माझा प्रवेशच त्या अंकामुळे झाला. 'विषय सर्वथा भाषाभीरूच बालपण वाचताना स्वतः च बालपण आठवू लागलेले.
पण पुढे वाचत गेलो तर इतिहास वैगेरे वाढून ठेवलेले(सौजन्य 3-14 वि आ)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखाच्या शीर्षकात सिंहावलोकन असा शब्द आहे त्याऐवजी अच्छभल्लावलोकन असा शब्द पायजे होता. बाकी लेख लईभारी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

असू द्या हो सिंहावलोकन. अस्वलाला मुळात पुढचेही दिसते कमी तो नाकावर ( वासाने ) चालतो, मागे वळून तरी काय उपयोग?
यावेळच्या दिवाळी अंकाच्या लेखांचा वास आल्याने आलाय इकडे ,आणि अगोदरच लेख लिहिलाय.
मग वासंतिक अंकापर्यंत झोप.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माननीय अस्वलरौ,
ह्या तुमच्या निबंधामुळे आमच्या कोंदटलेल्या भावनांना तुम्ही जी वाट करुन दिलीहेत त्याबद्दल अनेकानेक आभार. तुम्हाला ५ स्टार द्यायला म्हणून लॉगिन केलं अन् आता प्रतिक्रिया.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.