सामाजिक

वाचनानुभव!

Taxonomy upgrade extras: 

‘मी का वाचते?’ ह्याचा विचार करताना जाणवले ते असे ---
२००४ साली वाचनाला नव्याने सुरूवात झाल्यापासून आजपर्यंत, जवळ-जवळ प्रत्येक पुस्तक वाचताना नकळतपणे मी स्वत:शी भिडत आले. इथे ‘स्वत:’ म्हणजे निव्वळ ‘मी’ नसून त्यानिमित्ताने एकंदरीत आपल्याभोवतीची परिस्थिती-घटना-माणसे-इ. कडे बघण्याची नवी नजर मिळत राहिली, प्रत्येक वाचनातून !!!

गुवाहाटी आणि बागपत

Taxonomy upgrade extras: 

गेल्या काही दिवसात आपल्याच देशात अशा काही घटना घडल्या आहेत ज्यामुळे कोणाही सुसंस्कृत भारतीयाची मान शरमेने खाली जाईल आणि संतापाचे अंगार दाटून येतील.आणि दुर्दैवाने आपण त्याविषयी काहीही करू शकत नाही म्हणून हळहळ व्यक्त करण्याशिवाय फारसे काही करू शकणार नाही.

माता वाक्यम् प्रमाणम्।

Taxonomy upgrade extras: 

ऋजुता दिवेकर यांचे 'Don't lose your mind, lose your weight' या पुस्तकाचं मराठी भाषांतर 'वजन कमी करा, मनःशांती नाही' नामक पुस्तक अर्ध्याधिक वाचलं. वाचण्याचं कारण भोचक उत्सुकता. ऋजुताच्या भक्तगणात झिरो फिगरवाली करीना, अलिकडच्या काळात पिळदार स्नायू दाखवणारा सैफ हे तर आहेतच. शिवाय इतर प्रसिद्ध लोकांमधे अनिल अंबानी, इ. लोकं आहेत. मला या पुस्तकाबद्दल कुतूहल असण्याचं कारण हे प्रसिद्ध लोकं नसून या पुस्तकाचा होणारा हातोहात खप हे आहे. सामान्य लोकांना या पुस्तकात काय एवढं आवडतं असा मला पडलेला प्रश्न होता आणि आहे.

माहिती अधिकार आणि खोडसाळपणा

Taxonomy upgrade extras: 

आज महाराष्ट्र टाईम्समध्ये ही बातमी वाचनात आली.

त्याच बातमीत पहिल्या परिच्छेदात गांधींबद्दलही असाच प्रश्न विचारला गेल्यावर असेच उत्तर मिळाल्याचा उल्लेख आहे.

ज्या गोष्टींचे सरकारी रेकॉर्ड असण्याची जराही शक्यता नाही अशी माहिती माहितीच्या अधिकारात विचारून त्याचे अपेक्षित उत्तर येताच त्यावर "फुले, शाहू, आंबेडकरांच्या नावाने केवळ मतांचा जोगवा मागणाऱ्या एकाही लोकप्रतिनिधीला याबाबत कधी पुढाकार घ्यावासा वाटला नाही," वगैरे छातीपिटू लेखन करण्यासाठीच (कदाचित फेसबुकवर शेअर करण्यासाठी) हे प्रकार केले जात आहेत हे उघड आहे.

पिंकी प्रामाणिक

Taxonomy upgrade extras: 

पिंकी प्रामाणिक या नावाच्या खेळाडूने सध्या धुमाकुळ घातला आहे. खरे तर तीने धुमाकुळ घातला आहे म्हणण्यापेक्षा मिडीयाने घटनांना धुमाकुळाचे रूप दिले आहे. पिंकी ही भारताला राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळवून देणार्‍या चमुतील एक खेळाडू. एक भारतीय नागरीक आणि सर्वात मुख्य म्हणजे एक 'माणूस'! तिच्यावर एका महिलेने बलात्काराचा (लग्नाचे वचन देऊन फसवल्याचा) आरोप केला आहे व पिंकी ही स्त्री नसून पुरूष आहे असाही दावा केला आहे. या दाव्याची सत्यता पडताळणे हे कोर्टाचे कामच आहे आणि ते झालेच पाहिजे.

