सामाजिक

लोकसंवाद :- काही चितपरिचित डायलॉग्ज

Taxonomy upgrade extras: 

लोकगीत, लोककला, लोकसंगीत कसं असतं अगदि लोकांत मिसळून गेलेलं; त्यांच्यात वारंवार आढळणारं; तसेच हे "लोकसंवाद"
हल्लीचे काही लोकसंवाद. खरं तर लोकरोग. लोकांच्या टाळक्याला झालेले आजार.
(ह्यातले एक दोन मी जालवरील प्रतिसादातून उचलले आहेत)
.
.

१.मुलगी काळी असली तरी कमावती आहे!!
२.तू आयटीत आहेस? मग तिसरं होम लोन कधी घेतोयस?
३.तू आयटीत आहेस? मग भारतात काय करतोयस?
४.भेंचोत महागाई इतकी वाढलिये आजकाल; ग्लेनफिडिच पितानाही हाच विचार सतावतो.
५.मी मुलगा इंजिनिअर असला तरच होकार देणार.
६.तो मुस्लिम/ब्राम्हण्/दलित असला तरी चांगलाय! किंवा
६.१ मी मुस्लिम असलो तरी मी देशभक्त आहे हो.
किम्वा

'ऐसीला विचारा ' : घरगुती व जनरल प्रश्न - भाग १

Taxonomy upgrade extras: 

काही बाबतीत सल्ला हवा आहे. अगदि घरगुती वापरातील इएलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून ते अगदि नाव लावण्यापर्यंत.
इथे विचारण्यास संकोच वाटतो आहे. पण मदत मिळण्याची , निदान योग्य बाजूकडे अंगुलीनिर्देश होण्याची बरीच शक्यता वाटल्याने इथे धागा टाकतो आहे.
१. विवाहोत्तर मुलीने नाव आहे तसेच ठेवले, तर सरकारदरबारी कुठे अडचण येण्याची शक्यता आहे का? किंवा बँक, पासपोर्ट, व्हिसा ह्या ठिकाणी काही
त्रास होउ शकतो का?
एक काल्पनिक नावांनी उदाहरण घेउ. समजा, "अवनी महेश गणोरे " हिचं "नरेश सोपान आवळे" ह्याच्याशी लग्न झालं; तर आधीचं आहे तसच नाव तिला सुरु ठेवण्यास काय काय अडचणी आहेत?

१९८० नंतर जन्मलेल्या पोरांचा सॉलिड लोचा

Taxonomy upgrade extras: 

गरवारे कॉलेज मध्ये असताना आमचा एक छान ग्रूप जमला होता .बर्याच वर्षानी आम्हि काही दिवसापुर्वि एक मस्त गेट टुगेदर केल. खाण -पिण आणि गगन भेदी गप्पा . सगळे साधारण २८ ते ३० या वयोगटातले .या गप्पांमध्ये मला आणि माझ्या एका मित्राला एक गोष्ट strike झाली की आमच्या गप्पांमध्ये खूप वेळा 'आपल्या वेळेस अस नव्हत ' हे वाक्य अनेक वेळेला repeat झाल होत ……. आईला ! भर तिशीतच आम्हाला nostalgia आला कि काय ? मला अस वाटत होत की हा निवृत्त झाल्यावर , सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून झाल्यावर पोरटोर मोठी झाल्यावर येणारी हि गोष्ट असते . कुठेतरी काहीतरी चुकत आहे खास.

व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण कार्यक्रमासाठी मदत हवी आहे.

Taxonomy upgrade extras: 

व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण कार्यक्रमासाठी मदत हवी आहे.

केंद्र शासनाच्या दोन वर्षांपूर्वी merge (मराठी?) झालेल्या एका कंपनीच्या ३५ ते ५० वर्षे वयोगटातील ३० अधिकाऱ्यांना दोन दिवसांचे प्रशिक्षण द्यायचे आहे. पुढील आठवड्यात हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.

प्रशिक्षण कार्यक्रमातील विषय:

  1. Self-motivation
  2. Working in Teams
  3. Positive attitude (primarily focused on change in attitude towards positivity and change management)
  4. Personality development (focused on inter personal and professional relationships)

एका स्विस कॅण्टन मधे बुरखा बंदी?

Taxonomy upgrade extras: 

स्वित्झर्लंड मधल्या एका "कॅण्टन" (प्रांत/राज्य/परगणा सारखे काहीतरी असेल) मधे संपूर्ण शरीर झाकणारे कपडे सार्वजनिक ठिकाणी घालायला बंदी केलेला कायदा नुकताच पास झाला. याचा मुख्य उद्देश बहुधा मुस्लिम स्त्रियांना बुरखे घालायला बंदी करणे हा असावा.
http://www.swissinfo.ch/eng/swiss_news/Burka_ban_approved_in_Italian-spe...

