Skip to main content

तो

''मनोगत' या संकेतस्थळावर मोजक्या लिखाणासाठी आणि माहितीपूर्ण व नर्मविनोदी प्रतिसादांसाठी प्रसिद्ध असलेल्या 'तो' चे काल कोरोनाने निधन झाले. अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन क्षेत्रात उच्चशिक्षण घेतलेल्या 'तो' चे वय जेमतेम चाळीस होते.
'तो' ला श्रद्धांजली.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

गोष्ट सांगा आणि गणित शिकवा... ५

नेहा, चिंट्या सायली तिघे ही चक्रावले... सॅमीने त्याचा खुर्चीच्या मागे, त्याला न दिसणाऱ्या दिव्याचा रंग कसा ओळखला असेल? कॅप्टन नेमोंच्या उत्तरात काय क्लु होता? काय दिसले असेल त्यांना?
...

*********************
आत्ता पर्यंत: खुर्चीच्या मागे एक दिवा लागत होता, पण मागे वळून तो पाहता येत नव्हते. समोर बसलेल्यांच्या खुर्चीच्या मागे लागलेला दिवा पाहून आणि तर्क करून आपल्या खुर्चीच्या मागे कोणत्या रंगाचा दिवा आहे हे ओळखायचे होते. सॅमीला जमले, कॅप्टन नेमोनी हार मानली ... बाकी तिचे विचार करत होते ...

ललित लेखनाचा प्रकार

कोविड १९ की कोविड २१?

xxxज्याप्रकारे करोनाचे विषाणू भारतात आता हाहाकार माजवित आहेत त्यावरून गेले वर्षभर साथ पसरू नये यासाठी मास्क घालणे, शारीरिक अंतर ठेवणे व गर्दी न करणे इत्यादी नियमांचे (अर्धवटपणे का असेना!) पालन करणे हे सर्व करूनसुद्धा दुसऱ्या लाटेतील जीवित हानी आपण थांबवू शकलो नाही व यानंतर काही दिवसानी तिसऱ्या लाटेचाही सामना करावा लागतो की काय असे वाटण्याची दाट शक्यता निर्माण आहे.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

जाईन विचारित रानफुला

जाईन विचारित रानफुला
भेटेल तिथें ग, सजण मला

भग्न शिवालय परिसर निर्जन
पळसतरूंचे दाट पुढें बन
तरुवेली करतिल गर्द झुला

उंच पुकारिल मोर काननीं
निळ्या ढगांतुन भरेल पाणी
लहरेल विजेची सोनकळा

वाहत येइल पूर अनावर
बुडतिल वाटा आणि जुनें घर
जाइल बुडुन हा प्राण खुळा

कवयित्री : शांता शेळके

=================

विचारले मी दिसे ज्या-त्याला
"राही कुठे देव ते सांगा मला"

"भग्न शिवालय परिसर निर्जन
पळसतरूंचे दाट पुढे बन
राही तिथे देव," एक सांगे मला

गोष्ट सांगा आणि गणित शिकवा... ४

“मला तर वाटलं भूत काका मुलांना छळायला फक्त गणिताचेच प्रॉब्लेम विचारतात! ही काय नवीन गेम टाकताहेत?” चिंट्या वैतागून म्हणाला ... मुलांना प्रश्नच समजत नव्हता. पुन्हा पुन्हा वाचत होते... अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होते...

...

**********************
गोष्टीचा आधीचा भाग .... इथे टिचकी मारा
**********************

...

काय अर्थ असेल याचा? काय करायचं आहे आपल्याला? ...

ललित लेखनाचा प्रकार

पारिजात

पारिजात

स्वप्नात तुझिया मी
राधा राधा होते
मग पापणी ओली माझी
मज उगाचच छळते

पहाट होता होता
पिठुर चांदण्यांची रात
क्षणमात्र मागे रेंगाळते
अन्
हाती न काही उरता
मंद पारिजात देऊन जाते...

