सामाजिक

चिपळूणचे संमेलन आणि पाच शक्यता

Taxonomy upgrade extras: 

कोकणातील चिपळूण येथे ११ ते १३ जानेवारी २०१३ या काळात होणारे ८६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेल ह. मो. मराठे यांच्या एका पत्रकाने वादात सापडले आहे. ब्रिगेडने संमेलनाच्या मैदानात उडी घेतल्यामुळे हे संमेलन होईलच याची आता कोणालाही खात्री राहिलेली नाही. पण हे संमेलन व्हावे, असे सर्वसामान्य मराठी रसिकांस वाटते. संमेलन निर्विघ्न व्हायचे असेल, तर तीन प्रमुख अटी संभाजी ब्रिगडने घातल्या आहेत. त्या अशा :

१. ह. मो. मराठे यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी.
२. ह. मो. मराठे यांनी जाहीर माफी मागावी.
३. मराठे यांनी जारी केलेले आपले वादग्रस्त पत्रक मागे घ्यावे.

अश्वलायन गृह्यसूत्र

Taxonomy upgrade extras: 

श्रीमती सुप्रिया जोशी यांचा ‘मी वाचलेला एक भयंकर ब्लॉग' हा लेख वाचला. ‘अश्वलायन गृह्यसूत्र' काय आहे, असा असा प्रश्न त्यांनी या लेखात उपस्थित केला आहे. श्रीमती जोशी यांच्या लेखावर येथे भरपूर चर्चाही झाल्याचे दिसले. तथापि, ‘अश्वलायन गृह्यसूत्र' नेमके काय आहे, याची कोणतीही चर्चा झाल्याचे मला आढळून आले नाही. त्यामुळे या सूत्राची थोडक्यात माहिती येथे देत आहे.

सूत्रग्रंथ म्हणजे काय?

काही मुद्दे / प्रत्युत्तर

Taxonomy upgrade extras: 

मी वाचलेला भयंकर एक ब्लॉग या चर्चेतलं तेंडुलकरांच्या नाटकांसंदर्भातलं रोचक अवांतर वेगळं काढलं आहे.

मी वाचलेला भयंकर एक ब्लॉग

Taxonomy upgrade extras: 

अनिता पाटील नावाच्या एक महिलेचा ब्लॉग मी वाचला. ब्लॉग अभ्यासपूर्ण वाटला. म्हणजे किमान लेखन अभ्यासपूर्ण आहे, हे दिसेल याची खबरदारी लेखिकेने घेतलेली दिसली. या ब्लॉगवरील मजकूर धक्कादायक आहे. गोमांस भक्षक ब्राह्मण या विषयावरीलच लेख तर भयंकरच आहेत. या विषयावर एकूण चार-पाच लेख ब्लॉगवर आहेत. हे लेख वाचून मला भोवळच आली. प्राचीन काळी ब्राह्मण गोमांस खात असत, असे ह्याच्यातील प्रत्येक लेखात वारंवार सांगितले गेले आहे. तसा दावा करण्यात आला, असे म्हणणे अधिक योग्य राहील. प्राचीन काळातील ब्राह्मणांचे गोमांस भक्षण सिद्ध करण्यासाठी पाटील बार्इंनी संस्कृत भाषेतील असंख्य श्लोक लेखात दिले आहेत.

चिल्लर पार्टी

Taxonomy upgrade extras: 

पुण्यात मुंढवा रोडवरील ' हॉटेल रिव्हर व्ह्यू ' मध्ये झालेल्या चिल्लर पार्टीच्या सविस्तर बातम्या दोन दिवस न्यूज चॅनेल्सवर झळकत होत्या. त्यानुसार ७०० च्या वर ९ वी ते १२ वी च्या मुलामुलींचा यात समावेश होता. ह्यातली बहुतेक मुले मुली दारू पिऊन स्विमिंग पूल आणि आजूबाजूला डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजात धिंगाणा घालत होती. काही मुलेमुली तर पोलिसांनी धाड टाकली तेंव्हा बोलण्या चालण्याच्या शुद्धीत नव्हती.

