काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ९ (२३ फेब्रुवारी २०२०)

टॅक्सी दिवस ९: २३ फेब्रुवारी २०२०
आजही साऊथ मुंबईतच भाडी मारली सकाळी...
गिरगावात फडके मंदिराजवळ एकाला सोडलं...

कांदेवाडी, सी. पी. टॅंक, फडके-वाडी... आख्खं गिरगावच लहानपणापासून खास आवडीचं:

माझ्याच "पाइनॅपल सन्" ब्लॉगमधल्या ह्या नोंदी: https://nilesharte.blogspot.com/2011/09/blog-post_17.html
>>>>>
गिरगाव : चर्नीरोडचा ब्रिज , गायवाडीतला चिक्कीवाला , प्रार्थना समाजातला उदबत्तीचा वास, ऑपेरा-हाउसवरचे हिऱ्यांचे सौदागर आणि फाफडा जिलेबी (अतिरेक्यांच्या %#$% चा %^$%^ ), ती पत्रिकांची दुकाने, सी पी टॅन्क वरच्या गायी, चाळींच्या शेरीतला आंबूस वास आणि राजुदादाच्या सेंटचा घमघमाट, फडकेवाडीचा गणपती, प्रकाशची ती सूक्ष्म टेबल्स आणि स्वर्गीय साबुवडा, मिणमिणत्या चिमणीतला गंडेरीवाला.
शेणवे वाडीतले राडे आणि मठाबाहेरचे गजरे....आणि या सगळ्यात असूनही नसलेला समुद्र!
>>>>>>

पण 'प्रकाश'बद्दल अजून थोडं बोलायला हवं:
गिरगावात अनेक आयकॉनिक मराठमोळी हॉटेल्स आहेत तशी...
पणशीकर, तांबे, विनय, कोल्हापुरी वगैरे...

पण देवांत जसा विष्णू (की शंकर ज्यानी त्यानी आपापला नंबर वन घेणे),
देसी पॉर्नमध्ये जशी स्वाती नायडू (की हॉर्नी लिली ज्यानी त्यानी आपापला नंबर वन घेणे)
विदेशी पॉर्नमध्ये जशी सन्नी (की मिया खलिफा ज्यानी त्यानी आपापला नंबर वन घेणे)
गाड्यांमध्ये जशी लॅम्बोर्घिनी (की बुगाटी ज्यानी त्यानी आपापला नंबर वन घेणे)
तद्वैतच प्रकाश हे माझे नंबर वन आहे, होते आणि राहील.

आईबरोबर तिच्या माहेरी गिरगावात आलो की मंगळवारी फडकेवाडीतल्या गणपतीला धावतं "स्सप" देऊन
इकडे साबुदाणा-वडा खायला येण्याच्या बिलोरी आठवणी अजूनही मेंदूच्या कोपऱ्यात चमचमत राहिल्यायत!

(छायाचित्रं जालावरून साभार.)

'होल इन द वॉल'ची साक्षात व्याख्या म्हणता यावी अशी फडके गणपती मंदिरासमोरची ही इवलुशी जागा.

Prakash

त्यांची ही टेबलं पहा मुंबईतल्या जागेच्या टंचाईत ऑप्टिमायझेशनचं सर्वोत्तम उदाहरण आहे हे.

space

ह्यावर जेमतेम कुल्ला टेकवत किंवा बरेचदा उभ्या-उभ्याच तुम्ही जगातला सर्वोत्तम साबुदाणा वडा खाल राजेहो.

