काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट माईलस्टोन: २० जुलै २०१९

१८ नंबरच्या खिडकीवरून फायनली बॅज घेतला.

मोठ्ठा माईलस्टोन!

आत्ता तो पहिल्यासारखा चकचकीत सेक्सी पितळी बिल्ला नाही मिळत Sad

फक्त असं कार्ड मिळतं. ठीकाय हे तर हे...

Badge

२८ नोव्हेंबर २०१६ ते २० जुलै २०१९

अदमासे दोन वर्षं आठ महिने लागले मला बॅज काढायला.

बरं खर्च साधारण: ३२८१ रुपये (एजंट्सकडे रेट १५००० आहे)

सगळी प्रोसेस साधारण अशी होती.

Flowchart

आता ह्या टप्प्यावर आपण जरा "रेट्रोस्पेक्टिव्ह" वगैरे करूया.

तर ह्यातून काय काय शिकलो?

१.

आजकाल पासपोर्ट, लायसन्स इत्यादी कामं पहिल्यापेक्षा बरीच सोप्पी आणि पारदर्शक झालीयत.

शिवाय बऱ्याच गोष्टी ऑनलाईन आहेत.

त्यामुळे माझ्यासारख्या आय. टी. बॅकग्राउंडवाल्या इसमासाठी गोष्टी स्वतःच्या स्वतः करणं आणि थ्रू प्रॉपर चॅनल करणं हे अर्धशिक्षित एजंटच्या हातात देण्यापेक्षा जास्त एथिकलच नव्हे तर लॉजिकलसुद्धा आहे.

२.

सरकारी माणसं सुद्धा को ऑपरेटिव्ह असतात.

फक्त आपल्याला ऋजू + ठामपणा + पेशन्स + प्रांजळपणा ह्याचं योग्य मिश्रण सादर करता यायला हवं.

प्रांजळपणा तर फार महत्त्वाचा:

आपल्याला काय हवंय ते तळतळून सांगितलं तर लोकं नक्की मदत करतात.

केतन, बो##र काका, लोखंडे, शेटे सर अशा सगळ्यांनीच खूप मदत केली त्यांचे मनापासून आभार.

(काही नावं बदललीयत)

३. टॉयलेट्स मात्र सगळीकडे भयाण आहेत!

एकंदरीत टेबलाखालून पैसे न देता इमानदारीत बॅज काढण्याचा प्रयत्न बहुतेक यशस्वी झाला असं म्हणता येईल.

पण...

"बघा तुम्ही सगळे चुत्ये आहात मी कशी कामं केली असा माझा दावा अजिबातच नाही."

कारण सरळ आहे:

सुखवस्तू बॅकग्राउंडमधून आणि शिक्षणातून आणि वर्षानुवर्षं मोठ्या शहरात राहून आलेला आत्मविश्वास आपल्या वर्गाकडे असतोच.

सो "शॉर्टकट्स" जरी मारले नाहीत तरी सगळ्या अधिकाऱ्यांशी मी चटपटीतपणे बोलून लाघवीपणे कामं मार्गी लावू शकलो.

शिवाय ह्या प्रोसेसला तीन एक वर्षं लागली तितकी वाट पहायची माझी तयारी होती कारण ह्या सगळ्यावर माझं पोट अजिबातच अवलंबून नाहीये.

पण एखादा अर्धशिक्षित, गरीब माणूस ह्या सगळ्या ऑनलाईन प्रोसेसला भेदरू शकतो. त्याला एजंटचे आणि कोणाकोणाचे पाय धरावे लागू शकतात हे मान्यच.

खरंतर कुणाला मुंबईतल्या लायसन्ससाठीच्या शंका असतील तर मीसुद्धा मदत करू शकेन एवढा कॉन्फीडन्स आलाय आता.

एनीवेज...

आजचा दिवस मात्र सेलिब्रेट करणार... शिक्रण मटारची उसळ वगैरे Smile

उद्यापासून पुढचा चॅप्टर:

आत्तातर खरा पिक्चर चालू होतोय.

