इतर

न्यूनगंड... कोंडमारा...घुसमट...लोकापवादाचे भय...

न्यूनगंड हा एकप्रकारचा शत्रू असल्यागत आहे. असल्यागत म्हणजे ज्यांनी त्यांच्यावर मात केली नाही त्यांच्यासाठी. बहुतेक वेळा करतच नाहीत.
का येतो न्यूनगंड? आपल्या भोवतालच्या लोकांमुळे, लोकापवदाच्या भयामुळे, परिस्थितीमुळे. पण मुख्य कारण लोकांमुळेच. तेच हे परिस्थिती, भय निर्माण करतात.
न्यूनगंडाचे मला माहित असलेले प्रकार/कशाकशामुळे येऊ शकतो
स्वत:च्या रंगाबद्दल
शरिराबद्दल
व्यंग्याबद्दल
स्वभावाबद्दल / वागण्या /असण्या / बोलण्याबद्दल
परिस्थितीमुळे...
टिका/टिपन्नी

ललित लेखनाचा प्रकार: 

दुबई : अरेबियन मयसभा !

पहाटे चार वाजून वीस मिनिटांच्या दुबई फ्लाईटसाठी साडेबारा वाजता चेक इन करून आम्ही टुरीस्ट मंडळी झोपेच्या खोबरी वड्या करत बसलो.आमच्या गेटटुगेदर ग्रुपचा हौशी ' फोटो उन्माद' कयामत तक पोहोचला होता.त्यामुळे डुलकी घेत असल्याचं भासवताना खरच छोटीशी डुलकी लागून घात झाला. सेल्फी ब्रूम स्टिकी चेटकिणी, निष्पाप डुलकीचा फोटो काढून खुनशी खिदळू लागल्या. त्यामुळे मोठ्या गृपाप्रती आधीच असलेलं वैराग्य अतोनात वाढीस लागल.त्या काळ्या पहाटे विमानात बसल्यावर शरीर इतक आक्रसून, आंबून गेलं की खुर्च्यांच्या पॅसेजमध्ये देह ठेवायची उर्मी दाटून आली.

ललित लेखनाचा प्रकार: 

भयभीत

"भयभीत"

बेडवर पडल्यानंतर तिच्या नाजूक कपाळावर हलकेच ओठ टेकवून मी तिचा पापा घेतला आणि झोपेच्या स्वाधीन झालो !

मोबाईलच्या स्क्रिनवर नेहेमीप्रमाणे सराईतपणे स्क्रोलींग करणारी माझ्या हाताची बोटं आज थरथरत होती, काहीशी जडही पडली होती. निरागसपणे माझ्याकडे एकटक बघणारे ते हरिणीसारखे सुंदर डोळे मला काहीतरी प्रश्न विचारत होते.. तिच्या त्या भेदक नजरेनं माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं.. तिच्याशी नजरानजर होऊ नये यासाठी मी प्रयत्न करत होतो पण तेही मला जमत नव्हतं. विषण्ण आणि अगतिक झालेला मी.. शेवटी मोबाईल बंद करून समोर बघितलं.

ललित लेखनाचा प्रकार: 

सुष्ट-दुष्ट

"को S हम" प्रश्न सनातन आहे असे म्हणतात. पण मला तरी जवळ जवळ त्या प्रश्नाइतकाच सनातन प्रश्न जो वाटतो तो म्हणजे - जगामध्ये "खल प्रवृत्ती चे अस्तित्व का आहे?"

ललित लेखनाचा प्रकार: 

त्या दिवशी ...!!

त्यादिवशी……!!
तुझ्या तशाचं माझ्या ही चटावलेल्या
डोळयांना एकमेंकाना भीडता आलं
नाही.
पावलांवर पावलं पडतं होती.
पण तुला अडखळता
अन
मला ही ओंलडता आलं नाही.
उरातलं सारचं ओठात आलेलं….
पण तुझ्या तशाचं माझ्या ही
शब्दांना नेहमीचं गददारपण सोडता
आलं नाही.
वारा आला.
तुझी ओढणी उडाली.
अन तुझं ते सुंदर लाजणं
तुला लपवता आणि मला पहाता
आलं नाही.
तुला तसचं मला ही माहीत होतं
पुन्हा कधीचं आपली भेट ही
होणार नाही.
तरी तू…….
जात होतीस अगदीचं निशब्द……
मी हातांनी केलेला बाय

ललित लेखनाचा प्रकार: 

स्मॉश: बाष्कळ, आचरट आणि तूफान मजेशीर!

