Skip to main content

" न्यू जर्सीतील दाढीवाले"

फडताळातिल सुवर्ण-व्हिस्की
उपयोगाची काही नाही
पुष्ट पोटऱ्या दाढी-दिक्षित
अखेरचे ते वळून पाही.

आणिक नंतर रबर-सोलचे
स्नीकर किमती चढवी पायी
टिकुन उन्ह ते असे तोंवरि
जॉगिंग करणे- त्याला घाई

गंजत पडल्या रेल-रुळांवर
शुभ्र ससा तो वेगे जाई
जमीन सरते पायाखाली
बाकी दिसतहि काही नाही!

संध्याकाळी कॅफेमध्ये
निळ्या जीन्समधली ती बाई
घामट तीही , घामट तोही
काळ हातातुन निसटत जाई !
xxx

शिव-हरी जोडीद्वारे व्हायोलिनचा वापर

टीपः मी संगीततज्ज्ञ नाही. प्रश्न सामान्य रसिकाचा आहे.

स्पर्धा का इतर?

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग २

थोरले माधवराव यांचे निधन फार लहान वयात झाले आणि त्यानंतर कोणीही कर्तबगार पेशवा झाला नाही. मग एका बाजूस मराठी सत्ता कोलमडली आणि दुसऱ्या बाजूस इंग्रजांची सत्ता वाढत गेली. इंग्रजांनी निरनिराळे अवैध मार्ग अवलंबून एकामागून एक संस्थाने गिळंकृत केली. शतकाच्या शेवटी इंग्रजांचे मोठे सैनिक सामर्थ्य उभे झाले होते.

ए१ / ए२ दूध म्हणजे नक्की काय?

ए१ आणि ए२ दूध आजकाल अनेकदा चर्चेत येताना दिसतं. दूध ए१ किंवा ए२ असणं म्हणजे नेमकं काय? त्याचा शरीरावर खरंच काही परिणाम होतो का?
चढ्या किमतीनं ए२ दूध विकत घ्यावं का? आतापर्यंत याविषयी परदेशात आणि भारतात काय संशोधन झालं आहे? जाणून घेऊया या लेखातून.

मी आणि माझे आजोबा

मी आणि माझे आजोबा. ह्या जगात आजोबाच माझे सर्व काही होते. माझे बाबा, माझी आई, माझा भाऊ बहीण, माझे मित्र, माझी शाळा, माझी चित्रांच्या गोष्टीची पुस्तके. सर्व काही माझे आजोबा!
आजोबांची परिस्थिती माझ्यासारखीच होती. मला आजोबांशिवाय कोणी नव्हते. आजोबांना माझ्याशिवाय कोणी नव्हते.
जगता जगता केव्हातरी मला समजले की लहान मुलांना आई बाबा असतात. मी आजोबांना आई बाबांच्या बद्दल कधी विचारलं नाही आणि आजोबांनी स्वतःहून कधी सांगितले नाही तोपर्यंत माझी समजूत होती की मुलांना आजोबा असतात आणि आजोबांना मुलं असतात.
माझं हे असच होतं. माझं जग आजोबांच्या भोवती फिरत होतं.

ललित लेखनाचा प्रकार

डासांचे विजय गीत

(दर वर्षी आम्ही 2 लाखाहून जास्त माणसांचे बळी भारतात घेतो. )

शूर वीर डास आम्ही
बांधुनि कफन डोक्यावरी
तुटून पडतो शत्रुंवरती
त्यांचे रक्त पिऊनी
देतो विजयी आरोळी.

डेंगू मलेरियाच्या दिव्यास्त्रांनी
करतो हल्ला माणसांवरती
पाठवतो त्यांना यमसदनी.

घाबरून आमच्या फौजेला
मच्छरदानीत लपणार्‍या
भित्र्या भागुबाई माणसांशी
काहो करता तुलना आमुची.

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र - जागृती आणि प्रगती (भाग १)

इतिहासाचा अभ्यास करताना जिथे सलग प्रवाह खंडित झालेला दिसतो, अशा जागा शोधून त्यांचा अभ्यास केला गेला पाहिजे. भारताच्या इतिहासात १८१८ ते १९२० हा काल अशी जागा होती जिथे अखंड प्रवाह खंडित झाला आणि प्रवाहाला नवीन वळण मिळाले. त्या दशकाबद्दल सुधीर भिडेंची लेखमाला.