सामाजिक

वो नही जानते की वफ़ॉ क्या है ?

Taxonomy upgrade extras: 

हमको है जिनसे वफ़ॉ की उम्मीद
वो नही जानते की वफ़ॉ क्या है ?
( गालिब )

निंदक असती घरा | आत्मविश्वासाचा होई कचरा ||

Taxonomy upgrade extras: 

निंदकाचे घर असावे शेजारी असे जरी पूर्वजांनी सांगून ठेवले आहे तरी हे निंदक कधी कधी आपल्या आत्मविश्वासाला मारक ठरतात. त्यातल्या त्यात जर हे निंदक घराशेजारी नसून जर आपल्या घरातच असतील तर मग पाहायलाच नको.

निंदक किंवा टीकाकार हे अनेक प्रकारचे असतात. हे बघा निंदकांचे काही "गुण":
नेहमी एखाद्याची इतरांशी तुलना करत राहणारे, नेहमी दोन्ही बाजूंनी बोलणारे, लेबल लावणारे किंवा शिक्के मारणारे, एखाद्या व्यक्तीत सतत दोषच काढणारे वगैरे. काही निंदकांमध्ये मात्र वरचे सगळे "गुण" एकत्रितपणे भरलेले असतात.

मी नाही मानत !!!

Taxonomy upgrade extras: 

मी नाही मानत !!!
हल्ली एक नवीनच फॅड चालू झालंय. खरंतर नवीन का जुनं ते नाही माहित ; पण सद्ध्या नक्कीच जोमात आहे. 'मानलेला भाऊ आणि मानलेली बहिण'.
तसं पाहायला गेलं तर भाऊ किंवा बहिण ही मानायची नाती कधीच नव्हती आणि माझ्या दृष्टीने नसतीलही. भाऊ एकतर असतो नाहीतर नसतो. बहिण एकतर असते नाहीतर नसते. ही दोन्ही नाती (खरतरं एकच नात आहे) digital systems मध्ये येतात analog नाही. सांगायचा मुद्दा हा की भावासारखं किंवा बहिणीप्रमाणे असं काही नसतं.

समानता?

Taxonomy upgrade extras: 

या विषयावरील चर्चा बहुवाचित असेलच असे गृहीत धरून नमनाला हे वाक्यभर तेल वाहून माझ्या भूमिकेच्या मांडणीस सुरुवात करते.

माझ्या दृष्टीने एकाच गटाला घेऊन एकत्रितपणे काही करायचे असल्यास, ते करण्यासाठी गटातील सर्व व्यक्ती सक्षम असतील याची खात्री करावी आणि ते तसे नसल्यास, सर्वांच्या क्षमतेत बसणार्‍या गोष्टीच फक्त कराव्यात हेच योग्य आहे.

एक वेगळे उदाहरण देऊन माझी तात्त्विक भूमिका अधिक स्पष्ट करते.

ग्रामीण भागाचे लेखनातील चित्रण आणि वास्तव

Taxonomy upgrade extras: 

लेख आवडला!
शिवाय ननि म्हणतात तसही वाटतच.
एकूण विसाव्या शतकातलं परिचित साहित्य वगैरे असू दे नैतर मागील वीसेक वर्षात अमेरिकेत गेलेल्या पब्लिकचे विविध ब्लॉग.
"रम्य" वगैरे आटह्वणी. "संथ" , "निवांत" आणि "प्रसन्न" हे फक्त गावच असतं.
हे गाव कोकण किंवा गोव्यातच असतं.(फार्फार तर पुणे -कोल्हापूर मधला समृद्ध कृषी असलेला, हरित पश्चिम महाराष्ट्र)
ह्यांच्या गावतही लोकं अगदि उपाशी वगैरे नसतात.
.
.
.
च्यामारी, आम्ही गावाकडे पाहतो तेव्हा कमालीचं दारिद्र्य आणि १९८० च्या दशकात विलास रकटे असलेले दोन चित्रपट "निखारे" आणि "प्रतिकार" ह्याच्यात दाखवलय तसलच गाव दिसतं राव.

भारतीय शाकाहार आणि भूतदया

Taxonomy upgrade extras: 

व्यवस्थापकः सदर प्रतिसाद मुळ ललित लेखनात प्रतिसाद म्हणून काही सदस्यांच्या वाचनात अवांतर व/वा रसभंग ठरू शकेल मात्र स्वतंत्र चर्चेसाठी वेगळा विषय म्हणून या प्रतिसादाचे महत्त्व लक्षात घेऊन धागा वेगळा करत आहोत. श्री अरूण जोशी यांना आवश्यक वाटल्यास अधिक तपशीलात हे लेखन विस्तारू/संपादित करू शकतील, शिवाय योग्य ते शीर्षकही देऊ शकतील.

