काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २ (१५ डिसेंबर २०१९)

आज दिनेशभाईंनी त्यांची स्वतःचीच टॅक्सी दिली.
ह्या वॅगन-आर बाई कचकावून साडे-पाच लाख किलोमीटर चाललेल्या.
इकडे आपण च्यायला गाडी एक लाख किलोमीटर चालली की रेस्टलेस व्हायला लागतो.
पर्स्पेक्टीव्ह पर्स्पेक्टीव्ह म्हणतात ते हेच असावं बहुधा!

तर आधी दिनेशभाईंनाच ग्रॅण्ट रोड स्टेशनला सोडलं.
लगेचच एका कपलचं भाडं मिळालं.
गाडी जुनी तिला पॉवर स्टिअरींग नव्हतं.
स्टेशनवर टर्न मारता मारता हात भरून आले.
माझ्या मस्का व्हेन्टोची फार याद आली.
कपलला भारतीय विद्याभवनला जायचं होतं.
ही लोकेशन्स पहिल्या दिवसासारखीच.

मग चौपाटीवरून माझ्या आवडत्या स्पॉटला जाऊन थांबलो...
तारापोरवाला ऍक्वेरियमला. हे ही पहिल्या दिवसासारखंच!
आज चक्क थोडा वेळ मिळाला तेव्हढ्यात थोडं "अचंब्याच्या गोष्टी" वाचलं.
सुबोध जावडेकर आणि मधुकर धर्मापुरीकर ह्यांनी संपादित केलेला हा संग्रह.
किशोरवयीन मुलांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगितलेल्या गोष्टी हे सगळ्या कथांतील कॉमन सूत्र.
"पतंग" नावाची मिलिंद बोकिलांची अप्रतिम गोष्टं आहे ह्या संग्रहात.
टॅक्सी थांबवून मिलिंद बोकील वाचायचं स्वप्न पूर्ण झालं माझं फायनली Smile

तेव्हढ्यात एक चटपटीत तरुण मुलगी आली तिला मेट्रो सिनेमाला जायचं होतं.
सिम्पल रस्ता: मरीन ड्राइव्हवरून पुढे जाऊन फ्लायओव्हर खाली पेट्रोल पंपावरून लेफ्ट मारला की सरळ मेट्रो.
पण काहीतरी हुशारी दाखवण्याच्या नादात तो लेफ्ट मिस केला आणि नंतर कुठला तरी लेफ्ट-राईट-लेफ्ट मारून कसे कोण जाणे आम्ही चर्चगेट स्टेशनला पोचलो.
शी SSS फकिंग एम्बॅरसिंग!
ती वैतागलीच शिवाय घाईत असावी.
चर्चगेट स्टेशनला पोचल्यावर बोलली, "जाऊ दे आता मी ट्रेननीच परत उलटी मरीन लाईन्सला जाते."
साधी सिम्पल केस कॉम्प्लिकेटेड करून ठेवणाऱ्या एखाद्या रेम्याडोक्या सरकारी नोकरासारखं वाटलं मला!
मग तिच्याकडून पैसे नाही घेतले.
चुकीचं क्षालन वगैरे...

मग अजून एका जोडप्याला सँडहर्स्ट-रोड स्टेशनला सोडलं.
लहानपणी डोंबिवलीवरून आईबरोबर तिच्या ऑफीसला व्ही. टी. ला यायचो.
तेव्हा हे स्टेशन नेहमी वाचायचो.

समहाऊ कांजूरमार्ग आणि सँडहर्स्ट रोड मला सेंट्रलवरची भारी दुर्लक्षित स्टेशनं वाटायची.
म्हणजे भरपूर भावंडांच्या गोतावळ्यात एखादा मधला इन- सिग्निफिकंट भाऊ असावा तशी.
लोकं विक्रोळीला -भांडुपला रहातात पण कांजूरमार्गला कोणी राह्यल्याच कधी ऐकलं नाही.
लोकं भायखळा-मस्जिद व्ही. टी. ला कामाधंद्याला जातात पण सँडहर्स्ट रोड... नेव्हर.