Sabudana Wada

जगात इतरत्र किंवा आपल्या घरी आई महाशिवरात्रीला बनवते ते साबुदाणे वडे चांगलेच असतात.
बेसिकली जगभरात काय करतात तर साबुदाणा आणि बटाट्याचं मिश्रण असलेले गोळे करून चांगले तळतात.
साधारण यु. एफ. ओ. तबकडीच्या आकाराचे.
पण इकडचा वडा पूर्ण गोलाकार असतो टेनिसबॉलपेक्षा थोडा लहान.
शिवाय आतलं मिश्रण जवळ जवळ (पण पूर्ण नव्हे अशा) साबुदाणा खिचडीचं असतं.
... वरचं कुरकुरीत आवरण... त्याला वर्णनात उतरवणं फोल आहे ते खाऊनच बघायला हवं.
आणि अर्थातच हे आवरण आणि आतलं मिश्रण एकमेकांशी फटकून नसतातच.
काय कुठे सुरू होतं ह्याच्या रेषा माझ्या नैतिकतेइतक्याच धूसर आहेत!

...
बरोबर दिलेल्या दाण्याच्या दाट चटणीबरोबर दोन वडे चेपले आणि त्यांचं किंचित पातळसर आणि मिठाची कणी टाकलेलं पियुष प्यायलं की आख्ख्या जगाबद्दल निर्हेतुक निरलस आणि निरामय प्रेम दाटून येतं.
पियुषसुद्धा मला प्रकाशचं आणि प्रकाशचंच आवडतं.
पणशीकरचं अति दाट आणि अति गोड असतं I.M.O किंवा आस्वादचं जास्तच पात्तळ!

असो...

पण आज मात्र फडकेरोडवर गाडी लावून प्रकाशमध्ये जाणार तितक्यात बॉम्बे हॉस्पीटलचं भाडं आलं.
त्यामुळे बायको बरोबर असताना दिसलेल्या एक्सकडे टाकलेल्या कटाक्षासम प्रेमळ ओझरता कटाक्ष प्रकाशकडे टाकून मी गिअर टाकला.

तिकडून अजून एक दोन भाडी मारल्यावर गेटवेवरून एक नॉर्थचं कुटुंब उचललं.
त्यांना सांताक्रूझला सोडायचं होतं.
छान पण चेहेऱ्यावर रागीट भाव असलेली २३-२४ ची मुलगी,

तिचा थोडा लाडावलेला झम्या टाईप टीनएजर भाऊ
(जो पंकज भोसलेच्या गोष्टींत असता तर त्याच्या हॉट भैणीला पटवायला कॉलनीतल्या पोरांनी हमखास त्याला प्यादं बनवला असता.)

पॅसिव्ह वडील आणि थोडी ऍग्रेसिव्ह आई...
मी उगीचच ह्यांना असंच्या असं कास्ट करून आयुष्मान खुराना साठी मनातल्या मनात स्क्रिप्ट लिहायला सुरुवातसुद्धा केली.

मुलीला नुक्तीच एडलवाईज मध्ये नोकरी लागली असावी.
एकंदरीतच फॅमिलीतली अल्फा डॉग तीच असावी.
मी लांबच्या रस्त्यानी नेऊन त्यांचं भाडं फुगवू नये म्हणून मॅप चेक करून मला सटासट डायरेक्शन्स देत होती.

तिनं आधीच मला निक्षून सांगीतल्याप्रमाणे गाडी वाकोल्याला घरी नेण्याआधी कालिन्याला एडलवाईजच्या ऑफीससमोर लावली.

मग तिनं आनंदानं सगळ्यांना तिचं ऑफीस बाहेरून दाखवलं...
"सेक्योरिटी अंदर ॲन्ट्री नही देगा", हेही अभिमानानं सांगितलं.
ते तिघंही आपल्या पोरीच्या ऑफीसची मोठ्ठी बिल्डिंग कौतुकमिश्रित अप्रूपानं बघत राहिले.

हे मुंबईचं जगातल्या प्रत्येकाला फेअर संधी देण्याचं गुडविल आपण टिकवणार आहोत?
की पडक्या घरातल्या वेडसर म्हाताऱ्यासारखा कुजकटपणा करून सगळ्यांना हाकलवून लावण्यात धन्यता मानणार आहोत??