- दिप्ती भगत
5ऑगस्ट, 2020

'डावी'कडे सरकण्याची गरज - प्रदीप बिरादार

करोनानं देशभरात माजवलेल्या हाहाःकारानं प्रत्येक राजकीय विचारसरणीच्या माणसाला वाईटंच वाटत असेल, यात वाद नाही. सगळ्याच राजकीय पक्षांचे समर्थक संवेदनशीलच आहेत‌. पण 'कोव्हिड हे अचानक आलेलं संकट आहे, आपण किंवा सरकार यापेक्षा अधिक करू तरी काय शकतो,' असा एक अराजकीय हतबल सुस्काराही काही जण सोडतायेत. जो पूर्ण चुकीचा आहे आणि तितकाच घातकही. कोव्हिडची लागण झालेल्या प्रत्येक रूग्णाचा मृत्यू हा फक्त कोव्हिडमुळेच झालाय, हे खरं नाही. आधी आलेल्या पॅनडेमिकप्रमाणं (स्पॅनिश फ्ल्यू) कोव्हिड हा विषाणू इतका जीवघेणा नाही. त्याला जीवघेणं बनवलंय आपण निवडलेल्या आरोग्यव्यवस्थेनं.

घर

मध्यंतरी एका सिनेमात सॅन अँटॉनिओचा उल्लेख आला आणि नवरा म्हणाला - सॅन अँटॉनिओ! तुझं घर. मी त्याला उत्तर दिलं - तुम्ही दोघं जिथे आहात ते माझं घर. बाकी ठिकाणचं नाईलाजाचं वास्तव्य. आपणच आपल्याला चकित करतो असे काही क्षण असतात. हा क्षण त्यातलाच एक. मला घराचा तो मुद्दा माहीतच नव्हता ... निदान मूर्त मनाने तसा कधी विचार बोलून दाखवला नव्हता. अमूर्त मनातूनही काही उद्गार उमटतात का? फ्रॉईडने म्हटलेले आहे - स्लिप ऑफ टंग असे काही नसते. पटकन निघणारे चूकीचे उद्गारही - अमूर्त मनाच्या पातळीवरील काही वैशिष्ट्ये बरोबर घेउन येतात.

ललित लेखनाचा प्रकार

गोष्टीवेल्हाळ लेखकाने बेमालूम रचलेल्या कथा

सतीश तांबे यांच्या 'मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट' या कथासंग्रहाचा युसुफ शेख यांनी करून दिलेला परिचय.
"कल्पनेला वास्तवाचं कोंदण दिल्यामुळे कल्पना आणि वास्तव यांच्या सरमिसळीतून एक नवंच वास्तवदर्शी जग तयार होतं. हे जग या कथांनी निर्माण केलेलं आपलं स्वत:चं एक वेगळंच जग आहे. त्यात सामान्य माणसाच्या आयुष्यातले नेहमीचे प्रसंग घेऊन त्यातून जीवनातल्या शाश्वत मूल्यांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न आहे."

समीक्षेचा विषय निवडा

कवितेनंतर

कवितेनंतर बाकी उरल्या
शब्दांचे विभ्रम मी बघतो
ऐकून आहे ठिणगीचाही
बघता बघता वणवा होतो

वळीव कोसळता वणव्यावर
राखेची रांगोळी होते
अगणित थेंबांतिल थोड्याश्या
थेंबांची पागोळी होते

सोसून पागोळ्यांचा मारा,
तरारून अंकुर जो फुटतो
वृक्ष होऊनी त्याचा, अनघड
शब्दांनी तो डवरून जातो

पाठशिवणीचा नाद लावुनी
शब्द बीज वळचणीत रुजते
कधीतरी त्यातून अचानक
ओळ नवी कवितेची फुलते

- का ओळीच्या पैलतिरावर
अनाघ्रातसे काही उरते?