ह्या स्टेशनच्या प्लॅटफॉर्मच्या बाहेर काहीच नसेल नुसती फसवी पोकळी असेल असं काहीतरी वाटायचं मला.
पण आज ते स्टेशन बाहेरून बघितलं आणि ते खरंखुरं असल्याची खात्री पटली.

आता एकदा कांजूरमार्गपण बघायला पाहिजे... हे हे हे!

सँडहर्स्ट रोड वरून एका मारवाडी जोडप्याला सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या क्वार्टर्समध्ये सोडलं.

हे हॉस्पीटलपण छान प्रशस्त मोठं असूनही थोडं दुर्लक्षितच म्हणता यावं.
म्हणजे के ई एम, जे. जे., नायर वगैरे गव्हर्नमेंट हॉस्पिटलचा दरारा ह्याला नाही.
पण पी. डिमेलो रोडवरचा छान शांत एरिया ह्याला लाभलाय.
किंवा कदाचित एरवी गर्दी असेल आणि रविवार सकाळ म्हणून शांत असेल.
पण हा (आजतरी) शांत थोडा खंडहर टाईप्स कॅम्पस आवडला मला.
इकडे थोडा ब्रेक घ्यायचं ठरवलं.

कॅंटीनमध्ये शांतपणे बसून मिसळपाव नी चहा मारला.
ही अशी शेट्टीटाइप पांढऱ्या वाटाण्याची उसळवाली पोटभरू मिसळ बऱ्याच दिवसांनी खाल्ली.
आमचा दोस्त पप्या कॉलनीतल्या उडप्याकडे एक मिसळ - पाचदा एक्स्ट्रा उसळ (जी कॉम्प्लिमेंटरी असते) आणि वीस पाव खायचा त्याची आठवण आली...

मग आरामात बाहेर पडून एका माणसाला क्रॉफर्ड मार्केटला सोडला.
त्या भल्या माणसाने काढलेला आमचा हा टॅक्सी ताईंबरोबरचा फटुआ!
एखाद्या सीझन्ड बॉक्सरसारखं टोणपे खाल्लेलं तिचं नाक बघा!

Crawford

मी हा फोटो निरखून बघत असतानाच खिडकीवर टकटक झाली.
एक टीन एजर (बहुतेक "आस्कर") पोरगी शेम्बड्या बाळाला टेंगण्यावर घेऊन माझं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करत होती.
मी सुट्टे पैसे द्यायचे की निगरगट्ट इग्नोर मारायचा ह्यातला एक ऑप्शन निवडणार,
इतक्यात ती बोल्ली,
"क्या अंकल कबसे आवाज दे रैले तुमको... बाबुलनाथ चलोगे क्या?"
मी मनातल्या मनात तिला सॉरी बोलत गडबडीनी बसवलं आणि आपली रस्ता सांगण्याची पेटन्ट रिक्वेस्ट टाकली.

तिनीसुद्धा कॉन्फिडन्टली हो सांगितलं, "ये मेरा रोजका रस्ता है"... वगैरे...
आणि ऑलमोस्ट मला नो एंट्रीत गाडी घालायला लावली.
समोरून राप राप येणाऱ्या गाड्या बघून मी रन टाईमला तिची डायरेक्शन्स ओव्हरराईड केली.
तो लेफ्ट सोडून पुढे गेलो.
(प्रत्येक देश, जहाज, विमान आणि टॅक्सीच्या कप्तानाला असे स्प्लिट-सेकंड हार्ड-डिसीजन्स कधी कधी घ्यावे लागतात उदाहरणार्थ नोटबंदी! )
मग तिची चिडचिड इग्नोर मारत शिस्तीत मॅप चालू केला.

ती आणि तिचा छोटा बाबू डोळे विस्फारून मॅपकडे नवलाईनी बघत राह्यली.
मग त्यांना मी गूगल मॅपचा झटपट क्रॅश कोर्स दिला.
बाबुलनाथ आल्यावर मीटरचे साठ रुपये झाले.

