गद्य

काही रोचक अनुभव - २

एका ठिकाणी असा अनुभव आला तरी, मी माझा हट्ट सोडला नाही. टाईम्समधल्या प्रत्येक जाहिरातीला अर्ज करत गेलो आणि बर्‍याच ठिकाणी मला मुलाखतीसाठी बोलावलेही. पण, एकंदर सगळीकडचा अनुभव नकारात्मक होता. मुलाखत घेताना, तुम्हाला काय येतं, यापेक्षा काय येत नाही ते शोधून त्यावरच प्रहार करण्याचे टेक्निक असते. आणि माझ्या बाबतीत तरी, येणार्‍या गोष्टींपेक्षा न येणार्‍याच जास्त! त्यामुळे सगळीकडे, व्यवस्थित चिरफाड करुन घ्यायची आणि घरी यायचे, या प्रकाराची संवयच झाली.

ललित लेखनाचा प्रकार: 

काही रोचक अनुभव - १

विज्ञानशाखेतली सर्व्वोच्च पदवी घेतल्यावर माझे, नोकरीसंशोधन सुरु झाले. यच्चयावत नातेवाईकांना, मी अध्यापन क्षेत्रांत जाईन, असे वाटत होते. मला मात्र उद्योगक्षेत्रांत आणि त्यांतही, 'शोध आणि विस्तार' या क्षेत्रांतच रस होता. त्यादृष्टीने, पहिला चॉईस म्हणजे, त्या क्षेत्रातल्या मातब्बर बहुराष्ट्रीय कंपन्यांवरच माझा डोळा होता. पण काही प्रयत्नांनंतर, अशा कंपन्यांत शिरकाव होणे किती कठीण आहे, याचा मला प्रत्यय आला. लहान कंपन्यांत सहज प्रवेश मिळत असतानाही त्या नाकारुन, या मोठ्या कंपन्यांतच जाण्याचा अट्टाहास मला फार महागात पडला. त्यापैकीच काही रोचक अनुभव, माझे पाय जमिनीवर घेऊन आले.

ललित लेखनाचा प्रकार: 

गिफ्ट ऑफ व्हॅलेंटाईन

“गेस व्हाट, मी तुझ्याकरता काय गिफ्ट आणलं असेल?” त्याने तिच्या दोन्ही खांद्यावर हात टेकवत विचारलं.

“अम्…टेडी बीअर?”

“नोप. गिफ्ट तुझ्या कामात पडेल असं आहे”

”Management Ethics चं textbook?”

“असं abstract गिफ्ट देतं का कुणी बावळट.
Think something romatic .”

“चंद्र तारे तर नाही आणले न तोडून?” ती खांदे उडवत हसली. ती अशी हसली की जाम सेक्सी दिसायची.

“असं म्हटलं तरी चालेल. कारण हे गिफ्ट तुला चंद्र तारकांची सफर घडवणार आज..”

“मला नाही कळत असं कोड्यात बोललेलं…सरळ सांग बरं काय आणलस.”

त्याने हळूच उजव्या खिशात हात घातला आणि अलगद बाहेर काढला. त्याची मूठ बंद होती.

ललित लेखनाचा प्रकार: 

"मार्टिनी"- अमेरिकन पेय

युरोपियन वाईन ग्लासांची स्त्रीच्या शरीराच्या मोहक गोलाईची थीम सोडून, एखाद्या गगनचुंबी बिल्डिंगसारख्या सरळसोट लाईन्सवाला मार्टिनी ग्लास तुम्हाला आधुनिक काळात पोचवितो. तुमच्या हाताची उष्णता पोचून मार्टिनीचा अती-थंडपणा बिघडू नये म्हणून त्याची बारीक दांडी ग्लासाच्या "पात्रापासून" पूर्ण वेगळी ठेवलेली असते. उत्तम प्रतीचे अल्कोहोल अतिशय थंड तपमानाला प्यायल्यास घशात अजिबात जळजळ होत नाही; चांगल्या मार्टिनीचे हे खरे लक्षण!

अमेरिकन भांडवलशाही युरोपियन भांडवलाच्या वर्चस्वातून सुटून आपले सार्वभौमत्व स्थापित करत असल्याची एक खूण म्हणजे मार्टिनी; गगनचुंबी इमारती, जाझ संगीत, बिझनेस सूट याप्रमाणेच.

