काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ३ (२२ डिसेंबर २०१९)

Boot

आज टॅक्सी घेतली आणि जवळच हँगिंग गार्डनला थांबलो.

लहान बाबू असताना गेलेलो म्हातारीच्या बूटाजवळ ते कैक वर्षांनी आज गेलो.

एका साध्याश्या म्हातारबाबांना फोटो काढायला सांगितला त्यामुळे त्यांची फिगर... आपलं सॉरी फिंगर किंचित दिसतेय.

काइंडली ऍडजस्ट!

मग हँगिंग गार्डन वरून आमच्या संजूदादा सारख्या एका टकलू माणसाला क्रॉफर्ड मार्केटला सोडला.

संजूदादा ब्रूस विलीस सारखा दिसतो पण हा मात्र ब्रूस विलीस सारखा दिसत नव्हता.

पण संजूदादासारखं मात्र दिसत होता Smile

तिकडे क्रॉफर्ड मार्केटला एक खु SSS पच आदबशीर टिपिकल खोजा (की बोहरी? की फर्क पैंदा!) व्यापारी भेटला.

"मझगांव जायेंगे?" हेच त्यानं इतकं पोलाइटली विचारलं की त्या आवाजात मी तर त्याला मझगांवला पाठुंगळी नेलं असतं.

बाय द वे माझगावचा उच्चार खरे कॉस्मो मुंबईकर "मझगांव " असाच करतात...

सो प्युरिटन्स कॅन फक ऑफ!

मझगांवच्याच एका गल्लीतून लग्नाला जायला छान नटलेल्या एका हँडसम आईला आणि तिच्या दोन सुंदर मुलींना उचललं आणि परेलच्या चिवडा गल्लीत सोडलं.

आई हँडसम असली तरी वरच्या दोन रुपयांसाठी बरीच कटकट केली.

पण चालसे... तिनी का सोडावेत? फेअरच आहे तसं ते.

(अवांतर सिडक्शन टीप: तुमच्या आवडत्या मुलीला तिची आई खूप सुंदर दिसते असं जरूर सांगा. मुलींना आवडतं ते)

मग परेलवरून एका तरुणाला फिनिक्स मॉलला सोडलं.

बाहेरचा असावा, किती पैसे घेणार विचारत होता.

मीटरनीच जाईन सांगितल्यावर त्याचा सुखावलेला चेहरा बघून लोकांपर्यंत किंचित का होईना सेवा पोचतेय असं वाटून मीही सुखावलो.

भेंडी असं मकरंद साठेसारखं लांबलचक वाक्य ल्ह्यायची बरीच वर्षं तमन्ना होती... हे हे हे Smile

ओ फक: जयंत पवारांची "फिनिक्सच्या राखेतून उठला मोर" फिनिक्स मॉलवरचाच शब्दखेळ आहे हे आत्ता मला स्ट्राईक झालं!

भारी कथा आहेय ती.

"टेंगशेंच्या स्वप्नात ट्रेन"सुद्धा.

दॅट रिमाइंड्स मी: त्यांचं "वरनभात लोंचा नी कोन नाय कोंचा" वाचायचंय.

मग एल्फिन्स्टनवरून एका तेलगू कुटुंबाला माटुंगा लेबर कॅम्पला सोडलं.

त्यातल्या म्हाताऱ्या बोळक्या आजी पुढे बसल्या पण एकदा दोनदा अर्जंट ब्रेक मारल्यावर काचेवर आपटता आपटता वाचल्या.

मग मीच जरा काळजीपूर्वक गाडी चालवली.

माटुंगा लेबर कॅम्प माझ्या एका "मैत्रीणीच्या" "मित्राचा" एरिया.

तिच्या पाठी मी सहा-सात वर्षं हात धुवून लागलेलो.

म्हणजे "हां बोले तो शादी करू"च्याच तयारीत.

पण तिनी शेवटपर्यंत मला फ्रेंडझोनमध्येच ठेवलान.

आणि माटुंग्याच्या "मित्रा"शी फायनली लग्न केलं.

आता सगळे आपापल्या परीनी सुखी आहेत पण ह्या एरियात आल्यावर मला तो सगळा मॅडनेस आठवल्यासारखा झाला.

मग माटुंग्यावरूनच दोन-तीन बायकांना कुठल्यातरी मशिदीत जायचं होतं...

आधी किंग्ज सर्कल सांगितलं आणि ऐन वेळीस अँटॉप हिल अँटॉप हिल ओरडू लागल्या.

मी बावचळलो त्यात बॅटरी संपल्यामुळे मॅप ऑफ झाला!

त्यांच्या बऱ्याच शिव्या खात अँटॉप हिलच्या कुठच्यातरी कोपच्यात कसाबसा पोचलो.

आता मला टॅक्सीवाल्यांच्या गोच्या आणि अडचणी थोड्या थोड्या समजायला लागल्यायत बहुधा.

मग तिकडून एका सालस मुलाला प्लाझाला सोडला.

आणि शिवाजीपार्क वरून एका मध्यमवयीन काका काकूंना लकी हॉटेलला सोडलं.

ते नवरा-बायको नसून बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड असावेत असं मला हलकं इंट्युशन झालं...

बट नॉट जजींग ऑफकोर्स!

तिकडून तडक घरी जाऊन थोडा ब्रेक घेतला...

ब्रेकनंतरही संध्याकाळी बरीच भाडी मारली.

एका मुलाला गुरु तेग बहादूर नगर ला सोडताना बऱ्याच गप्पा मारल्या.

त्याला नं राहवून मी एक प्रोजेक्ट म्हणून टॅक्सी चालवतोय ते सांगितलं.

