काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ४ (२९ डिसेंबर २०१९)

सकाळी दिनेशभाईंनी लवकरच बोलावलं होतं.

शार्प ९ ला पोचलो.

ह्या वेळीस सुशीलभाईची टॅक्सी होती.

सिमला हाऊसला.

हा मलबार हिलच्या अल्ट्रा पॉश लोकवस्तीतला एक थोडा गरीब घेट्टो.

सुशीलभाई गोरा घारा गुटगुटीत बाळासारखा प्रेमळ माणूस.

त्यानी आपल्या टॅक्सीच्या खोडी आणि टिपा निगुतीनं समजावून सांगितल्या.

सकाळी साधारण अशी भाडी मारली.

मलबार हिल ते ग्रॅण्टरोड स्टेशन:

इकडे कंबाला हिलच्या फ्लायओव्हरखाली सिग्नलवर थोडा कन्फ्युज होऊन गाडी पुढे लावली.

गवालिया टॅंकवरून येऊन पेडर रोडला राईट मारणारी लोकं माझ्यामुळे थोडी ब्लॉक झाली.

हेन्स दोनतीन धनिक बाळांच्या शिव्या खाल्ल्या. सॉरी रिच किड्स!

ग्रॅण्ट रोड स्टेशन ते बाणगंगा:

हा चौपाटीवरून वळणारा माझा खास आवडता रोड.

बाणगंगेला लागूनच राजभवनची एंट्री आहे हे आजच कळालं च्यायला.

राजभवनच्या एंट्रीचा हा फोटो:

महिन्याभरापूर्वी इकडे सिंहासन २.० चा खराखुरा फार्स चालू होता.

'सक्काळ सक्काळ' कोण कोण लोक्स आले असणार तेव्हा इथं Wink

Rajbhavan

राजभवनाच्या बाजूलाच तिकडच्या कर्मचाऱ्यांची छोटीशी कॉलनी आहे तिकडून सी. एस. टी. चं भाडं मिळालं:

छान पुण्याची मुस्लिम फॅमिली होती.

"भोत सालों बाद सभी लोगां मिले.

अच्छा लगा.

अंजुम तू बेटा कब्बी कर्रा शादी?

अगले सालां वापस आयेंगे फिर!"

असं काय काय छान बोलत होते ते.

फातिमानगर - वानवडीचे असणार ते असं जाम वाटलं मला.

माझा पुण्यातला आवडता एरिया... फुल्ल कॉस्मो.

आत्ता बाणेरला शिफ्टलो तरी एक टाइम खूप धमाल केलेली वानवडीला!

असो...

त्यांना सी. एस. टी. च्या लॉन्ग रूटच्या गेटवर ड्रॉप केलं.

फिरत फिरत तिकडून बॅलार्ड इस्टेटच्या भिंतीला लागून येताना एक मराठी सी-मन भेटला.

त्याला फॅमिलीसकट चर्चगेटला ड्रॉप केला.

लगेच स्टेशनवर एक काकू भेटल्या त्यांना जवळच आकाशवाणी आमदार-निवासला जायचं होतं.

समोरचे दोन टॅक्सीवाले फ्लॅट नाय बोलले पण मी त्यांना हाका मार मारून आपल्या टॅक्सीत बसवलं.

(पहा नियम २-ब)

ओव्हल मैदानालगतच्या रस्त्याच्या उजव्या बाजूची ही गल्ली मी थोडी हुकवली आणि मग अन-डू करायला पुढून सुसाट यु टर्न मारला.

काकू थोड्या किंचाळल्या पण टर्न सेक्सी बसला!

सॉरी काकू Smile

इकडेच जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आहे.

खूप शांत सुंदर लीफी गल्ली आहे ही.

एका तोंडावर रस्त्यापलीकडे ओव्हल मैदानातला पोरांचा क्षीण कल्लोळ

जे. बी. च्या गेट पुढची शांत गार सावलीतली झाडं...

इकडे टॅक्सी लावून थोडा ब्रेक घेतला...

तितक्यात आमदार निवासातलं कार्यकर्त्यांचं भाडं मिळालं.