खूप गरीब, खूप फाईट माराव्या लागणाऱ्या लोकांत एक स्ट्रीट-स्मार्टपणा असतो.
बेरकी आणि करुण झळा आलटून पालटून घेत राहतो तो
तिच्यातला तो स्मार्टनेस आता जागा झाला.
"क्या अंकल रोज मै इधरसे पच्चास रुपयेमे आती हूँ! आपने आज घुमाके लाया" वगैरे बोलू लागली"

मी बोल्लो, "दीदी जो देना है दे दो नो प्रॉब्लेम"
"मेरे पास इतना ही है", चाळीसच्या नोटा पुढे करत ती म्हणाली.
तिच्या कोवळ्या चेहऱ्यावरचं टफ कुकीचं क्युट आवरण बघून मला हसू यायला लागलं.
(अवांतर: "क्युट" हा शब्द मुलाच्या तोंडी कोणत्याही वेळी शोभत नाही हे माझं स्ट्रॉंग मत आहे. सो हे वाक्य असं वाचा:)
तिच्या कोवळ्या चेहऱ्यावरचं टफ कुकीचं लोभस (की बेरकी की करुण?) बेअरींग बघून मला हसू यायला लागलं.

तिच्याच वयाच्या बँकर इंटर्न्स बी. के. सी. च्या स्टारबक्समध्ये चाळीस हजाराचं महिन्याचं फक्त कॉफीचं बिल करतात...
त्याची उगीचच आठवण झाली.

"ये भी नही दिया तो चलेंगा दीदी", तिला म्हटलं.

हे ऐकून तर फुललीच ती,
"आपको बहोत दूरका अच्छा भाडा मिलेगा..." वगैरे तोंड भरून आशीर्वाद देत गेली.
कडेवरचा बाबू पण बोळकं पसरून हसत होता.

...
...
...

ठीक आहे ना आपल्या नियमावलीत टॅक्सी फायद्यात चालवायची असा नियम कुठे आहे?
हे हे हे हे Smile

लगेच हॅंगिंग गार्डनचं भाडं मिळालं:
बाबुलनाथ वरून सिग्नल नी चौपाटीला राईट मारला की वाळकेश्वरवरून हँगिंग गार्डन: नो ब्रेनर!
तरीपण मॅपवर टाकलं जरा कॉन्फिडन्स नसल्यामुळे.
मॅप च्यायला चौपाटीवर न जाता आतून पेडर रोडवरून जायला सांगत होता.
मला वाटलं असेल बेटर रास्ता म्हणून उलटी टॅक्सी फिरवली आणि बाबुलनाथ पुन्हा क्रॉस करताना मॅपवर "डन!"
आलं.

च्यायची म्हणजे आधीचं बाबुलनाथ डेस्टिनेशन बदललंच नव्हतं.
परत त्या शेट्टी कुटुंबाच्या शिव्या खात कसाबसा यु टर्न मारून परत चौपाटीवरूनच गेलो.
त्यांच्याकडूनही चुकीचं क्षालन म्हणून वीस रुपये कमी घेतले.
स्प्लिट-सेकंड हार्ड-डिसीजन्स कधी कधी असे सडकून चुकतात उदाहरणार्थ नोटबंदी Lol

आज म्हणजे एकंदरीत शिव्या खायचाच दिवस आहे!

हँगिंग गार्डनला फोटोग्राफी करायला आलेली तीन पोरं-पोरी त्यांच्या ट्रायपॉडसकट उचलली.
बिचारी सकाळी लवकर आली असावीत. डिलाईल रोडपर्यंत पेंगत होती.

डिलाईल रोड म्हणजे परळ टिपिकल मराठी मालवणी बहुल एरिया.
एक मालवणी आई आणि तिची दोन तरुण मुलं उचलली.
पुरुषांच्या बाबतीत अजून एक मिथ-बस्टर:
पुरुष पण सडकून गॉसिप करतात.

कोण्या तरी लहान बाळाच्या बारशावरून प्रेमळ उणी दुणी काढणं चालू होतं.
"काय तां टाईट ड्रेस.
बाबू नुसतो घामाघूम (हे मालवणी लोकं बाळाला "बाबू" भारी गोड स्टायलीत बोलतात)
ह्यांका कळूक नांय?..."
वगैरे फुल्ल ऑन चालू होतं!

त्यांना वरळी नाक्याला सोडून तडक घरी आलो.

