काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १२ (१नोव्हेम्बर २०२०)

आज फायनली लॉक डाऊननंतर पहिल्यांदा टॅक्सीवर चाललोय.

८ मार्च ते १ नोव्हेंबर: ८ महिने.

विश्वाच्या पुलाखालून बरंच पाणी वाहीलं ह्या काळात.
बरचसे लोकं तर नाका तोंडात पाणी जाऊन गुदमरले, कित्येक डूबलेसुद्धा.
निर्लज्ज होऊन खरं सांगायचं तर मला पर्सनली फारशी झळ नाहीच पोचली करोनाची.

उलट आई-बायको-बहिणीबरोबर पुरेसा वेळ घालवता आला.
मुंबई-पुणे दगदग वाचली.
थोडा निवांतपणा मिळाला, बरीचशी इंटिमसी मिळाली.
रगडून काम केलं... जॉबही (तुलनेनी) सिक्युअर्ड होता.
बऱ्याच वर्षांपासून शिकायची ठरवत होतो ती हूला-हूप रिंग थोडी जमायला लागली.
Hulla Hoop

पण...
कोणत्याही किमान सेन्सीबल माणसाला येईल तो सर्व्हायव्हर्स गिल्ट आहेच.

तो घेऊन एक तर अजून अजून खिन्न आणि निष्क्रिय होता येईल...
किंवा जमेल तशी आपल्या मदतीची खसखस विश्वाच्या दरियात टाकता येईल.
बॉल आपल्याच कोर्टात असतो... नेहमीच!

तर...
आज बऱ्याच दिवसांनी युनिफॉर्म चढवला.
युनिफॉर्मचा एक चार्म असतोच.
Uni

मलबार-हिलला टॅक्सी घ्यायला पोचलो.

टॅक्सी व्यवसायाचंही कंबरडं करोनाने मोडल्यासारखं झालंय.

बरेचसे ड्रायव्हर्स चक्क आपल्या टॅक्सीत संसार भरून बिहार/ यु. पी. आणि देशातल्या कानाकोपऱ्यांतल्या हजारो किलोमीटर दूरच्या गावांत गेले होते.
ते "भुलभुलैया"मध्ये अक्षय मुंबईवरून अलाहाबादला रिक्षानी येतो आणि १३ हजार बिल करतो तेव्हा खूप हसलेलो.

पण ह्या वर्षी तशीच खरी आणि ऍब्सर्ड आणि भयकारी परिस्थिती येईल असं वाटलं नव्हतं.
त्यातले बरेच लोक आता परत आलेयत पण धंदा थंडच आहे.

आमचे दिनेशभाईही परत आलेत.
मला खरंतर वाटलेलं की लोकल्स बंद असल्याने टॅक्सी रिक्षांना पर्याय नुरुन त्यांचा धंदा जोरात असेल.
पण दिनेश भाईंशी थोडं बोलल्यावर कळलं की,
टॅक्सीला सर्वात जास्त धंदा लोकल रेल्वे स्टेशन्स आणि त्यांच्या आजूबाजूला मिळतो.
स्टेशनवरून जवळच्या ऑफिसेस मध्ये जाणाऱ्यांचा डिमांड सगळ्यात जास्त असतो.
उदाहरणार्थ चर्चगेट स्टेशन ते मंत्रालय.

ते सगळंच बंद आहे आता.

सो मागणी फारच कमी आहे.

एनीवेज...

त्यांच्याकडून टॅक्सी घेतली.
आधीच्या शिफ्टच्या ड्रायव्हरच्या घामाचा सूक्ष्म वास गाडीत राहिलेला.
बऱ्याच दिवसांनी काहीतरी ओळखीचं भेटल्यासारखं वाटलं Smile

आज आधी घरी गेलो आणि तिथून धंदा चालू केला.
सो आमच्या प्रिय कॉलनीचं हे निवांत रूप:
Colony

कॉलनीत थोडा वेळ वाट पाहील्यावर हिंदमाताचं भाडं मिळालं.
तिथून टाटा हॉस्पीटल.
टाटा हॉस्पीटलच्या मागच्या गेटरून एक निवांत लेन जाते.

सरसरून झोप यायला लागल्यामुळे इथे गाडी पार्क करून तोंडबिंड उघडं टाकून मस्त झोपलो थोडा वेळ.

मग उठून कडक चहा मारला आणि अजून थोडी भाडी मारली.

धंदा खरंच मंद आहे.

आपला सगळाच हौसेचा मामला असल्यामुळे ठीक आहे पण ज्यांचं ह्यावर पोट आहे त्यांचं कठीण आहे...

फक यु करोना!

आजची कमाई:

५०० रुपये

क्रमश:
आधीचे दुवे:
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: उपोद्घात
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २८ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३१ जानेवारी २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ मार्च २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २०१८
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९ उत्तरार्ध
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ५ व १२ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ फेब्रुवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १८ मार्च २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २४ मार्च ते १२ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २० एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २६ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३० एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ मे आणि २९ मे २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १५ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २२ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट माईलस्टोन: २० जुलै २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २० जुलै ते डिसेंबर पहिला आठवडा २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १ (८ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २ (१५ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ३ (२२ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ४ (२९ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ५ (१९ जानेवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ६ (२६ जानेवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ७ (२ फेब्रुवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ८ (९ फेब्रुवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ९ (२३ फेब्रुवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १० (१ मार्च २०२०)
टॅक्सी दिवस ११: ८ मार्च २०२० (विमेन्स डे)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet