Skip to main content

बघता बघता देवा -

कालपर्यंत कितीतरी
खुषीत तू ठेवलेस -
बघता बघता देवा,
आज मात्र भुईत लोळवलेस . .

हिरवेगार शेत सारे
सोन्यासारखे पिकवलेस -
बघता बघता देवा,
सगळे का रे धुळीत मिळवलेस . .

का रे देवा आम्हाला
इतके तू छळलेस -
बघता बघता देवा,
पाणी आमच्या तोंडचे पळवलेस . .

घ्यायचे होते सगळे परत
आधी इतके का दिलेस -
बघता बघता देवा,
आम्हाला कफल्लक का केलेस . .

इतके दिवस तुझे
कौतुक करायला लावलेस -
बघता बघता देवा,
आता बोट मोडायला लावलेस . .

भारतीय राजकारण व लोकसभा निवडणूका - २०१४ (भाग २)

Taxonomy upgrade extras

सदर धागा तत्कालीन राजकीय चर्चा, मते व अन्य स्वरूपाचे लेखन करण्यासाठी काढत आहे.
विदा/संदर्भ देऊन केलेले दीर्घ-विश्लेषणात्मक लेखन सोडल्यास सदर विषयाशी संबंधीत सर्व लेखन या धाग्यावर करावे अशी विनंती करतो.

या विषयाशी समांतर लेखन नव्या धाग्यात काढल्यास ते लेखन या धाग्यावर हलवण्यात येईल याची नोंद घ्यावी!
कोणते लेखन या धाग्यात हलवायचे याचा निर्णय संपादकांचा असेल.

भाग १

============

(त्यातल्या त्यात `खाणेबल' सिरीयल....)

cereal
सकाळी उठल्यानंतरची वेळ, बाहेरून पक्षी आणि गाड्यांचे आवाज येण्याची वेळ! त्याचप्रमाणे पोटातून आवाज (पोट बिघडलं नसेल तरीही) येण्याची वेळ. सकाळी उठून ब्रेकफास्ट करण्याची वेळ. माझे आई-वडील असल्यापासूनची ही सवय मी स्वतंत्र झाल्यावरही सुरू ठेवलेली! त्यामुळे इच्छा असो वा नसो, आवाजाकडे लक्ष जातंय. इतक्या वर्षांच्या सवयीने आपोआप एकीकडे डोक्यातलं चक्रही सुरू होतं. झोप पूर्ण झाली नाहीये, उठणं भागच आहे, काल कोणालातरी अॉनलाईन चिडवलं होतं, त्यांचं उत्तर आलंय का, इ.

गणितज्ञांच्या अद्भुत कथा - 8: थेंबे थेंबे तळे साचे

जेव्हा गणितातील एखादी समस्या सहजासहजी सुटत नसते वा निरीक्षणाशी सुसंगत नसते किंवा अतर्क्य वाटते तेव्हा गणितज्ञ एखाद्या नवीन संकल्पनेला वा संज्ञेला वा एखाद्या नवीन तंत्राला जन्म देत असतात व त्या समस्येचे उत्तर शोधण्यात यशस्वी होतात. उदाहरणार्थ, 1992 साली अतीवास्तव (surreal) संख्यांचा शोध अनंताच्या पलिकडे काय असू शकेल या प्रश्नाच्या उत्तरासाठी झाला. अजूनही वैज्ञानिक या संज्ञेविषयी वा त्याच्या वापराविषयी गोंधळलेले आहेत. अनेक वेळा वैज्ञानिकांची निकड म्हणूनसुद्धा काही नवीन गणितीय संकल्पनांची भर पडते.

त्यातल्या त्यात `बघणेबल' मालिका....

Taxonomy upgrade extras

रात्री ८ नंतरची वेळ, ऑफिसातून परतण्याची वेळ! त्याचप्रमाणे घरात दूरदर्शन (मॅचेस नसतील तेव्हा झी-मराठी) चालू असण्याची वेळ. लेकीचे आजोबा-आजी असल्यापासूनची ही सवय तिच्या बाबानेही पुढे सुरूच ठेवलेली! त्यामुळे मनात असो वा नसो, पडद्यावर जे काही घडत असतं तिथे लक्ष जातंच. इतक्या वर्षांच्या सवयीने आपोआप एकीकडे कामंही होत रहातात, जेवण-आवराआवरी-उद्याची तयारी-इ.
तसंही ही वेळ निवांतपणाची अन वाचनाची नाही, कारण दिवसभर शिणलेला मेंदू नवं काही समजून घेण्याच्या ‘मोड’मध्ये नसतोच!
मग जे त्या पडद्यावर दिसतंय ते तरी निदान बरं असावं असं वाटतं.

चालत राहणार

चालणे प्रवाह जीवनाचा
थांबणे मरण यातना
पर्याय नाही दुसरा
शिवाय चालण्याचा.

चालता चालता भेटले
वाटेत जे सगे-सोयरे
अनोखळी वाटसरू निघाले.
क्षणभराची साथ तयांची
देऊन गेली अनेक जखमा
कवटाळूनी त्या जखमांना
एकटाच मी चालत राहणार.

दमलेल्या शरीरानी
थकलेल्या मनानी
निरुदेश्य मी
भटकत राहणार.
चालत राहणार, चालत राहणार.

अथ: जंगल कथा: सत्तेचा संघर्ष- शेरखान आणि महाबली रेडा

उन्हाळ्याचे दिवस होते. जंगलातील टेकडी खालच्या एका गुहेत शेरखान लपून राहत होता. महाबली रेड्याच्या भीतीने शेरखानला गुहेत शरण घ्यावी लागली होती. रात्रीच्या वेळी लपत-छपत छोटे हरीण किंवा सस्याना मारून तो कशी-तरी गुजराण करत होता. गुहेत शेरखान गहन विचारात दडलेला होता, अनेक विचार त्याच्या मनात येत होते. गुहे समोर असलेल्या छोट्याशा डबक्यातले पाणी बहुतेक आठवड्यात आटून जाईल. जंगलातल्या मोठ्या तलावावर महाबलीचा कब्जा आहे. पाण्या विना जगणे अशक्य. उभे आयुष्य ज्या जंगलात गेले, कदाचित ते जंगल सोडण्याची पाळी येणार. पण कुठे जाणार? काय करावे काहीच त्याला सुचेनासे झाले होते.

बंडू नि दिगु समाजसेवा करतात

बंडू थोर समाजसेवक बाळू भुरकूटे ह्यांचे आत्माचरित्र वाचत होता. त्याचे डोळे भरून आले होते लेखकाला आपल्या वयाच्या तिसऱ्या वर्षीपासूनच्या घटना आठवत होत्या नि आपल्याला मात्र काल खाल्लेली भाजी आज आठवत नाही ह्याचे बंडूला वैषम्य वाटले .