दुपारची झोप काढून पुन्हा टॅक्सी काढणार तर टॅक्सी स्टार्ट व्हायलाच तयार नाही.
दिनेशभाईंना बोलावून घेतलं... इग्निशनचा प्रॉब्लेम होता.
रिपेअर व्हायला सोमवार उजाडणार.

सो आजचा दिवस अर्धाच पकडता येईल.
आजची कमाई: ३८१ रुपये

क्रमश:
आधीचे दुवे:
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: उपोद्घात
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २८ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३१ जानेवारी २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ मार्च २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २०१८
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९ उत्तरार्ध
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ५ व १२ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ फेब्रुवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १८ मार्च २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २४ मार्च ते १२ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २० एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २६ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३० एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ मे आणि २९ मे २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १५ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २२ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट माईलस्टोन: २० जुलै २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २० जुलै ते डिसेंबर पहिला आठवडा २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १ (८ डिसेंबर २०१९)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

काय सुरेख लिहितोयस रे! बहोत बढिया. ब्लॉग करून त्यावर हे सगळं लिखाण टाक.

आणि फोटो एकदम झ्याक आलाय. म्हणजे क्षणार्धात मी समोरून येऊन बिचकत "प्लाझा?" विचारलंय, तू तीन सेकंद काहीच न बोलता (दिवार मधल्या अमिताभसारखं!) बघत रहातोस, "नाही येत बहुदा हा" विचार करत मी ऑलमोस्ट वळणार ईतक्यात उजवीकडे तोंड करून पचाक्कन पिचकारी टाकतोस, मी बुचकळ्यात की हा बाबा येणारे की नाही? तू मान फिरवून परत माझ्याकडे बघतोस आणि डावीकडे थोडंसं, "बैठो", अशा अर्थी डोकं करून दार तुझं दार उघडायला लागतोस हे सगळं डोळ्यापुढे आलं ............ ईतका झ्याक आलाय !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

धन्यवाद मि. पा. Smile
ब्लॉग आहेय ऑलरेडी: https://kalyapivalyanavasachigosht.blogspot.com/

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका भारी पुस्तकाचं मटेरियल. मस्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आभार! बघूया कसं जमतंय ते..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठीक आहे ना आपल्या नियमावलीत टॅक्सी फायद्यात चालवायची असा नियम कुठे आहे?
हे एकदम भारी आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"आपको बहोत दूरका अच्छा भाडा मिलेगा..." वगैरे तोंड भरून आशीर्वाद देत गेली.

मी जे काही वाचले होते, त्याप्रमाणे, टॅक्सी काय किंवा रिक्षा काय, परंतु चालकाला सर्वाधिक फायदा हा सुरुवातीच्या (मीटर पाडल्यावरच्या, किमान) भाड्यात होतो. त्यानंतरच्या (वाढत जाणाऱ्या) भाड्यात तुलनेने तितका फायदा नसतो.

म्हणजे, थोडक्यात, या थियरीप्रमाणे:

(१) एका लांबच्या भाड्याच्या तुलनेत अनेक जवळची भाडी ही सहसा अधिक किफायतशीर ठरतात, आणि
(२) कॉण्ट्ररी टू पॉप्युलर बिलीफ, गिऱ्हाइकाला गंडवून उगाच लांबच्या रस्त्याने घुमविण्यात चालकाचा खरे तर काहीही फायदा नसतो; असला तर तोटाच असतो. (कारण, लांबच्या रस्त्याने घुमवून होणाऱ्या लाभाच्या तुलनेत, तेवढ्याच वेळात एखादे जवळचे भाडे स्वीकारल्यास होणारा लाभ हा अधिक असतो, आणि एखाद्या गिऱ्हाइकास लांबच्या रस्त्याने घुमवून, त्याच वेळात असे एखादे जवळचे भाडे मिळवण्याची संधी चालक गमावीत असतो.) तस्मात्, तसे करण्यास चालकाला काहीही हशील असण्याचे कारण नसते.

आता, एक अनुभवी चालक या नात्याने माझे तुम्हाला प्रश्न असे:

(१) या थियरीत तथ्य आहे काय? असल्यास, किती?
(२) या थियरीत तथ्य असल्यास, "आपको बहोत दूरका अच्छा भाडा मिलेगा..." हा (अ) आशीर्वाद, की (ब) शाप, की (क) गिऱ्हाइकाचा निव्वळ अडाणचोटपणा?

