गद्य

चले जाव चळवळ आणि गांधीवधानंतरची दंगल

१९४२ची चले जाव चळवळ जी ब्रिटीश सरकार विरुद्ध असहकाराचे धोरण म्हणून सुरु झाली त्याला ह्या वर्षी(गेली आठवड्यात) ७५ वर्षे झाली. ह्याला छोडो भारत असेही नाव आहे. महाराष्ट्रात क्रांतीसिंह नाना पाटील यांनी खरे तर चले जाव चळवळीच्याही आधी प्रतीसरकार स्थापन केले. अनेक जण या चळवळीत सहभागी झाले आणि भूमिगत होऊन काम केले. त्यावेळच्या, काळाच्या परिस्थितीचे दस्ताऐवजीकरण मराठी तरी विशेष झालेले माझ्या ऐकिवात नाही. त्याच प्रमाणे गांधीवधानंतर जी दंगल, जाळपोळीची, हत्याकांड अशी परिस्थिती उद्भवली तीचे देखील अभावानेच दस्ताऐवजीकरण झालेले दिसते.

ललित लेखनाचा प्रकार: 

बायको

© मंगेश पंचाक्षरी, नासिक.
(पूर्वपरवानगी शिवाय हा लेख मुद्रित किंवा प्रकाशित करू नये)

ललित लेखनाचा प्रकार: 

वेगळी केस

(कृपया हा लेख परवानगीशिवाय मुद्रित किंवा प्रकाशित करू नये)
©®™ मंगेश पंचाक्षरी, नासिक.

ललित लेखनाचा प्रकार: 

चक्का जाम

©®™मंगेश पंचाक्षरी, नासिक.
(कृपया पूर्वपरवानगी शिवाय हा लेख मुद्रित किंवा प्रकाशित करू नये)

ललित लेखनाचा प्रकार: 

दहीहंडी

©®™मंगेश पंचाक्षरी, नासिक.
(पूर्वपर्वांनगीशिवाय हा लेख मुद्रित किंवा प्रकाशित करू नये)

'दहीहंडी' म्हणजे काय ग मॉम? प्रशांत उर्फ पॅटने आईला विचारलं. दहीहंडी म्हणजे 'गोविंदा' मॉम ने खुलासा केला. पण गोविंदा का खेळायचा?" पॅट ने विचारलं. "अरे, कृष्णाला लोणी खूप आवडायचं, मग गोकुळातल्या सगळ्या जणी लोणी मटक्यात लपवून ठेवायच्या, कृष्ण सगळ्या सवंगड्यांना म्हणजे फ्रेंड्सना गोळा करून ती हंडी फोडायचा. म्हणून हल्ली गोविंदा खेळला जातो. मॉम ने सांगितलं.

ललित लेखनाचा प्रकार: 

हंटे लंटिहिलेलं तंटुम्ही वंटाचू शंटकता कंटा?

हा! हा!! हा!!! मला माहितेय! वरील शीर्षक वाचून तुम्ही गोंधळून गेला असाल. तुम्हाला वाटलं असेल, काय लिहिलंय हे!!? आफ्रिकेच्या जंगलातील कोण्या आदिवासी लोकांची भाषा दिसतेय ही. वाचताना असं वाटतं की, सर्व आदिवासींनी मिळून एक मोठी शिकार केलीय. मैदानात उघडेबंब, अंगावर चट्टेपट्टे ओढलेले आणि हातात भाले वगैरे घेतलेले लहानथोर सर्व आदिवासी जमलेत. मधोमध मोठ्या शेकोटीवर शिकार भाजायला लावलीय. आणि त्याभोवती सर्व फेर धरून नाचतायत आणि गातायत. "झिंगालाला! होsss!! टुंबक्टू! टुंबक्टू!! टुंबक्टू!!!"

ललित लेखनाचा प्रकार: 

स‌ंवाद‌.

"ट्रेन‌?"
"ट्रेन‌? are you kidding me?"
"का?"
"इस‌वी स‌न‌ किती साली तुम्ही मुंबैत‌ ट्रेन‌ने प्र‌वास‌ केला होता? २०००? १९८०? की त्याही आधी?"
"ब‌रीच‌ व‌र्षं झाली ख‌री, प‌ण त‌रीही ट्रेन‌ इत‌की वाईट‌ नाही."
"ग‌र‌म‌ पाण्यात‌ला बेडूक‌ झालाय‌ भेंडी तुम‌चा लेको. ह‌ळूह‌ळू ताप‌मान‌ आप‌ल‌ं वाढ‌त‌ंय‌, आणि तुम्ही ब‌स‌लाय‌ आरामात‌ स‌ह‌न‌ क‌र‌त‌. अरे जी काही ग‌र्दी आहे ती क‌स‌ली भ‌यान‌क‌ आहे - and I'm sure you realise that deep within."
"हो, म्ह‌ण‌जे ट्रेन‌म‌धून ल‌टक‌ण‌ं धोकादाय‌क‌ आहे हे ख‌र‌ंय‍-"

ललित लेखनाचा प्रकार: 

कोण बरं ही परी? कोन्मरी

तशी मलाही आवडते आवरासावरी.
पण पसारा असलेलं घर,
एखाद्या निवांत रविवारी,
मनापासून आवरुन देणारी,
ही हसरी, सुंदर परी!
आहे बरी लहानखुरी,
पण जगाला भुलवणारी,
कोण बरं ही परी?- "कोन्मरी"

ललित लेखनाचा प्रकार: 

स्मृतिगंध-एक ह्रदयस्पर्शी प्रेमकथा

का गं अशी अचानक सोडून गेलीस मला?..असं मध्येच मला एकट्याला सोडून जाण्यासाठी का आपण एकत्र आलो होतो?..आज आठवतंय सगळं अगदी पहील्यांदा तुला कॉलेजमध्ये पाहून माझं मन तुझ्यावर 'लट्टू' झालतं त्या क्षणापासून ते आजवर घडलं आणि घडवलं गेलेलं जसंच्या तसं आणि माझ्याही नकळत माझ्या डोळ्यांतून आसवं वाहू लागतात..कसा गं आवर घालू या भावनांच्या कल्लोळाला?..कुठं गं शोधू सखे तुला?..तुझ्या आठवणींत रमणं हा तर आता एक छंदच होवून बसलाय...

ललित लेखनाचा प्रकार: 

पहिला पाऊस- एक आठवण

"लगी आज सावन की फिर वो झड़ी है।
वही आग सीने में फिर जल पड़ी है।

कुछ ऐसे ही दिन थे वो जब हम मिले थे। 
चमन में नहीं फूल दिल में खिले थे।

वही तो है मौसम मगर रुत नहीं वो..
मेरे साथ बरसात भी रो पड़ी है।"

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - गद्य