===========

सिगारेट, दारू नि तंबाखू यांना विज्ञान नि परंपरा हे दोघेही त्याज्य मानतात.
----------
त्यावरून व्यक्तिचे पूर्ण व्यक्तिमत्व कळत नाही पण इतकेच निकष कोणाला महत्त्वाचे वाटू शकतात.
-----------------

नक्की काय बदल झाला आहे?

Taxonomy upgrade extras: 

आज एका मित्राने इमेलमधून एक व्हीडीओ पाठवला. इमेलचं शीर्षक - 'स्टुडीओत आलेला पाहुणा'. स्टुडिओ मुंबईत, गजबजलेल्या ठिकाणी आहे. आणि पाहुणा म्हणजे एक लांबलचक साप. दोनेक मिनीटांच्या व्हीडीओमध्ये सापाची वळवळ आहे. मुद्दाम सांगण्यासारखं असं की पार्श्वभूमीला लोकांचे उत्तेजित आवाज, मराठी, इंग्लिश, हिंदीमधले संवाद कानावर येत होते. बोलणं साधारण साप पाहून गंमत वाटली, आनंद झाला, मजा वाटली, असं. किंवा मानवी भावनांचं आरोपण सापाच्या हालचालींवर केलेलं. दोन-तीन मिनीटांमध्ये चार-सहा फ्लॅश सापावर पडलेले दिसले.

प्रत्यक्ष आणि रेकॉर्डेड कलामाध्यमे

Taxonomy upgrade extras: 

व्यवस्थापकः मुळ धाग्यावर तो अवांतर नसला तरी या प्रतिसादाचे, त्यावर अधिक साकल्याने चर्चा व्हावी या उद्देशाने, वेगळ्या धाग्यात रुपांतर करत आहोत. मुळ लेखिका प्रस्तावात गरज भासल्यास अधिकची भर घालु शकतीलच / योग्य वाटेल तसे संपादित करू शकतीलच. नाटक व चित्रपटच नाही तर या निमित्ताने प्रत्यक्ष कलेचे सादरीकरण आणि रेकॉर्डेड सादरीकरणातील फायदे, तोटे, तुलना, फरक यावर साधकबाधक चर्चा घडावी हा उद्देश आहेच

काय माहित, मला नाटक हा प्रकार विशेष कधी भावला नाही. समोरचा कलावंत ओव्हरॅक्टींग करतोय असं सारखं वाटत राहतं.

जाग्रत, उत्तिष्ठ ...

Taxonomy upgrade extras: 

अलिकडेच मी एका भयंकर पुस्तकाबद्दल ऐकलं. हे पुस्तक बऱ्याच लोकांना अभ्यासपूर्ण वाटतं. निदान तसं दाखवण्यात तरी लेखिका यशस्वी झाली असावी. पण या लोकांची माथी भडकवण्याचं काम हे पुस्तक करत आहे. या पुस्तकाचं नाव आहे 'सेकंड सेक्स'. आणि हे पुस्तक सिमॉन बुव्वा नावाच्या एका फ्रेंच बाईने लिहीलं आहे. स्वतःच्या नावाप्रमाणेच या पुस्तकात तिने पुरुष आणि धर्माविरोधात मोठा बागुलबुवा उभा केला आहे.

नास्तिक आणि विकृती

Taxonomy upgrade extras: 

संकल्पना:
नास्तिक म्हणजे कोण? तर मूलतः ईश्वर न मानणारे. म्हणजे हे जग निर्मिणारी, चालवणारी कोणी शक्ती नाही नि तिला अभिप्रेत असे कोणते संकेत जगात नाहीत असे मानणारे लोक. हे लोक बाकी काही मानोत न मानोत, इतके तत्त्वज्ञान तरी जरूर मानतात.
आता अस्तिक म्हणजे कोण? तर देव म्हणून कोण्या शक्तीने जग निर्माण केले, ती ते चालवत आहे, ते कसे चालावे याचे तिला अभिप्रेत असे संकेत आहेत असे मानणारे लोक. हा देव नक्की काय आहे, कसा आहे आणि हे संकेत कोणते आहेत याबद्दल अस्तिकांत प्रचंड घोळ आहेत, भांडणे देखिल आहेत. पण असे काही ना काही देव नावाचे प्रकरण आहे हे मात्र नि:संशय आहे.

पाने

Subscribe to RSS - सामाजिक