हज्जम (पूर्व प्रसिद्धी: धनंजय दिवाळी (बहुतेक) २०१२)
अश्वा पुणे स्टेशन शिवनेरी बस stand वर धावतच घुसला . शेवटची शिवनेरी उभी बघून त्याला हायसं वाटलं. स्साला त्याच्या प्रोग्राम मधला बग त्याला शेवटी ११ वाजता सापडला होता. लगेच software ची बिल्ड फायर
करून तो निघाला. तरी मगर -पट्ट्यावरून इथे येईपर्यंत १२ वाजलेच होते.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about हज्जम (पूर्व प्रसिद्धी: धनंजय दिवाळी (बहुतेक) २०१२)
- 3 comments
- Log in or register to post comments
- 3837 views
शेजारचे काका इन्स्टावर खऱ्या बायका बघून चाळवले
अंबरनाथ, १८ सप्टेंबर.
शेजारचे काका आपल्या मित्रमंडळात सभ्य म्हणून प्रसिद्ध आहेत. काकांना कधीही, कुणीही परस्त्रीकडे वाकड्याच काय, सरळ नजरेनंही बघताना पकडलेलं नाही. काकांचं वर्तन बघून काका गे असल्याचा संशयही काही तरुण मुलांनी व्यक्त केला होता. काकांसमोर असं सगळं बोलण्याची परवानगी काकांनी त्यांच्या तरुण मित्रांनाही दिलेली आहे. काकांनी पोरांना समजावायचा प्रयत्न केला. "माझं वय पाहा. आमच्या काळी असं परस्त्रियांकडे बघणं अत्यंत असभ्य समजलं जात असे. भलत्या बाईकडे बघितलं तर माझ्या शीलाला धक्का पोहोचणार नाही का", असं म्हणून काकांनी मित्रांकडे टाळी मागितली!
- Read more about शेजारचे काका इन्स्टावर खऱ्या बायका बघून चाळवले
- 4 comments
- Log in or register to post comments
- 4678 views
गणिताच्या निमित्ताने – भाग ५
('ज्या विषयात मी कधीच संशोधन केले नव्हते त्या विषयात एका विद्यार्थ्याचा वाटाड्या मला बनायचे होते.' प्रा. बालमोहन लिमये, पीएच. डी.च्या आपल्या पहिल्या विद्यार्थ्याविषयी. त्याशिवाय या भागात, रंगीत नकाशाचा प्रश्न : नकाशा रंगवायला किती रंग लागतील?
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about गणिताच्या निमित्ताने – भाग ५
- 18 comments
- Log in or register to post comments
- 14996 views
गणपती दर्शनाच्या निमंत्रणामुळे शेजारचे काका संतप्त
बंगळुरु, १० सप्टेंबर.
शेजारचे काका आपल्या नास्तिक असण्याबद्दल अत्यंत जागरुक आहेत. काकांच्या बायकोला मराठी शेजाऱ्यापाजाऱ्यांकडून गणपती दर्शनाचं आमंत्रण आल्याचं त्यांनी काकांना सांगितलं. काका तेव्हापासून अत्यंत संतप्त झाले आहेत. "त्यांना आपल्या ... आपल्या भावनांची कदर नाहीये. म्हणजे आपल्याला भावना नाहीत, हे आपल्याला माहीत आहे. पण हे त्यांना माहीत नाहीये. आपल्या भावना त्यांच्यापेक्षा निराळ्या आहेत याची त्यांना जाणीवच नाहीये. मला नंबर दे त्या सगळ्यांचे! मी त्यांना रिचर्ड डॉकिन्सच्या वाढदिवसाच्या मीटपलाच बोलावतो."
