Skip to main content

पाळीच्या कपाबद्दल लेखन : बायांच्या हुतात्माषौकाची परमावधी

सदर लेखात मासिक पाळी, रक्त वगैरेंची पुरुषांना किळसवाणी वाटणारी वर्णनं अजिबात नाहीत.

तीन वर्षांपूर्वी गौरीनं 'एकच कप' हा लेख लिहिल्यापासून मी पाळीचा कप वापरत्ये.

बायकांना१ हुतात्मा बनण्याची फार हौस असते. मुळात असते का नाही माहीत नाही. मात्र अगदी लहान वयापासून हेच शिकवलं जातं. सरळ सांगितलं नाही तरी आजूबाजूला आई, काक्वा, मावश्या, आत्या, माम्या, आज्या - हाका मारायच्या आणि खरोखर नातेवाईक - सगळ्या बायकांमध्ये हा हौतात्म्यषौक अगदी ठासून भरलेला असतो. बघून बघून तेच नॉर्मल वाटत जातं.

सिंधुआज्जींच्या चमत्कारिक कहाण्या

अनेक वर्षे विस्मृतीत गेलेल्या सिंधुआज्जींची प्रकर्षाने आठवण झाली, आणि त्यांच्या आठवणी जणू चलचित्रपटाप्रमाणे डोळ्यांसमोरून झरझर गेल्या.

आमच्या सोसायटीत तळमजल्यावरील एक बिऱ्हाडात सिंधुआज्जी एकट्याच रहायच्या. म्हणजे त्या आणि त्यांचे पाळीव प्राणी. सिंधुआज्जींकडे एक काकाकुवा, फिशटॅन्कमधले मासे, एक पांढरीधोप मनीमाऊ, आणि एक झिपरे अस्वल होते. स्लाॅथ्या अस्वलाचे खेळ करून त्या स्वतःच्या टाईमपासची सोय करत. (अर्थार्जनासाठी त्यांचे एक प्रोटेक्शन रॅकेट होते.)

ललित लेखनाचा प्रकार

पावसातल्या आठवणी

असा पाऊस कोसळत असला, की मन आपसूक भूतकाळाकडे धाव घेतं. सगळ्या चिंता क्षणात विसरल्या जातात, आणि ऐंशीच्या दशकातलं ते निरागस बालपण डोळ्यांसमोर येतं.

असा पाऊस कोसळत असला, तरी शाळेत जावं लागायचंच. डोक्यावर इरलं, पाठीवर दप्तर, एका हातात डबा-वाॅटरबॅग आणि दुसर्‍या हातात चित्रकला-हस्तकला यांच्या सामानाची पिशवी असा जामानिमा करून आम्ही शाळेत जायचो. एवढं करून शाळेला सुट्टी दिली असेल तर जरा रागच यायचा. मग कॅन्टीनमध्ये वडापाव किंवा गोभी मांचुरियन खाऊन अंगात जरा ऊब यायची आणि आम्ही घरी परतायचो.

ललित लेखनाचा प्रकार

पुल - शंका आणि (कु)शंका इ.

भाग १ वर बरीच चर्चा झाली आहे. त्यात अनेकांनी मांडलेले अनेक मुद्दे वाचनीय आहेत.
पुढेमागे माहितीपर प्रतिसादही इथे कलेक्ट करण्याचा विचार आहे.

पुल वाचताना आलेल्या काही शंका. काही ढोबळ तर काही खुसपटं काढल्यागत- पण प्रामाणिक शंका आहेत.
उत्तरं मिळाल्यास आभारी राहीन.

१. हसवणूक मधल्या "आमचा धंदा एक विलापिका (१९६१) ह्या लेखात टीकाकारांची खिल्ली उडवताना पुढील मजकूर आहे-

समीक्षेचा विषय निवडा

ही बातमी समजली का? - भाग १८९

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही.

नोकरीविषयक अनुभव

एखाद्या कंपनीत आपण नोकरी करतो. ती कंपनी आपल्याला काही मोबदला देते. तो मोबदला नक्की कशाकशाचा असतो? श्रमाचा , त्या कंपनीशी निष्ठ रहाण्याचा की इन जनरलच what we bring to the table त्या त्या गोष्टींचा?

जसे मी आतापर्यंत जिथे जिथे काम केले तिथे, मला त्या कंपनीच्या रायव्हल्स चा राग येई किंवा क्वचित जर रायव्हल्स पुढे गेले तर आपल्या कंपनीचे काय वगैरे विचार मनात येत्. मी ती कंपनी क्वचित लिन्कडिन वर लाइक करे. लोकांशी बोलताना, कंपनीचे कौतुक करे. पण दुसरी कंपनी जॉइन केली की मग मागील कंपनीतिल तृटी लक्षात येत :( . जसे प्रेम आंधळे असते तशीच कंपनीशी निष्ठा ही आंधळ्यागतच असे.

अंदमान – १ (तयारी आणि आगमन)

जसं आठवतंय तेव्हापासून मला समुद्राचं प्रचंड आकर्षण वाटत आलंय. सोनेरी वाळूचा किनारा, पायाखालून सरकणारी मऊ रेती, ती समुद्राची गाज आणि लाटा सगळंच खूप आपलसं वाटतं. गावापासून तळकोकण आणि मध्य कोकण तसं बऱ्यापैकी जवळ असल्यामुळे गेल्या सात-आठ वर्षांमध्ये दर सहा महिन्यांनी सतत कोकण दौरा ठरलेला असायचा. अगदी अलिबाग ते पार तळाला शिरोड्यापर्यंत सगळ्या ठिकाणी जाणं झालं. पण पश्चिम किनारा सोडून आणखी कुठे जाण्याचा योग कधी आला नाही. बंगालच्या उपसागरातल्या अंदमानचं नाव अगदी लहानपणापासून ऐकलेलं पण ते केवळ भूगोलात केंद्रशासित प्रदेश आणि इतिहासात सावरकरांची काळ्यापाण्याची शिक्षा, सेल्युलर जेल याच गोष्टींसाठी.

पु लं - लिखाण आणि इतर विषयक चर्चा

Taxonomy upgrade extras

धागा सुधारला आहे. मजकूर डकवत जाईन .

पुल मला प्रचंड आवडतात. प्रचंड. पण त्यातही टप्पे होते.
टप्पा एक -
एकेकाळी मी त्यांचा जबरा फॅन होतो. त्यांची सगळी पुस्तकं कोण कलेक्ट करतंय अशी आम्हा मित्रांत चढाओढ वगैरे चालायची.
आणि "काय वाट्टेल ते होईल" माझया एकट्याकडेच असल्याने मी शर्यतीत नेहेमीच आघाडीवर राहिलो. हे दिवस पुलंनी भारावून जाण्याचे होते. कुणी पुलंविरूद्ध किंवा पुलंविषयी कौतुक सोडून इतर काही बोललेलं मला खपायचंच नाही. त्यांचं प्रत्येक वाक्य प्रमाण आणि त्यांनी लिहिलेली प्रत्येक ओळ ग्रेट. बास. विषय संपला.