फेसबुक , ब्लॅकबेरी मेसेंजर, तसेच माऊथ टू माऊथ पब्लिसिटीमुळे ही पार्टी इतकी रंगली म्हणे.
मला पडलेले काही प्रश्न –

जमिन अधिग्रहण: लॅन्ड अ‍ॅक्विझिशन, रिहॅबिलिटेशन अ‍ॅन्ड रिसेटलमेन्ट बिल

Taxonomy upgrade extras: 

मागे आपण वांग-मराठवाडी धरणग्रस्तांची माहिती इथे वाचली. या विषयाशी अजिबात थेट संबंधीत नसला तरी समांतर असा भुमी अभिग्रहणाचा मुद्दा आहे. नवे 'लॅन्ड अ‍ॅक्वेझिशन' बिल कसे चांगले आहे. त्याचे फायदे, मिळू शकेल असा नवा दर वगैरेवर अनेक बातम्या आपण ऐकतो. अनेक उलटसुलट मत मतांतरे आपण वाचतो. मात्र या क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते / सामाजिक संघर्षातील नेते आणि सरकारातील मंत्री यांच्यातील संवाद साधणारे दोन लेख सध्या द हिंदू मध्ये प्रकाशित झालेले आहेत.

गागाभट्ट : आक्षेप व खंडण

Taxonomy upgrade extras: 

गागाभट्टांनी राजेना छळले

एखाद्याला आरोपीच्या पिंजर्‍यामध्ये उभे करायचे असे ठरवलेच असेल व ज्यावेळी तसे ठरवण्यार्‍याकडील तात्विक मुद्दे संपतात आणि ती खोटी ठरवली जातात अशावेळी त्याचा ताळतंत्र सुटुन कोणत्या थराला जाऊन काय आरोप करेल याचे भान आरोपी ठरवणार्‍याला राहत नाही . आणि हेच काही लोक विसरतात आणि दुर्दैवाने काही अविचारी (विचार करण्याची क्षमता नसलेले किंवा समोरील मुद्दा विचार न करता अभ्यास न करता जशाच्या तसा स्विकारणारे) लोक त्यांचे अनुकरण करतात. त्याहुनही आपले दुर्दैव म्हणजे आपल्या समाजात असे लोक म्हणजे असे अविचारी लोक काही जास्तच प्रमाणात आहेत.

संस्कार

Taxonomy upgrade extras: 

परवा घडलेल्या एका प्रसंगानं डोक्यात ठाण मांडून ठेवलंय. त्यानंतर दररोज तो प्रसंग डोळ्यापुढे येऊन काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय म्हणून तुमच्यासमोर मांडतोय.

जर वाघ्या कुत्रा, तर सिंहगडाचा कोसळलेला कल्याण दरवाजा आणि प्रतापगडाचे कोसळलेले बांधकाम का नाही

Taxonomy upgrade extras: 

संभाजी ब्रिगेड ने वाघ्या कुत्रा फोडल्याचे वृत्त समजले. वाघ्याचा उल्लेख तत्कालीन अथवा उत्तरकालीन कागदपत्रे- अथव बखरिंमध्ये आढळत नाही म्हणुन वाघ्याचा पुतळा फोडण्यात आला . आणि या बातमीचे कोल्हापुरचे इंद्रजीत सावंत यांनी समर्थन केले. याठिकाणी आधीच स्पष्ट करतो की वाघ्याचा उल्लेख तत्कालीन अथवा उत्तरकालीनही कोणत्याही बघर अथवा पुस्तकामध्ये नाही हे मलाही माहीत आहे आणि याठिकाणी विषय वाघ्या अस्तित्वात होता की नव्हता हा इथे नाहीच आहे मूळी . या ठिकाणी संभाजी ब्रिगेड ने वाघ्याचा पुतळा फोडला .. हा विषय आहे.

बौद्धिक प्रगल्भता...

Taxonomy upgrade extras: 

वैचारिक अथवा बौद्धिक प्रगल्भता ही शब्दांचा फक्त उथळ अर्थ घेऊन येत नसते, शब्दांचा नेमका भावार्थ कळणं देखील महत्वाचं असतं...
ज्याप्रमाणे पाण्याचा केवळ पृष्ठभाग बघून त्याच्या खोलीचा नीट अंदाज लावता येत नाही, तसंच काहीसं असतं हे...
दोन-चार ओळींची नीटनेटकी जुळवणी जमली, निबंध किंवा ग्रंथच लिहिला, मोठ-मोठाल्ली पुस्तकं वाचली की माणूस "प्रगल्भ" होतो असा जर तुमचा समज असेल तर मला तो पूर्णपणे मान्य नाहीये... हो, पण याने प्रगल्भ होण्यास हातभार लागेल हे बऱ्यापैकी माझ्या बुद्धीला पटण्यासारखं आहे...

पाने

Subscribe to RSS - सामाजिक