धनंजय मुडेंच्या गाववाले होते.

माझं मराठी ऐकून थोडे सरप्राईझ झाल्यासारखे वाटले.

माझं गाव नि आडनाव विचारलंन

माझ्या जातीचा आणि अर्गो पॉलिटिकल ओरिएंटेशनचा अंदाज घेत असावेत असा मला संशय आला थोडा.

चालायचंच ...

जात गेस करणं हा आपल्या भारतीय लोकांचा आवडता टाईमपास आहे.

त्यांना कुलाब्याला ऑलिम्पिया हॉटेलला सोडलं.

थोडं पुढे लगेच एक आई बाबा आणि टीन एजर पोराला उचलला.

त्यांना जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सला जायचं होतं.

हे च्यायला चर्चगेट ते व्ही. टी. आणि व्हाईस-अ-व्हर्सा जाताना अजून गोंधळायला होतं.

फकिंग एम्बॅरसिंग!

त्या मुलालाच फोन दिला आणि मॅप दाखवायची विनंती केली.

(च्यायची मॅप होल्डर पण तुटलेला)

बहुतेक त्याला जे. जे. स्कूल ऑफ आर्किटेक्टला ऍडमिशन मिळाली असावी आणि आज जस्ट कॉलेज बघायला आले असावेत बहुधा.

त्याचे डोळे जे. जे. चा गेट बघितल्यावर नुसते चमचमायला लागले होते.

माझी बहीण सोनाचं हे कॉलेज...

आज बिग शॉट आर्किटेक्ट आहे ती.

मग जे जे वरून रमत गंमत भेंडी बाजार वरून निघालो.

सरळच जाणार होतो पण अचानक काय झटका आला आणि एका सिग्नलला लेफ्ट मारला.

तो मौलाना शौकत अली रोड निघाला.

तिकडे एक भाडं उचललं बॉम्बे सेंट्रलचं.

कामाठी-पुरा शुक्ला जी स्ट्रीट वरून जाताना डेढ गल्ली दिसली.

इकडे सकाळी चार वाजता जुन्या (बहुतेक चोरीच्या) शूजचा बाजार भरतो.

आम्हीही वांद्र्यावरून सुमडीत यायचो पहाटे पहाटे उठून स्वस्त सेकंडहँड शूज घ्यायला.

बऱ्याचदा त्या शूजना विचित्र ओलसर वास यायचा. पण ब्रॅन्डचं आकर्षण होतंच

तिकडून साठ रुपयांत उचलेले एक वुडलॅंड्स शूज घालून मी कॉलेजमध्ये बरेच दिवस चमकलो होतो.

आमचं ३-४ जणांचं सिक्रेट होतं खरंतर ते.

पण ग्रुपमधल्या अमल्यानी शो ऑफसाठी कोणालातरी सांगितलं आणि बबाल झाला!

मग कॉलनीतल्या अवली पोरांचे घरी लँडलाईन वर फोन यायचे,

"निलेश भाय है क्या? उनसे शूज का डील करेन का है."

बाबा शिव्या देत फोन आपटायचे...

गम्मतच सगळी!

Dedh Galli

(हे छायाचित्र मिड-डे साईट वरून साभार

https://www.mid-day.com/articles/mumbais-big-secret-a-night-market-for-s...)

कामाठी-पुऱ्यातून बॉम्बे सेंट्रलला भाडं ड्रॉप केलं.

आणि बेलासिस रोड वरून ताडदेवच्या दिशेला निघालो.

हा बॉम्बे सेंट्रलचा गजबजलेला मेन रोड.

दोन्ही बाजूंना असंख्य दुकानं रस्त्यावरचे फेरीवाले.

डावीकडे सिटी-सेंटर होलसेल मार्केटची गर्दी...

हळूहळू टॅक्सी चालवताना एका साध्याशाच मुलीचं परफेक्ट टूश दिसलं पाठून.

अप्रतिम गोलाई होती...

टॅक्सी दोनच सेकंद स्लो झाली...

पण बस्स तेवढंच..

भक्तीभावाने त्या दैवी देणगीला मनात हात जोडले आणि पुढे निघालो...

