Skip to main content

बहुगुणरमणीय

पावसाळ्याबद्दल सारेच लिहितात, सार्‍या वयाचे, सार्‍या पेशाचे! साहित्यिकांचा फार आवडता आहे तो; कारण तो वेगळा आहे – बहुगुणरमणीय!

पण सूक्ष्मपणानं त्याच्याकडे कोणी बघतच नाही.

जगातल्या सगळ्या द्वंद्वांप्रमाणे ‘शीतोष्ण’ हेही एक प्रसिद्ध द्वंद्‍व आहे. भूगोलाच्या काटेकोर नियमांमुळे सहा-सहा महिने पृथ्वीला हे द्वंद्‍व सहन करावं लागतं. या द्वंद्वाला धूप न घालता त्यांच्या पार जाऊन आपलं अस्तित्त्व दाखवणारा म्हणून पावसाळा वेगळा!!

खास लकबी

संवाद साधण्याच्या काहि लोकांच्या खास लकबी असतात..
एम आय डी सी ला अस्ताना आमचा एक मित्र होता एखादी चर्चा असली व त्याने त्या विषयावर तोंड उघडले कि आधि

"मला एक समजत" अशी सुरवात केल्याशिवाय तो पुढे बोलायला सुरवात करत नसे..

तर एक यु पी वाला होता तो "वो क्या है न जी" अशी सुरवात करित असे.

काहि लोकाना " मी काय बोलतो ते लक्षात येते ना" म्हणायची सवय असते..्

तर काहि लोक्स २ पेग पोटात गेले कि फाड्फाड कोकाटे ईंग्लिश बोलु लागतात....

शेवटी व्यक्ति तितक्या प्रक्रुति

बागलाणचे शिलेदार (१/३): साल्हेर, सालोटा

बागलाणचे शिलेदार
हा माझा लेख ८ जून १३ च्या पुणे टाइम्स मध्ये आला होता.हा पहिला भाग असून उर्वरित २ भाग नंतर येतील. जर आपण वाचला नसेल तर येथे वाचू शकता.

http://sagarshivade07.blogspot.in/

चावडीवरच्या गप्पा – आडवा(टे)नी राजीनामा नाट्य

chawadee

“नमस्कार हो चिंतोपंत! कळली का बातमी?” बारामतीकर, बर्‍याच दिवसांनी चावडीवर जमलेल्या सर्वांकडे बघत, चावडीवर प्रवेश करत.

“कसली बातमी? लोहपुरुषातले लोह वितळत चालल्याचीच का?”, नारुतात्या हसू चेहेर्‍यावर आणत.

“नारुतात्या आणि बारामतीकर, तुम्हाला फुटलेल्या आनंदाच्या उकळ्या कळताहेत हो! पण एवढ्यातच 2014 च्या निवडणुका जिंकल्याचा आनंद झाल्यासारखे आनंदित होऊ देऊ!”, घारुअण्णा भयंकर उद्विग्न होत.

मन्या सुर्वे

साधारणपणे पंधरा सोळा वर्षांपूर्वी अविनाश धर्माधिकारींच्या तोंडून हे नाव पहिल्यांदा ऐकले होते. जुलिओ रिबेरो यांच्या कारकिर्दीमध्ये मुंबई (बॉम्बे) पोलीसांनी केलेले पहिले "एन्काउन्टर". मन्या सुर्वेचे. उत्सुकता होती. पण अधिक माहिती मिळाली नव्हती. रमा नाईक, अरुण गवळी, सदा पावले अशी आपल्या भागातील वाटावीत, गावाकडली माणसे वाटावीत अशी नावे असणारी माणसे मुंबई अंडरवल्डमध्ये काय करतायत असा एक भाबडा प्रश्न मनात येऊन जाण्याचे नाव काढीत नसे. हाजी मस्तान, वरदराजन मुदलियार, दाऊद इब्राहिम इत्यादि नावे जरा तरी 'एलियन' होती. तरी 'कासकर' त्या एलियनगिरीला छेद देत होतेच.

[महाराष्ट्र टाईम्स] "अश्लील चाळे"

आजच्या मटामध्ये शेवटच्या पानावर "एएसआय मध्ये तिरंदाजांचे अश्लील चाळे" अशा मथळ्याखाली एक बातमी दिली आहे. (http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/Fixing-Baiting-…)

नेटवरची बातमी आणि छापील आवृत्तीमधील बातमी यामध्ये मजकुरात असलेली तफावत अशी की छापील आवृत्तीमध्ये "अश्लील चाळे" असा शब्दप्रयोग आहे.

"वैचारिक बेशिस्तीची सुरुवात शाब्दिक बेशिस्तीपासुन होते" असे एक राजीव साने यांचे विधान नुकतेच वाचले होते. ही बातमी मला त्यासंदर्भात अत्यंत नमुनेदार वाटते.

मला पडलेले प्रश्न असे -

लढवय्या शेतकरी

वॉर ऑन हंगर आणि एफिशियंट मार्केट्स
"अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूळ गरजा आहेत" हे घासून गुळगुळीत, बुळबुळीत झालेलं वाक्य; पण प्रगतीचं घोडं अजून पहिल्याच पायरीवर अडलेलं आहे. अर्थातच, पुढचं वळण घेतलं की आलंच नंदनवन आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर आपण तिथे लवकरच पोचू हा विश्वास अटळ आणि अढळ आहेच. माणूस सर्वसुखी होण्यात अनेक नैसर्गिक अडचणींचा मोठा अडथळा आहे आणि त्यासाठी माणसाला अनेक पातळीवर युद्ध करावे लागते. त्यापैकीच एक आहे वॉर ऑन हंगर.

धर्म-अर्थ-पोर्न-मोक्ष: देशी आणि विदेशी

Taxonomy upgrade extras

भारतीय संस्कृतीतील 'धर्म-अर्थ-काम-मोक्ष' या संकल्पनेचा सहजगम्य, सुटसुटीत अर्थ "वैयक्तिक जीवनात आपल्या धर्माचे पालन करत (वा विशिष्ट गुणांची जोपासना करत), अर्थप्राप्ती करून घेत, हरघडी उत्पन्न होणार्‍या नानाविध कामनांची पूर्ती करत जीवन व्यतीत करावे आणि शेवटी या सर्वातून निर्माण होणार्‍या गुंत्यातून, व्यापातून, बंधनातून स्वत:ला मुक्त करत उर्वरित आयुष्य पाशरहित, निष्काम, तणावामुक्त असे घालवावे" असा लावता येइल.परंतु या चर्चेपुरते जरा वेगळ्या अंगाने याकडे बघूया:

मराठी लिखाण आणि लैंगिकता

Taxonomy upgrade extras

डिस्क्लेमर : या धाग्याच्या शीर्षकापासून आतल्या मजकूरामधे काही प्रक्षोभक लिहावे असा माझा हेतू नाही. साहित्य, साहित्याचे वाचन यातील एका (माझ्या मते अदुर्लक्षणीय , पण सभ्यतेपायी न बोलल्या जाणार्‍या) पैलूबद्दल मी लिहितो आहे अशी माझी भावना आहे. इतरांना यात वावगे तर वाटू नयेच , पंण यात कुणाला भर घालावीशीही वाटावी अशी माझी आशा आहे. इथे प्रश्न एकंदरीत "जेंडर बेस्ड इशूज ऍंड् सेक्शुआलिटी"चा आहे. मराठीत या दोन्ही संज्ञांना "लैंगिकता" असाच शब्द आहे. मात्र या दोन गोष्टी अर्थातच वेगवेगळ्या होत.