ललित लेखनाचा प्रकार: 

स्पॅम फोन कॉल्स

प्रगत देशात राहण्याचे तोटे, अशी एक लेखमाला लिहिण्याचा विचार करत होते. पण तसं केल्यास उजव्या लोकांचा रोष उद्भवेल (अं ... तो तसाही ओढवून घेतेच मी, विसरलेच!) अशी एक भीती आधी वाटली. मग डाव्या लोकांच्या रोषाचीही भीती वाटली. "एवढा राग आहे प्रगत देशांवर तर मग राहतेस कशाला तिथे!" म्हणून या निबंधाचं नाव 'स्पॅम फोन कॉल्स' असं ठेवलं. हे असे इंग्लिश शब्द वापरले म्हणून ठाकरे लोकांचा रोष उद्भवणार नाही; बघा, देवनागरीत लिहिलंय. वर पॉप कल्चर अनुसरण्यामुळे जादाचे कूल पॉइंट्स मिळतील. आणि एक भलती भीती म्हणजे समजा भारतातही आता असले फोनवर फोन येत असतील तर भारतही प्रगत देश झालेला आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 

अग्रपूजेचा मान - भाई भतीजावादाची पहिली कथा

कालचीच गोष्ट, गल्लीतली एक मुलगी घरी आली, पेढे घेऊनच. मी विचारले पढे कसले? ती म्हणाली, काका मला नौकरी लागली. खरंच ती मुलगी अत्यंत हुशार आहे. या आधी हि तिने दोन-तीन वेळा लिखित परीक्षा पास केली होती. पण दरवेळी साक्षात्कार मध्ये बाद झाली. या वेळी साक्षात्कार नव्हता. (केंद्र सरकारच्या श्रेणी ग आणि ड साक्षात्कार घेणे बंद झाले आहे, नमो कृपा आणखीन काय) लिखित परीक्षा पास होताच तिला नौकरी लागली. असो.

ललित लेखनाचा प्रकार: 

आरसा


बायसिकल थीफ
प्रसंग अगदी साधा आहे. एका मित्राकडे बसलो होतो. त्याचा मुलगा टी.व्ही. बघत होता. आम्ही बोलत होतो. बायसिकल थीफ ह्या चित्रपटाबद्दल. प्रश्नांचा पाठपुरावा किंवा उत्तरांचा अट्टाहास अजिबात न करता, एक कासाविस करणारा अनुभव तुमच्या पुढे मांडून बायसिकल थीफ हा चित्रपट संपून जातो. पण चित्रपटामधली तुमची गुंतवणूक संपत नाही. बाप आणि मुलाच्या ह्या गोष्टीची भेट पुढेही वारंवार होत रहाते. जगतांना कधी पेच पडला तरी तिची सोबत असते.

ललित लेखनाचा प्रकार: 

आरसा, स्वप्नं आणि सावल्या

आरसा, स्वप्नं आणि सावल्या
ह्या संकल्पित इ बुक मधील निवडक लेखन इथे पोस्ट करतो आहे.
इंटरनेट च्या माध्यमातून स्वत: चं म्हणणं इतरांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न.
ज्यांच्या पर्यंत पोहोचेल त्यांच्या प्रतिक्रिया कळल्या तर आनंद होईल.
दिनकर बेडेकर
dgbedekar@gmail.com

ललित लेखनाचा प्रकार: 

लाईन कथा : स्वामी तिन्ही जगांचा, आटा बिना उपाशी

(गेल्या काही दिवसांपासून कमरेचे जुणे दुखणे वाढल्यामुळे, टंकन करणे संभव होत नव्हते, पण आज सकाळी राहवले नाही, एवढे सर्व समोर घडत असताना डोक्यात सुपीक विचार येणारच).

ललित लेखनाचा प्रकार: 

चांदोबा मराठी मासिक परत

नमस्कार मित्रांनो
मी आनंद गिड्डे
आपणा सर्वानी लहानपणी केव्हा बा केव्हा चांदोबा वाचलेच असेल किंवा निदान माहित तरी असेल तर हेच चांदोबा चे सर्व अंक माझ्याकडे पीडीएफ स्वरुपात जतन केलेले आहेत. १९६० ते २००६ पर्यन्तची सर्व पुस्तके आहेत. त्याचबरोबर हिंदि चंदामामा १९४९-२००६ पुर्ण कलेक्षन आहे. तसेच मराठीतिल ५००+ पुस्तके पीडीएफ स्वरुपात आहेत.
कोणाला आवड असल्यास आपण मला खालील क्रमांकावर संपर्क करु शकता
मो क्र ८०८७५४८१३८
व्हाटस अप 9822791738

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - गद्य