हुच्चभ्रु इतरांना व्यसनी बनवतात का ?

Taxonomy upgrade extras: 

नुकतेच एका संस्थळावरती असे वाचनात आले, की हुच्चभ्रु लोक्स सामान्य लेखकांना / सामान्य लोकांना आपल्या घरी जेवायला बोलावतात आणि दारू ढोसण्याचा आग्रह करतात. अशाने आंतरजालावरील एक सामान्य लेखकांची अथवा सामान्य लोकांची पिढीच ते वाम मार्गाला लावत आहेत हे त्यांना जाणवत नाही का ? 'ऐसी अक्षरे हे हुच्चभ्रु लोकांचे हुच्चभ्रु संस्थळ आहे' अशी वार्ता मध्ये एका विहिरीच्या काठावरती बेडूक पकडत असताना कानावरती पडली. त्यामुळे हा चर्चा प्रस्ताव इथे मांडण्याचे धाडस करीत आहे.

सर्वात महत्त्वाचा प्रश्न :-

हुच्चभ्रु म्हणजे नक्की कोण ? त्यांची व्याख्या काय ?

उपप्रश्न :-

झेनोच्या कासवाची रेस

Taxonomy upgrade extras: 

ग्रीक साम्राज्यातील अथेन्स शहरात त्या दिवशी जल्लोश होता. अथेन्स शहरातील एकूण एक श्रीमंत (व त्यांच्या fashionable बायका!) रेसच्या मैदानावर गर्दी करत होते; गप्पा मारत होते; हसत खिदळत होते. कारण आजची रेस अत्यंत वेगळ्या प्रकारची होती. यापूर्वी याच मैदानावर कित्येक प्रकारचे चित्तथरारक खेळ त्यांनी पाहिले होते. भुकेले वाघ - सिंह बघता बघता गुलामांना खाल्लेले दृश्य, गुलामांच्या आपापसातील जीवघेण्या कुस्त्या, घोड्यांच्या पायाला कोवळ्या मुलांना बांधून त्यांच्या रक्तांची चिळकांडी उडेपर्यंत पळवलेल्या घोड्यांची शर्यत, जिवंत माणसाला उभे करून केलेला भालाफेक, थाळीफेक, रथांची शर्यत....

"प्रयास" वरून आठवलं....

Taxonomy upgrade extras: 

आत्ताच प्रयास (http://www.misalpav.com/node/22102) वाचला. ओपरा विन्फ्रे बद्दलचा एक धागा आठवला .(http://www.misalpav.com/node/15853)
विलक्षण आयुष्य, विलक्षण घटना. अधिक काय बोलणार.

.

Taxonomy upgrade extras: 

.

खादाडीच्या जागा सुचवा

Taxonomy upgrade extras: 

नमस्कार मंडळी,
मला सध्या मुंबईतील काही विशिष्ट प्रकारच्या खानावळींची/भोजनालयांची माहिती हवी आहे, जेथे नेहमीपेक्षा वेगळे पदार्थ मिळतील. तुम्हाला जर अशा काही खानावळी वा भोजनालये माहीत असतील, जेथे भारतातील विविध प्रातांतील पाकसंस्कृतींतील अस्सल पदार्थ मिळू शकतील, उदा. बंगाली, काश्मिरी इ. तर कृपया अशा भोजनालयांची नावे सुचवा. भारताबाहेरील आणि अनवट अशा पाकसंस्कृतींना वाहिलेल्या भोजनालयांचीही नावे चालतील.

आगाऊ धन्यवाद.
राधिका

पाने

Subscribe to RSS - सामाजिक