त्याचे वरकरणी कारण सार्वजनिक सुरक्षा हे दाखवले जाते आहे. बुरखा असेल तर आत कोण आहे हे कळणार नाही वगैरे वगैरे. पण इमिग्रंट लोकांनी स्वत:ची ओळख जपल्यास ते मुख्य प्रवाहात मिक्स होत नाहीत असे सहसा 'उजवे' लोक म्हणतात त्याचाही हा एक भाग आहे.

दहीहंडी

Taxonomy upgrade extras: 

कालच संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे खास करून मुंबई, ठाणे आणि नाशिक येथे जोशात आणि भक्तिभावात दहीहंडीचा उत्सव पार पडला, म्हणजे साजरा झाला (पडला आणि पर्यायाने जखमी झाला तो गोविंदा)

काही वर्षांपूर्वी दिवसा उजेडी साजरा होणारा हा सण, आता उत्सव बनून संध्याकाळ, अगदी रात्र झाल्याशिवाय रंगातच येतच नाही (ढंगात तर तो केव्हाही नव्हताच). चमचमणारे लाईटस, एलइडी टीवीस आणि कमाई म्हणून मिळणारी भरगच्च रक्कम ह्याचं आकर्षण कोणाला नसणार.

बुरखा

Taxonomy upgrade extras: 

बुरख्याची माझी पहिली ओळख माझ्या पुण्यातल्या वास्तव्यात झाली. तोवर त्याकडे फारसं लक्ष गेलंच नव्हतं. माझ्या पोस्ट ग्रॅजुएट डिग्रीच्या वर्गातली ही गोष्ट, म्हणजे १०-१२ वर्षापुर्वीची. वर्ग भरायला अवकाश होता. मी आणि काही मैत्रिणी कंपु करून गप्पा मारत बसलो होतो. वर्गात आमच्या समोरच्या बाकावर नखशिखांत काळ्या बुरख्यातली मुलगी आली. मला जरा नवलच वाटलं. माझ्या कोल्हापुरातल्या मुस्लीम मैत्रिणी मुनीरा बागवान, सबीना शेख, वाहिदा, झोया वगैरे कितीतरी डोळ्यांसमोर तरळुन गेल्या. त्या बुरख्याचा वापर करत नसत. क्षणभर वाटुन गेले, इथले लोक परंपरावादी दिसतात कदाचित!

भारतीय सण आणि त्यामागील कुटील उद्देश

Taxonomy upgrade extras: 

गविजी,
मी आपले प्रतिसाद गेल्या तीन वर्षापासून वाचत आहे. त्यातले न पटलेले वाक्य मला अजून सापडले नाही. आपण म्हणता ते पटावे असा माझा जेनेटीक मेक-अप असावा. :bigsmile:

या राखीच्याच मुद्द्यावरून मनात आलेले प्रश्न मी इथे लिहित आहे. कप्तानजी आणि अदितीजी हे दोन्ही रॅशनल व्यक्ती आहेत. त्यांचे म्हणणे समजून घेण्याची माझी प्रामाणिक इच्छा आहे.

दाभोळकरांची हत्या आणि आपण

Taxonomy upgrade extras: 

एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर असताना, विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन हा धर्म,देव, जात-पात या सगळ्यांना मागे टाकेल, हळूहळू हे सगळं नष्ट होईल असा अंदाज होता, पण विज्ञानाचा वापर केवळ उपकरण वा माध्यम म्हणून जास्त केला गेला. देव, धर्म संपले तर नाहीत पण त्यातल्या अविवेकाचे, मुर्खपणाचे आधुनिकीकरण झाले. आपला सगळा समाज या स्प्लिट सोशल पर्सेनॅलिटीने ग्रासलाय. म्हणजे आपण बाहेर वेगळे असतो आणि घरात वेगळे.

शरद जोशीँचा सिध्दांत

Taxonomy upgrade extras: 

लहान भाऊ म्हटला जोशीँच्या घरचा मयताचा निरोप द्यायला तू जा. साधारण वन डे रिटर्न अंतरावरच सर्व नातेवाईक राहतात त्यांचे. आज माझ्याकडे सहा बैल आणि चार गाई आल्या असल्याने आणि नुकतीच गटारी पाळल्याने श्रावण साजरा करण्याचा खूब मनसुबा रचलेल्या एका अत्यंत बड्या आसामीस ते मटेरिअल बोनलेस स्वरुपात द्यायचं असल्याने , मला आज जातीने इथे हजर राहून , बैल फाडायचे उच्च शिक्षण देणार्या महाविद्यालयात मी कमावलेले प्रगत ज्ञान आज सिध्दण्याची बिकट वेळ निकट आलेली आहे.

पाने

Subscribe to RSS - सामाजिक