आज इतकंच.
कमाई: ४४५ रुपये

क्रमश:
आधीचे दुवे:
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: उपोद्घात
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २८ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३१ जानेवारी २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ मार्च २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २०१८
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९ उत्तरार्ध
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ५ व १२ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ फेब्रुवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १८ मार्च २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २४ मार्च ते १२ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २० एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २६ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३० एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ मे आणि २९ मे २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १५ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २२ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट माईलस्टोन: २० जुलै २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २० जुलै ते डिसेंबर पहिला आठवडा २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १ (८ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २ (१५ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ३ (२२ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ४ (२९ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ५ (१९ जानेवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ६ (२६ जानेवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ७ (२ फेब्रुवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ८ (९ फेब्रुवारी २०२०)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

नेहमीप्रमाणे उत्तम..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आभार गवि.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गेल्या ८ - १० पोस्टच्या शेवटी तू कमाईचा आकडा टाकलायस. दोन सोडून. त्याची सरासरी साधारण ६२५ येईल. ते महेशभाई / जे-कोणी-भाई आहेत त्याना टॅक्सी चालवण्याबद्दल जे काही द्यायला लागतं, पेट्रोल (ते तू भरत असशील राईट?), अजून जे काही खर्च असतील - सग्ग्गळ्या ऑपरेशनल कॉस्टस जाऊन हा आकडा आहे ना? म्हणजे महिन्याचे सरासरी २८ दिवस हा उद्योग केलास तर १७५०० वट्ट कमाई फक्त? च्यायला कठीण आहे. आणि हा उद्योग दिवसभर करायचास की अर्धा/पाऊण दिवस? दिवसभर हाच धंदा केला तर कीती कमाई होईल? आणि २८ दिवस हे केल्यावर कधी बाहेर जाणं, नात्यातल्या लग्नाला जाणं, मुलाला चौपाटीला नेणं वगैरे कधी करायचं?

पण त्याचबरोबर तुला टॅक्सी चालवायला मिळणं कठीण गेलं म्हणालास. तू थोड्या झोपा काढतोस, अल्टा माऊंट रोडवर चक्कर मारतोस, पन्नास-शंभर सोडून देतोस म्हणून हा कमाईचा आकडा कमी धरायचा? तसं असेल तर "प्रोफेशनल" टॅक्सीवाला कीती कमावत असेल? सरासरी आकडा माहीती आहे? अर्थात - त्यात वर्षभरातली सरासरी पण आली. गरब्याच्या सुमारास खूप गिऱ्हाईकं मिळंत असतील आणि पावसाळ्यात तीन-चार दिवस एखादं भाडं मिळताना मारामार. (कोव्हीडचा गोंधळ तर सोडूनच दे). जे काही आहे ते कॅश मिळतात म्हणजे ईन्कम टॅक्स काय वाटलं तर भरला? जीएसटीने यात काही फरक पडला? अजून दहा वर्षानी काळी-पिवळी रहाणार? म्हणजे अख्ख्या मुंबईत मिळून फक्त शंभर आहेत असं "असणं" नव्हे. हे नरपुंगवा, या प्रश्नांची उत्तरं आज रात्रीपर्यंत दिली नाहीस, तर तुझ्या डोक्याची शंभर शकलं होऊन तुझ्याच पायाशी लोळू लागतील !!

आणि एक रवला:

पडक्या घरातल्या वेडसर म्हाताऱ्यासारखा कुजकटपणा करून सगळ्यांना हाकलवून लावण्यात धन्यता मानणार आहोत??

= गुलाबो सिताबो??

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

मि. पा. ,

हा माझ्यासाठी आतबट्टा आहे.

नम्बर्स साधारण असे:

ॲव्हरेज मी बहुधा ७०० कमवतो.

