गद्य

बरेली के बाजार मे

मी वंदना पाटील आता मंजिरी मणेरीकर. टाटा मेमोरियल सेंटरमधून MD in Pathology करूनही मला मुंबईत म्हणावा तसा चांगला जॉब मिळाला नाही. मला मुंबई सोडायची जराही इच्छा नव्हती. तरी पुणे, तळेगाव अश्या ठिकाणी जॉब केले व शेवटी Pathology सोडून देऊन पुन्हा विद्यार्थिनी झाले. आधी MA with Sanskrit केले आणि मग BA with German la प्रवेश घेतला होता. अशी 5 वर्षे गेली. मला आपण एवढी मोठी डीग्री घेऊनही त्या क्षेत्रात काम करत नाही याची रुखरुख होती.

ललित लेखनाचा प्रकार: 

भयंकर सुंदर

मराठीच्या गमतीजमती-
'भयंकर सुंदर!'
बंगालीतलं 'भीषण सुंदर' सुप्रसिध्दच आहे. पण अशी विशेषणं वापरण्यात आपणही काही कमी नाही. परवाचीच गोष्ट! घरची आणि पाहुणी मुलं-मुली एक छानसा सिनेमा पाहून आली होती. कसा होता--यावर प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगळी.
'सही'! 'लय भारी'! 'भन्नाट'! 'जबरदस्त'!
मला 'प्रचंड' आवडला!
काय 'भयानक' हसलोय आम्ही! (हे मात्र सहज शक्य आहे.)
तोपर्यंत चहा झाला होता.
'वॉव, काकू, आल्याचा चहा? मला 'भयंकर' आवडतो'!
'ओ! ग्रेट'!
'मस्‌ऽऽऽऽस्त'!
'आहा! कूऽऽऽऽल'!
म्हणजे चहा 'भयंकर'? का मस्त(वाल), का 'कूऽऽल' म्हणजे थंड?

ललित लेखनाचा प्रकार: 

माझ्या आठवणीतील रीमा लागू

ललित लेखनाचा प्रकार: 

'द केस फॉर क्राईस्ट' आणि 'नमस्ते लंडन'

काल एका धार्मिक, अकाउंटंट आणि मला सहन करणाऱ्या मैत्रिणीखातर 'केस फॉर क्राईस्ट' नावाचा सिनेमा बघितला. सिनेमाची कथा अशी काहीशी (कंसातल्या कॉमेंट्स माझ्या)-

ललित लेखनाचा प्रकार: 

माझा कांचन

जसा जसा हिवाळा सुरु होतो, आणि निसर्गात पानझड होवू लागते. आणि हे माझ्या पटकन लक्षात येते. माझ्या बागेतील, आवारातील पानांचा सडा वाढू लागतो. त्यातच बागेत एका कोपऱ्यात उभा असलेल्या माझा कांचन जोरदार पानझड करून आणि वाळलेल्या शेंगा खाली टाकून लक्ष वेधून घेतो. त्या शेंगा पडताच एखादी फुसका लवंगी फटका वाजवा तसा आवाज होवून शेंग फुटते आणि त्यातून बिया आसपास विखुरल्या जावू लागतात. आणि हा प्रकार अख्खा दिवस सुरु राहतो. शनिवारी, रविवारी सुट्टीच्या दिवशी घरी असलो तर, दिवसभर हे ऐकू आणि पाहू शकतो.

ललित लेखनाचा प्रकार: 

आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ६)

ललित लेखनाचा प्रकार: 

आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ५)

भाग १
भाग २
भाग ३
भाग ४

भारतात इंग्रजांचे, मिशनऱ्यांचे, वसाहतवादाचे, भांडवलवादाचे आणि आधुनिक विज्ञानाचे आगमन जवळपास एकाच वेळी झाले. त्यावेळी भारतीय समाज कसा होता?

ललित लेखनाचा प्रकार: 

आगमन, निर्गमन पुनरागमन (भाग ४)

ललित लेखनाचा प्रकार: 

भुकेले आणि माजलेले

प्र‌स‌ंग प‌हिला :

परगावचा मुक्काम संपवून मी ट्रेनने माझ्या गावी परत येतोय. प्रवास अगदी शेवटच्या टप्प्यात आलाय. आमची ट्रेन आता प्लॅटफॉर्म मिळण्याची वाट पाहत स्टेशनच्या ‘आउटर’ ला थांबली आहे. गाडी जरा जास्तच रखडल्याने प्रवासी चुळबूळ करताहेत. मी कंटाळून खिडकीतून बाहेर पाहत असताना अचानक एका दृश्याने माझे लक्ष वेधून घेतले.

ललित लेखनाचा प्रकार: 

आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग २)

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - गद्य