त्यानंही त्याच्या लाईफमधलं बरंच काय काय सांगितलं...

तो गे असावा असं मला हलकं इंट्युशन झालं...

बट नॉट जजींग ऑफकोर्स!

तिकडून दोघांना वडाळ्याच्या लोढा कॉम्प्लेक्सला सोडला.

बहुतेक इस्टेट एजंट होते ते.

नेहमी प्रमाणे रस्ता दाखवायची त्यांनाच निर्लज्ज विनंती केली.

एकानी स्वस्त स्ट्रॉंग पण मस्त परफ्यूम मारला होता.

मला आवडला.

कधी कधी स्ट्रॉंग परफ्यूमनी डोकं उठतं पण हा आवडला.

तिकडे लोढाच्या गेटवरच तीन टिनेजर्सना बी. के. सी. च्या फ्ली-मार्केटला जायचं होतं

चिकार श्रीमंत असाव्यात.

त्यातल्या एकीनी पण क्लास परफ्यूम मारला होता.

थिये मायगेल ह्या डिझायनरचा चा 'एंजल ' बहुतेक.

असो...

वडाळ्यावरून बी. के. सी. ला नवीन कनेक्टरमार्गे जायचा रस्ता चक्क मला माहिती होता.

बी. के. सी. वरून एक तरुण नवरा बायको आणि त्यांच्या बाबूला उचललं.

वांद्र्याच्या खाडीतल्या मच्छरांनी पाय फोडले नुसते.

त्यांना (म्हणजे कुटुंबाला ... मच्छर माहिमपर्यंत आले की नाही माहीत नाही) माहीम दर्ग्याला सोडलं.

आता खरं तर टॅक्सी परत द्यायचा टाइम झालेला तरी तुलसी पाईप रोडवर एक गरीब फॅमिली आणि एक मॅट्रेसवाला ह्यांना एकत्र सोडलं.

तेवढाच थोडा अजून कर्मा +

दादर फूल मार्केटला दोन बायका डेस्परेटली टॅक्सी शोधात होत्या.

त्यातली एक आमच्या जग्याची बहीण शोभासारखी होती.

शिडशिडीत आणि प्रेमळ डोळयांची...

त्यांना परेल सिग्नललाच जायचं होतं...

ऑन द वेच होतं... सोडलं.

आता टाईमपास न करता सुसाट मलबार-हिलला जायचं म्हणून दोन तीन जणांना नाही म्हणालो.

पण मोरवाल्या फिनिक्सजवळ एक अंकल सरळ टॅक्सीत घुसलाच.

लागली का आता...

इकडे दिनेशभाईचे फोनवर फोन.

टॅक्सीवाले जेव्हा कळवळून सांगतात "भाई टॅक्सी देने का है" ते बऱ्याचदा खरं असतं हे आज मला नीटच कळून चुकलेलं.

खरं तर फार लांब नव्हतं भाडं.

आम्हाला पोदार हॉस्पिटलजवळ जायचं होतं.

पण दादर साईड वरून येऊन यु टर्न मारून मोरवाल्या फिनिक्सला जाणाऱ्या गाडीवाल्यांनी रस्ता जाम करून टाकलेला.

तब्बल एक तास तिकडेच अडकलो.

ते चालत गेले असते तरी १५ मिनिटांत पोदारला पोचले असते...

असो.

त्यांना कसंबसं सोडलं आणि मग मात्र सुसाट...

आजची कमाई: ९५० रुपये

क्रमश:
आधीचे दुवे:
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: उपोद्घात
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २८ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३१ जानेवारी २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ मार्च २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २०१८
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९ उत्तरार्ध
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ५ व १२ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ फेब्रुवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १८ मार्च २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २४ मार्च ते १२ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २० एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २६ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३० एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ मे आणि २९ मे २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १५ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २२ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट माईलस्टोन: २० जुलै २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २० जुलै ते डिसेंबर पहिला आठवडा २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १ (८ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २ (१५ डिसेंबर २०१९)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

नील, तुमच्या या लेखमालिकेचा मी बिग फ्याण आहे.

मध्यमवयीन जोडपी ही गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड सुद्धा शकतात एकमेकांचे. नवरा-बायकोच असले पाहिजेत ही ममव मानसिकता आहे. इथे जज करत बसला नाहीत हे झ्याकच. बाकी नॉट जजिंग ऑफ कोर्स म्हणत म्हणत तुम्ही बरीच जजमेंटं मारली आहेत की राव! यालाच unconscious bias म्हणत असावेत का? ऑफकोर्स, आय याम नॉट जजिंग.

अवांतर : तुमची 'अवांतर सिडक्शन टीप' हल्ली भलतीच महाग पडण्याची दाट शक्यता आहे. का, ते सेल्फ एक्ष्प्लेनेट्री समजावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खुप खुप आभार आणि...
गिल्टी ॲज चार्ज्ड!
विशुध्द नॉन जजमेन्ट तेव्हाच म्हणता येईल जेव्हा मी हे नोटीस केलं हे सांगणारसुद्धा नाही...
पण इथे मी नॅरेटरच्या भूमिकेत असल्याने सांगण्याच्या क्रियेला झुकतं माप दिलंय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विशुद्ध नॉनजजमेंंट तेव्हाच म्हणता येईल जेव्हा तुम्हाला नोटीस होणारसुद्धा नाही.

(पण अर्थातच मी तुम्हाला जज करत नाहीये...)

- (नॉनजजमेंटल) 'न'वी बाजू.
----------

(पण... पण... पण... प्युरिटनांनी काय म्हणून फक ऑफावे?)

- (सोयीनुसार, कधीमधी प्युरिटन) 'न'वी बाजू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0