नवीन नवीन फास्ट इंटरनेट जेव्हा घरी आलं तेव्हा युट्यूब ह्या प्रकाराशी ओळख झाली. नेहमीप्रमाणे युट्यूबने रेकमेंडेड मधून कचरा ओतण्यास सुरूवात केली तेव्हाच कळलं की इथे फोकसचा म्याटर आहे. जे पहाल तसंच दिसत राहील. एआयबी, टीव्हीएफशी ओळख झाली होतीच. त्यात आणखी रसेल पीटर्स. कॉमेडी हे चांगलंच जंक दृश्यखाद्य आहे हे कळलं आणि त्याचा शोध सुरू झाला. ह्यात मिळालं स्मॉश. त्यांचा पहिला व्हिडीओ आहे 'मोलेस्टर मून.'

ललित लेखनाचा प्रकार: 

माध्यमांतर– "एपिक" धर्मक्षेत्र: द्रौपदी एपिसोड!

सूचना: आरंभ या जानेवारी २०१८ पासून सुरु झालेल्या ई-मासिकातील फेब्रुवारी अंकातील माझा हा अभिनव प्रयोग - माध्यमांतर खास येथे मायबोलीच्या वाचकांसाठी देत आहे! टीव्ही एपिसोड लिखित स्वरूपात म्हणजे माध्यमांतर! दृकश्राव्य माध्यम ते छापील माध्यम!

आरंभ येथून डाउनलोड करता येईल: https://play.google.com/store/apps/details?id=com.marathi.magazine.aarambh

ललित लेखनाचा प्रकार: 

‘बटरफील्ड 8.’ सर्वस्वी एलिझाबेथ टेलरचा चित्रपट...

हॉलीवुडच्या नायिकेचा आशावाद

अविस्मरणीय हॉलीवुड

रवींद्र दत्तात्रय तेलंग

नवरा कसाहि असला तरी त्याच्याच सोबत आपलं संपूर्ण आयुष्य काढण्याची भाषा करणारी बायको, फक्त भारतीय चित्रपटांमधेच नव्हे, तर हॉलीवुडच्या चित्रपटांमधे सुद्धा नायिकांनी रंगवली आहे. नवरा बाहेरच्या बाईच्या नादी लागला तरी त्याची सेवा करून त्याला वठणीवर आणण्याची भाषा देखील प्रसंगी नायिका करतांना दिसतात. नवरा किती ही वाईट असला तरी आपल्या चित्रपटांचा शेवट मात्र गोड होतो. हॉलीवुडचं वेगळेपण इथेच ठळकपणे नजरेत भरतं.

ललित लेखनाचा प्रकार: 

गीतेतील विशिष्ट ७ श्लोक आणि त्यांचे परस्परसंबंध

भगवदगीतेतील मोक्ष, देव देवता आणि परमेश्वर या संदर्भातील विविध अध्यायातील काही (एकमेकांशी परस्पर संबंध असणाऱ्या) श्लोकांचा एकत्रित सलग भावार्थ
- गीतेवरील विविध पुस्तकांवर आधारित

प्रथम सगळे श्लोक पाहूया:

भगवद्गीता: अध्याय २ श्लोक ४६
|| यावानर्थ उदपाने सर्वत: संप्लुतोदके ||
|| तावान्सर्वेषु वेदेषु ब्राम्हणस्य विजानात: ||

भगवद्गीता: अध्याय २ श्लोक ५६
|| दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः ||
|| वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ||

ललित लेखनाचा प्रकार: 

पुस्तक परीक्षण: "असा होता सिकंदर"

पुस्तक परीक्षण: "असा होता सिकंदर"
लेखिका: इंद्रायणी सावकार
रिया पब्लिकेशन
अजब डीस्ट्रीब्युटर्स


सूचना:

अलेक्झांडर = सिकंदर
पोरस = पुरू = पुरुषोत्तम = पौरव देशाचा राजा
चाणक्य = कौटिल्य = विष्णुगुप्त

परीक्षण:

नुकतेच "असा होता सिकंदर" हे पुस्तक मी वाचून पूर्ण केले.
लेखिका "इंद्रायणी सावकार" यांची "लेखनशैली" काय वर्णावी? एकदम अद्भुत अशी शैली!

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - इतर