सामाजिक

कसाब आणि चाळीस कोटी रुपये...

Taxonomy upgrade extras: 

कसाबवर चाळीस कोटी रुपये खर्च आला असं आपण सर्रास ऐकत असतो. त्याला जेवायला बिर्याणी दिली त्यावरही जनता खार खाऊन असते. आणि 'अशा नराधमाला बिर्याणी खायला घालून पोसलं तर चाळीस कोटी रुपये खर्च येणारच' असा काहीतरी विचार होतो. आता रोज बिर्याणी खायला घालूनही वर्षाला दहा कोटी रुपये खर्च येणार नाही हे उघड आहे. मग प्रश्न असा येतो की हा चाळीस कोटीचा आकडा नक्की कुठून आला?

देवाला रिटायर का करा?

Taxonomy upgrade extras: 

देवला रिटायर करा असा घोषा अनेक लोक लावत असतात.देव ही संकल्पना फोल आहे असे नक्की कोणत्या कारणामुळे अनेकांना वाटत असावे?अनेकदा असे वाटते की अशा मंडळींची तक्रार देवाविरूध्द नाही तर देवाच्या नावाने चालू असलेल्या पूजा-अर्चा आणि कर्मकांडे (त्यातही ओ माय गॉड चित्रपटात दाखविल्याप्रमाणे हजारो लीटर दूधाची नासाडी याप्रकारच्या गोष्टी) या गोष्टी फोल आहेत असे मत बनले तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे फारसे काही आहे असे वाटत नाही.

कसाब आणि इतर दहशतवादी

Taxonomy upgrade extras: 

कसाबच्या फाशीनंतर लोकसत्तेतला अग्रलेखः
http://www.loksatta.com/sampadkiya-news/hang-till-death-cheating-12785/

इथे फाशीची शिक्षा असावी का नसावी याचा विचार करत नाही. अग्रलेखाची सुरूवात, कसाबला शिक्षा झाली हे योग्यच, हे मान्य आहे. पण त्यापुढचे मुद्दे फारच हुकलेले वाटले.

१. कसाब आणि बाकी तीन गुन्हे एकाच तीव्रतेचे मानावेत का?

दिवाळी अंक आणि टेलिव्हिजन सिरियल्स

Taxonomy upgrade extras: 

'दिवाळी अंक हे मराठी उच्च मध्यमवर्गीयांच्या टेलिव्हिजन सिरियल्स आहेत' अशा आशयाचं मत नुकतंच फेसबुकावर वाचण्यात आलं. तथाकथित सुसंस्कृत-गोग्गोड-खवा अभिरुचीला जोरदार धक्का, या प्रकारच्या अभिरुचीच्या केवळ संख्याबळावर चालवलेल्या मक्तेदारीला विरोध आणि काही प्रमाणात तथ्यांश - हे सगळं जमेस धरूनसुद्धा हे विधान काहीसं मानभंगकारक वाटलं.

नाती रक्ताची!

Taxonomy upgrade extras: 

रक्ताच्या नातींची ओझे वाहण्याची सक्ती का म्हणून सहन करावे?

धर्म आणि नीतिमत्ता

Taxonomy upgrade extras: 

आज सकाळी सकाळीच ही बातमी वाचनात आली आणि पुन्हा धर्माच्या नावाखाली चाललेल्या अघोरी प्रकारामुळे तळतळाट झाला.

माझ्या मायेचं भवितव्य

Taxonomy upgrade extras: 

महाराष्ट्रातील एकूण मराठी शाळांची संख्या अन त्यातल्या मुलामुलींची पटसंख्या याबाबत हे संस्थळ पाहण्यात आले. संस्थळ-चालकांचा उपक्रम स्तुत्यच आहे पण एकूण संस्थळावरील माहिती वाचून काळजात कुठेतरी लक्क झाले. आजवर दिसत असलेली पण त्यांचा अर्थ मनापर्यंत न पोचलेली काही सत्ये नजरेसमोर आली. चिकित्सकपणे पाहिले तर दिसते की नुसतीच मराठी शाळांची संख्या कमी झाली आहे असे नसून या शाळांमधील शिक्षणाचा दर्जाही खालावला आहे.

ब्रेन गेन की वाढते ओझे?

Taxonomy upgrade extras: 

बीबीसी वर भारतात परतणार्‍या व्यक्तिंपैकी काहिंच्या निवडक प्रतिक्रीयांचे संकलन केलेला लेख वाचनात आला. हे संकलन इथे वाचता येईल.
सदर लेखाच्या मते, अनेक परदेशस्थ भारतीय भारताच्या प्रगतीच्या वेगाकडे पाहून भारतात परतत आहेतच, त्याच बरोबर काही परदेशात जन्मलेल्या - मुळ भारतीय वंशाच्या व्यक्तीही भारतात येऊ लागल्या आहेत. भारताने ज्यांचे आई वडील किंवा आजी आजोबा भारतीय नागरीक असतील अश्या परदेशी नागरीकांना 'आजीवन भारतीय व्हीजा' देण्याचे धोरण २००५ मध्ये अमलात आणल्यापासून साधारण ११लाख परदेशी नागरीकांनी त्याचा लाभ घेतला आहे.

हिंदी सिनेमातली स्त्री-प्रतिमा उलटीपालटी करणारा 'अय्या'

Taxonomy upgrade extras: 

आदिमाया, स्त्रीशक्ती वगैरे शब्दांचा येते नऊ दिवस आपल्यावर मारा होणार आहे. पण आदिमायेची सगळीच रुपं काही आपल्या सोयीची नसतात. मलालावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करायला अनेकजण पुढे येतात (ते योग्य आणि गरजेचंच आहे), पण 'बलात्कार थांबवण्यासाठी अल्पवयीन मुलींची लग्नं लावून द्या' असं म्हणणारे, किंवा 'पबमध्ये जाणारी बाई चवचालच असते' असं म्हणणारे लोकही आपल्याकडे आहेत. या पार्श्वभूमीवर हिंदी सिनेमातली सोयीची आणि सवयीची स्त्रीप्रतिमा बदलण्याच्या एका प्रयत्नाची घेतलेली ही एक दखल आहे. हे 'अय्या'चं एका विशिष्ट अंगानं केलेलं सामाजिक विश्लेषण आहे; ती सिनेमाची समीक्षा नाही.

‘पुस्तक परिचय आणि पुस्तक परीक्षण’

Taxonomy upgrade extras: 

रंगमुद्रा - माधव वझे... ह्या पुस्तकाचा परिचय वाचून माझ्या एका मित्राने ‘पुस्तक परिचय आणि पुस्तक परीक्षण’ ह्यातील फरक स्पष्ट करण्यास सांगितले. त्याला जे सांगितले ते इथेही चर्चाविषयात द्यावेसे वाटले. मी एक वाचक आहे, साहित्याची रूढ अर्थाने अभ्यासक नाही.
मी लिहिले ते असे ---
"परिचय म्हणजे एक तोंडओळख... ह्या पुस्तकात काय आहे, बस्स! आणि परीक्षण म्हणजे त्या पुस्तकात जे आहे त्याविषयी मला काय वाटते? परिचयाने एक वाचक म्हणून माझे मनोरंजन झाले, मला नवीन माहिती मिळाली. परीक्षण करताना आपल्यातील अभ्यासक जागा असणे....

पाने

Subscribe to RSS - सामाजिक