- Read more about गणपती दर्शनाच्या निमंत्रणामुळे शेजारचे काका संतप्त
- 5 comments
- Log in or register to post comments
- 4665 views
गणिताच्या निमित्ताने – भाग ४ [गणितविभागाचे प्रमुख: प्राध्यापक मनोहर वर्तक]
आपण कोणतेही लहान-मोठे चांगले काम केल्यानंतर आता आपला सहभाग संपला असे मानून नामानिराळे रहाणे ही वर्तकसरांची सहजप्रवृत्ती होती. आय. आय. टी. मुंबईतील गणितविभागाचा कायापालट करणारे आणि विद्यार्थी, शिक्षक व संशोधकांना प्रिय असणारे प्राध्यापक वर्तक यांचे मनोज्ञ चित्रण.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about गणिताच्या निमित्ताने – भाग ४ [गणितविभागाचे प्रमुख: प्राध्यापक मनोहर वर्तक]
- 31 comments
- Log in or register to post comments
- 22137 views
गणितज्ञांच्या इतिहासातील (काही) सोनेरी पाने...4
अखंड हिंदुस्तानचा नकाशा बघून शेजारच्या काकांची झाली निराशा.
मेंफीस, अमेरिका, ४ सप्टेंबर.
- Read more about अखंड हिंदुस्तानचा नकाशा बघून शेजारच्या काकांची झाली निराशा.
- 24 comments
- Log in or register to post comments
- 11018 views
असाही एक कवितेचा दिवस
एखाद्या सकाळी तुम्ही जागे होता. आणि तुमच्या नेहमीच्या सरावलेल्या कामाला लागता, ते म्हणजे - Brooding. हे अर्थात रुसणं, चिडलेलं असणं, नाराज असणं, स्वत:शी नकारात्मक बोलणं यात तुम्ही इतके पारंगत झालेले असता म्हणुन सांगू - की तुमच्या लक्षातही येत नाही आपण स्वत:वरती, जगावरती इन फॅक्ट आपल्याला झेलणाऱ्या आपल्या प्रियजनांवरती नाराज आहोत. अहो का म्हणुन का विचारता - नेहमीचं अगदी सवयीचं असतं ना ते. शिवाय कित्ती कित्ती सोईस्कर!! एकदा चिडीला आलेलं असलं की लोक आपल्याला एकटं सोडतात. बद्ध्कोष्ठ झाल्यासारखा आपला चेहरा पाहून कोणी आपल्याशी बोलायला धजावत नाही.
- Read more about असाही एक कवितेचा दिवस
- 11 comments
- Log in or register to post comments
- 4053 views
गणिताच्या निमित्ताने – भाग ३
प्रा. बालमोहन लिमये यांच्या साप्ताहिक लेखमालेचा पुढील भाग : ‘बघ आज एक नवीन महाराष्टीयन तरूण आपल्या विभागात कामाला लागतोय. तू त्याच्याशी लग्न का नाही करत?’ आता आपल्या पीएच. डी.च्या मार्गदर्शकाने घाटच घातला आहे, तर हा कोण ‘संप्रति नवा पुरूषावतार’ गणित विभागात रुजू झाला आहे, तो बोलतो-चालतो कसा याबद्दल निर्मलाला कुतूहल वाटणे ओघानेच आले. म्हणून तिने डोकावले होते मी शिकवत असलेल्या वर्गात!
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about गणिताच्या निमित्ताने – भाग ३
- 13 comments
- Log in or register to post comments
- 12970 views
शेजारच्या काकूंनी केसांबद्दल चौकशी न केल्यामुळे नवीन शेजारी त्रस्त
नौपाडा, २ सप्टेंबर.
जोशी कुटुंबीय हल्लीच डोंबिवलीहून नौपाड्याला राहायला आले. डोंबिवलीहून फक्त ठाण्यात नाही, तर नौपाड्यावर राहायला आल्यामुळे डोंबिवलीत त्यांच्या शेजाऱ्यापाजाऱ्यांनी जोशी कुटुंबासाठी त्यांच्या सोसायटीच्या गच्चीवर खास जेवणावळ घातली होती.
- Read more about शेजारच्या काकूंनी केसांबद्दल चौकशी न केल्यामुळे नवीन शेजारी त्रस्त
- 8 comments
- Log in or register to post comments
- 5052 views