सॉरी बायको!

दीड वाजलेला जवळजवळ सो सी लिंकवरून वांद्र्याला जावं म्हणून ताडदेव-हाजीअली करत

तिकडे एका काकांना वरळी पोलीस चौकीला सोडून वरळी सीफेसला आलो.

जाता जाता सी-लिंकच्या बॅकड्रॉपवरचं हे निवांत कपल.

त्यांच्या स्ट्रोलर बॅगवरून मुंबई बाहेरचं असावं असं वाटतंय.

ते एकमेकांशी काही न बोलता मुंबईचा समुद्र आपापल्या परीनं पितायत...

पिऊ देत...

सायलेंस इज दी बेस्ट कॉन्व्हर्सेशन वगैरे Smile
Nivant

क्रमश:
आधीचे दुवे:
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: उपोद्घात
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २८ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३१ जानेवारी २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ मार्च २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २०१८
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९ उत्तरार्ध
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ५ व १२ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ फेब्रुवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १८ मार्च २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २४ मार्च ते १२ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २० एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २६ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३० एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ मे आणि २९ मे २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १५ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २२ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट माईलस्टोन: २० जुलै २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २० जुलै ते डिसेंबर पहिला आठवडा २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १ (८ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २ (१५ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ३ (२२ डिसेंबर २०१९)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

हे नरपुंगवा, वाटेत दृष्टिस पडलेल्या तरूणीच्या नेत्रखेचक निरंजन नितंबविशेषांचा उल्लेख तू ज्या लीलेने केला आहेस, आणि वर ज्या सहजतेने भार्या क्षमापना केली आहेस त्याने मी केवळ थक्क झालो आहे!!!!! "पदर पाहीलात?" हा पश्न पुलंच्या ज्या 'धोंडो भिकाजी जोशीला' विचारला गेला तो धोंडो भिकाजी जोशी म्हणजे मी :-). त्या नारी प्रश्नाचं, "गोलाई पाहिलीस?" हे नररूप मला बाप जन्मात कल्पता आलं नसतं!

और कैसी बातां करते तुम मियां? हैद्राबादके मेहेमानां है वो तो उनको तुम पुनेमे भेज दिये? ऐसा नक्को करू रे.

तुझं लिखाण वाचून श्री. ना. पेंडशांच्या "लव्हाळी"ची आठवण होते. अगदी साधंस्स लिखाण. पण तरी त्यात गुंतवून ठेवणारं काहीतरी आहे. आता ते काय आहे ते मला नेमकं सांगता आलं तर मीच आधी तसं लिहायला बसीन!! तू तुझ्या ब्लॉगचा उल्लेख केलास दोन लेखांमागे. पण नाही पाहिलाय तो अजून. हे असं कधीतरी येणारं, "च्यायला आज पुढचा भाग टाकेल वाटलं होतं. कुठे उलथलाय देव जाणे" म्हणायला लावणारं टाईमटेबल ठीकाय.

बाय द वे, अजूने कधी 'सवारी' नाकारली नाहीयेस? तुला पैसे कमवायचे नाहीयेत कबूल आहे. पण "दोन तास घनचक्कर ट्रॅफिक मधे जातील", "हे भाडं घेतलं तर घरी पोचायला खूप उशीर होईल" असं कधी नाही झालं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

आभार मि. पा.
पुरषांची - आय मीन माणसांचीच सेक्शुॲलीटी म्हणजे गहन जंगल आहे हेच खरं...
एकीकडे आपल्या माणसांचा विश्वास, नैतिकता आणि दुसरीकडे करकरीत खर्या उर्मी ह्याचा तोल साधणं, साधावा लागणं हे एकाचवेळी गर्द शोकांत, अतिशय इंटरेस्टींग आणि प्रचंड गमतीदार आहे.

बाकी सवारी नाकारायची नाही हा नियम बर्याच कारणांनी बरेचदा मोडावा लागला... हे कबूल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यार तूम आदमी दोस्ती के काबिल हो. आजसे अपनी दोस्ती पक्की. मेरी तरफसे. तुम्हारी हां का यिंतजार हैं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

जरूर गो ब्रा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।