कळावे.

----------
तळटीप:

म्हणजे, तुम्ही अनुभवी चालक; मी नव्हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे खरं तर सब्जेक्टिव्ह आहे. पण थोडंसं लांबच्या भाड्याकडे झुकणारं माझ्या मते.
/////
एका लांबच्या भाड्याच्या तुलनेत अनेक जवळची भाडी ही सहसा अधिक किफायतशीर ठरतात
////

हे तेव्हाच खर्ं असेल जेव्हा जवळची भाडी एकापाठोपाठ मिळतील.
पण बहुधा दोन भाडी मिळण्याच्या काळात रॅंडमनेस असतो.
आधीचं भाडं जिथे सोडू तिथे जवळपास पुढच्ं भाडं असण्याची शक्यता हा सर्वात मुख्य फॅक्टर.
लांबचं भाडं मिळाल्यानी हा रॅंडमनेस साहजिकच कमी होतो.
असं लॉजिक "आम्ही" ड्रायव्हर लोक लावतो.

पण ह्यात काही फ्लॉज असू शकतात. (उदा: रिटर्न एम्प्टीच आलो तर?)
पण मला ते स्वत: तपासायला आवडेल ...
मला अजून कधी तगडं लांबचं भाडं नाही मिळालंय खरं तर... मिळालं की सांगतो: "सरलं अश्वस्य मुखे" वगैरे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे तेव्हाच खर्ं असेल जेव्हा जवळची भाडी एकापाठोपाठ मिळतील.
पण बहुधा दोन भाडी मिळण्याच्या काळात रॅंडमनेस असतो.

हे खरेच. परंतु, समजा, दादर ते बोरिवली असे एकच लांबचे भाडे (अशा ट्रिपमध्ये परतीचे भाडे लवकर न मिळण्याची शक्यता गृहीत धरून - किंवा न धरतासुद्धा) पत्करण्यापेक्षा, दादरमधल्या दादरमध्येच (किंवा फार फार तर माटुंगा-माहीमपर्यंत) अनेक भाडी (दोन भाड्यांमधला रँडमनेस जमेस धरूनसुद्धा) अधिक श्रेयस्कर ठरणार नाहीत काय?

(दादरमधल्या दादरमध्येच - मधला रँडमनेस / लगेच दुसरे भांडे न मिळण्याची शक्यता गृहीत धरून - अनेक भाडी मिळण्याची शक्यता ही बोरिवलीहून दादरचे परतीचे भाडे मिळण्याच्या शक्यतेपेक्षा अधिक नसावी काय? अनलेस, मध्यंतरीच्या काळात बोरिवलीतल्या बोरिवलीत भाडी मिळण्यावर विसंबून राहावयाचे असेल, तर गोष्ट वेगळी. परंतु तरीही, अनलेस आय ॲम व्हेरी मच मिष्टेकन, बोरिवलीत टॅक्सीकरिता एकसुद्धा भाडे लवकर मिळण्याची शक्यता ही दादरमध्ये तेवढ्याच वेळात जवळच्या जवळची अनेक भाडी - अगदी मधला वेळ गृहीत धरूनसुद्धा - मिळण्याच्या शक्यतेपेक्षा खूपच कमी नसावी काय?)

अर्थात, हे सर्व कंजेक्चर झाले. त्यामुळे,

पण मला ते स्वत: तपासायला आवडेल ...
मला अजून कधी तगडं लांबचं भाडं नाही मिळालंय खरं तर... मिळालं की सांगतो: "सरलं अश्वस्य मुखे" वगैरे!

असे काही प्रत्यक्ष अनुभवातून (जसा मिळत जाईल तसे) तपासून काही अनुमान नोंदविता आले, तर ते रोचक तथा स्वागतार्ह ठरेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक टीन एजर (बहुतेक "आस्कर") पोरगी शेम्बड्या बाळाला टेंगण्यावर घेऊन माझं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करत होती.

"आस्कर" बोले तो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"भिकारी"... ते थेट लिहिणं थोडं रूड वाटलं मला!
https://www.thesaurus.com/browse/asker

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0