Skip to main content

शेजारच्या काकू ठरल्या 'संध्यानंद - पर्सन ऑफ द ईअर'

मराठी संकेतस्थळांच्या जीवघेण्या बुलेटीन बोर्ड स्पर्धेत सतत पंधरा पंधरवडे स्थान मिळाल्याने शेजारच्या काकूंना मानाचा 'संध्यानंद पर्सन ऑफ द ईअर' हा पुरस्कार जाहीर झाला आहे. रोख एक लाख डोजकॉईन्स, सन्मानचिन्ह आणि पुणेरी पैठणी असे ह्या पुरस्काराचे स्वरुप आहे. काकूंना हा पुरस्कार लवकरच पॉलो अ‍ॅल्टो ग्रामपंचायत कार्यालयात श्री. अभिजीत बिचकूले ह्यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. आपल्याला पुरस्कार जाहीर झाला आहे ह्याची काल संध्याकाळपर्यंत काकूंना कुठल्याही प्रकारची कल्पना नव्हती.

गणिताच्या निमित्ताने – भाग १० [फर्माचे विधान]

फर्माचे विधान सिद्ध करण्यासाठी जगभरातले गणितज्ञ तीनशेहून अधिक वर्षे झगडत होते. त्यामागचा चित्तथरारक घटनाक्रम – प्राध्यापक बालमोहन लिमये यांच्या साप्ताहिक लेखमालेतील पुढील भाग.

ललित लेखनाचा प्रकार

आभाळाच्या फळ्यावर

धूमकेतूच्या खडूने
आभाळाच्या फळ्यावर
काहीबाही लिहीण्याची
होता ऊर्मी अनावर

चांदण्यांच्या ठिणग्यांची
घेतो मदत जराशी
चित्रलिपी सजविण्या
लिहीतो मी जी आकाशी

रात्र होते जशी दाट
तशा काही अनवट
मिथ्यकथा नक्षत्रांच्या
उजळती माझी वाट

झळाळते तेजोमेघ
गूढ कृष्णविवरांशी
बोलताना, जोडतो मी
नाळ आकाशगंगेशी

भेट विराटाशी थेट
माझ्या नक्षत्रभाषेची
रोमरोमातून तिच्या
रुणझुण ये सूक्ष्माची

लागे उगवतीपाशी
जेव्हा उषेची चाहूल
माझ्या नक्षत्रभाषेची
फिकटते चंद्रभूल

"पुण्यातील कोजागिरी"

चंद्र चंद्र जाणा/ असे मोठा मंत्र
काय त्याचे तंत्र / ओळखावे
चंद्र-दर्शनाने / वेड ते वाढते
डोक्यात चढते/ ब्रम्ह-रूप
गच्चीवर जमू / आम्ही ब्रह्ममत्त
सतरंजी फक्त / एक पुरे
पुण्यामाजी जाला / सण तो महान
स्कॉचची तहान / दुधावरी

गणितज्ञांच्या इतिहासातील (काही) सोनेरी पाने...7

केऑस(अनागोंदी) मधील सुसंगतीच्या शोधात

Chaos often breeds life, when order breeds habit.
-Henry Adams

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

शेजारच्या काकूंच्या विनोदावर कुणीही चिडले नाहीत.

फेसबुक, ३ ऑक्टोबर

शेजारच्या काकूंनी दसऱ्याचं निमित्त साधून, अनेक वेगवेगळ्या लोकांच्या वृत्तींची टिंगल करणारा विनोद लिहिला.

गणिताच्या निमित्ताने – भाग ९

चेकोस्लोव्हाकिया – लोखंडी पडद्यामागे डोकावताना; आणि गोष्ट एका विचक्षण विद्यार्थ्याची – प्राध्यापक बालमोहन लिमये यांच्या साप्ताहिक लेखमालेतील पुढील भाग.

ललित लेखनाचा प्रकार

अन्नपूर्णा देवीचं पुस्तक वाचून शेजारच्या काकू निराश

बिबवेवाडी, पुणे, १३ ऑक्टोबर.

करोनाकाळातल्या लॉकडाऊनमध्ये शेजारच्या काकूंनी अनेक वेबिनार मनापासून बघितले. तेव्हापासून त्यांना नवनवीन पुस्तकं वाचून, परंपरा पुन्हा शोधण्याची इच्छा निर्माण झाली. परंपरांबद्दल अधिक माहिती करून घ्यायची म्हणून त्यांनी पुस्तकं वाचायची ठरवली. आणि पुस्तकांची दुकानं उघडल्यापासून त्यांना खूपच आनंद झाला.

बिबवेवाडीत ॲमेझनची डिलिव्हरी मिळत असली तरी प्रत्यक्ष दुकानात जाऊन काकूंनी पुस्तक विकत घ्यायचं ठरवलं. दुकानात समोरच अन्नपूर्णादेवी असं नाव लिहिलेलं पुस्तक त्यांनी बघितलं आणि उत्साहानं ते घेऊन काकू घरी आल्या.