दिनेशभाईंचं भाडं ५०० रुपये (स्टॅंडर्ड रेट ३५० ते ४०० आहे पण माझ्यासारख्या पूर्ण 'रूकी'ला टॅक्सी ते देतायात तेव्हा नॉट कम्प्लेनींग् )

टॅक्सी लाइनचा नियम असा आहे की आपण टॅक्सी चालवायला घेतली की दिवसाअखेरीस सी. एन. जी. फुल्ल करून द्यायचं: ते मला साधारण ३५० चं भरावं लागतं.

सगळ्यात मजेशीर पार्ट: मी रहातो वान्द्र्याला तिथून मलबार हिलला टॅक्सी घ्यायला टॅक्सीनी जातो Smile (२०० रुपये)

आणि टॅक्सी सोडून येताना रात्री इतका थकलेला असतो की टॅक्सीनीच येतो (पुन्हा २०० रुपये)

सो साधारण ५०० रुपये मी स्वतःच्या खिशातून भरतो असं म्हणता येईल.
पण अनुभवाच्या शाळेची ही किंमत मला मान्य आहे Smile

आता आपण पटकन हार्डकोअर टॅक्सीवाल्याचे नंबर्स बघूया:

अनुभवी टॅक्सीवाले सगळा खर्च वजा करून दिवसाचे बाराशे वगैरे रुपये कमावतात.
एका शिफ्टचे (७ ते ६ वगैरे )
(अर्थात तूफान धंद्याचे आणि भाकड दिवस असतातच)

जास्त मेहनती लोक १६ तास वगैरे चालवून महिना ५० ते ६० हजार कमवत असावेत.

अर्थात करोनाने सध्या पार सगळ्यांच कंबरडं मोडलंय.

>>>>
पडक्या घरातल्या वेडसर म्हाताऱ्यासारखा कुजकटपणा करून सगळ्यांना हाकलवून लावण्यात धन्यता मानणार आहोत??
>>>

हे खरं तर मुंबईतून सगळ्यांना जा जा सांगणाऱ्या कुसक्या लोकांसाठी आहे.
इन शॉर्ट मी कंगनाच्या बाजूनी आहे.
इन शॉर्टर मी जगातल्या सगळ्या सर्कीट, वर्जिनल आणि डेअरर लोकांच्या बाजूनी आहे.

ही उत्तरं वेताळाला खदाखदा हसत झाडाला लटकायला पुरेशी आहेत का? Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

६० खुपच जास्त आहेत .. ५० कॅप असावेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आयला असं आहे होय. चोक्कस!! तूच लेका सर्कीट, वरिजिनल आणि डेअरर आहेस - टॅक्सीचं परमिट स्वत: खपून काय घेतोस, नुसतंच घेऊन न ठेवता दर वीकएंडला टॅक्सी काय चालवतोस आणि ही सगळी गंमत ईथे आम्हाला रंजकपणॅ, चकटफू सांगतोस Smile

गंमत आहे खरी सगळी. सविस्तर उलगड्याबद्दल धन्यवाद. येस, लटकत बसलोय...... पुढच्या भागाची वाट बघत!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

आभार मि. पा. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आजच सगळे भाग वाचले. लेखमाला आवडते आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

शंभर शकलं होऊ न देण्याचं तुमचं कसब मानलं. अनवट लेखमाला आवडतेय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आवर्जून वाचणार्या आणि कळवणार्या ऐसीकरांचे मन:पूर्वक आभार _/\_

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नील भौ, एक बार तुमकू मिलनेका हय.
ऐसाहीच.
बिन कामका.
गप्पे मारनेकू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नक्की भेटू. व्य. नि. धाडतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरे वा! एव्हढं सगळं क्लिअर आठवतं म्हणजे भारीच. की रिअल टाइमात लिहून ठेवता डायरी-बियरीत?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डायरीत नोंदी करतो Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय कुठे सुरू होतं ह्याच्या रेषा माझ्या नैतिकतेइतक्याच धूसर आहेत!

मस्त!

👌

- (धूसर) सोकाजी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आभार Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0