म्हणजे बॅज मिळणं हा सेटअप होता: गँग्ज ऑफ वासेपूर १ सारखा.

टॅक्सी चालवणं तर अजून बाकीच आहे पार्ट २ सारखं:

तिकडेच तर खरी ऍक्शन आहे.

तर...

आत्ता पुढचं मिशन: शनिवार-रविवार टॅक्सी चालवायला देईल असा टॅक्सी मालक शोधणं.

क्रमश:

आधीचे दुवे:
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: उपोद्घात
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २८ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३१ जानेवारी २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ मार्च २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २०१८
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९ उत्तरार्ध
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ५ व १२ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ फेब्रुवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १८ मार्च २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २४ मार्च ते १२ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २० एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २६ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३० एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ मे आणि २९ मे २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १५ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २२ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ जून २०१९

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कॅब चालकाने लिहिलेला २० जुलै २०१९चा माईलस्टोन काढून का टाकला ते समजलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

थोडे महत्वाचे बदल करायचे आहेत. लवकरच पोस्ट पुन्हा टाकतो.

थेट डिलीट करायचा पर्याय नसल्यामुळे टिंब टाकलाय !
कन्फ्यूजनबद्द्ल क्षमस्व

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पोस्ट अद्ययावत केलीय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नील, हे काम जर तू एका दमात केलं असतंस तर कीती वेळ लागला असता? म्हणजे समज तुझ्याकडे सगळी कागदपत्रं/सर्टीफिकेटस आहेत, मेडीकल फिटनेस आठवड्यात मिळणारे. कारण दोन वर्ष आठ महीने गेले ह्यात आणि तू हे "आता सोप्प, पारदर्शक झालंय" म्हणतोयस म्हणून हा प्रश्न!

"काळी-पिवळीच चालवायच्येय" हा संकल्प सोडलेला आहेस पण कुठलीही गाडी (गाडी = प्रचलित मोटर, ट्रक नव्हे!) चालवू शकशील ना? म्हणजे नंतर कधी वाटलं तर वीकएंडला आपली गाडी घेऊन, हॉस्पिटलबाहेर लावून समाजसेवा करू शकशील? ट्याक्सीच हवी असं नाही. (ट्याक्सी = काळी-पिवळीच. "काळी-पिवळी ट्याक्सी = पिवळा पितांबर!!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

लेट'स सी:

२०१८ला मी जवळ जवळ काहीच फॉलोअप केला नाही. (दोनच पोस्ट्स आहेत त्या वर्षी )
शिवाय पुण्यात वीकडेजला रोजी-रोटीनिमित्त असल्याने सगळा पाठपुरावा वीकांतालाच केला.
त्यात बॅजचा ऑप्शन दिसत नसल्याने ५-६ महिने त्यात गेले.

एका दमात ३-६ महीन्यांत व्हायला पाहीजे माझ्या मते.
कारण आधी ट्रान्सपोर्ट लायसन्स -> मग बॅज हे अपरिहार्य आहे.

>>>
वीकएंडला आपली गाडी घेऊन, हॉस्पिटलबाहेर लावून समाजसेवा करू शकशील?
>>>
ही आयडिया चांगली आहे. काही मित्रांनी सुचवली होती.
त्यानी फक्त दादर स्टेशन ते सिद्धीविनायक मंदीर भावीकांची ने - आण करायची युक्ती दिली होती.
ते ही पुढे येईलच.

पण मुंबईकर असल्याने काळी-पिवळीचं फॅसीनेशन आहेच Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओह बरं. ३-६ महिन्यात ठिकाय.

भाविकांशी काही वैर नाही माझं. पण भाविकापेक्षा पेशंटला मदत केली तर ते सिद्दिविनायकंच नाय, कोणचापण गॉड असेल तो साला तू एकदम करेक्ट काम करतो म्हणेल Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

भारी.. पुढील भाग लवकर येऊ दे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0