Skip to main content

वाकड्या अंगणात नाचली जाई पण तिला कुणी पाहिलं नाई....

लहानपणी "मला एक उत्तम नर्तिका बनाचेय" पासून, प्रौढपणी "आता स्वतःचे अंग सांडत आणि लवंडत फक्त नाचायचंय" या माझ्या छोट्याश्या नाच-प्रवासाचा आढावा.

स्पर्धा का इतर?

आम्ही साऱ्या चंद्रसख्या

अनुराधाकडे आज संध्याकाळी, सगळ्याजणी जमणार होत्या. अनुची गडबड सकाळपासूनच सुरु झाली. स्वत:च्या रेशमी केसांना शिकेकाई लावून मस्त आंघोळ करुन, आख्खा दिवस घर आवरण्यात गेल्यानंतर साधारण उत्तरदुपारी, सुंदरसा प्रसन्न पेहराव तिने केला. आणि सख्यांची वाट पहात ती सौधावर जरा वारा खात ऊभी राहीली न राहीली तोच तिला अश्विनी लगबगीने येताना दिसली. काय डौल होता तिच्या चालण्यातही. नखशिखान्त चैतन्य शक्तीने ओतप्रोत अशी, उत्साही अश्विनी नेहमीच सर्वांच्या आधी येत असे. उमदं सौंदर्य ल्यालेल्या तिने , अनुला खालूनच हात करुन अभिवादन केले व झपाझप, पायऱ्या चढत ती येती झाली. "ये गं आशु. बरं झालं वेळेवर आलीस.

सुटकेचा मार्ग

सुटकेचा मार्ग

सजीव देहात अडकलेल्या मनाला
सुटकेचा मार्ग काही सापडत नाही
न कळणाऱ्या या भावनांचा अर्थ
अजूनही मनाला उमजत नाही..

चेहऱ्यावरच्या हस्यामागचे
आश्रु कोणास दिसत नाहीत
सजीव असूनही या मनाला
चैतन्याची पालवी कधी फुटत नाही

नात्यांच्या गर्दीतला हा एकटेपणा
का कोणास दिसत नाही
आयुष्याच्या या वाटेवरती
कोणी सोबती का मिळत नाही

अखेरच्या क्षणाची ती प्रतीक्षा
आज काही केल्या संपत नाही
सजीव देहात अडकलेल्या मनाला
सुटकेचा मार्ग काही केल्या सापडत नाही....

मटा – तुम्हीसुद्धा?

Taxonomy upgrade extras

अॅड. गिरीश राऊत यांचा एक लेख 'महाराष्ट्र टाइम्स' रविवार जानेवारी २३, २०२२ रोजी प्रकाशित झाला. डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे) यांनी त्याचा केलेला प्रतिवाद.

पांढरं फरवालं स्वेटर

पांढरं फरवालं स्वेटर
-------------------------
खूप थंडी होती . खूपच . नकोशी , बोचरी , गारठवणारी , हाडं फोडणारी थंडी !
रात्रीचे दहाच वाजले होते . एवढ्या लवकर रस्त्यावरची गर्दी थंडीने जुलमाने हाकलून लावली होती . रस्त्यावर तुरळक गाड्या अन माणसं .
नदीकाठच्या रस्त्यावर काही झोपड्या . त्यांना झोपड्या तरी कसं म्हणायचं ? नावापुरताच आडोसा . त्यात माणसं ... माणसंच की ती - परिस्थितीने फटकारलेली .
तान्ह्या पोरापासून वाकलेल्या म्हाताऱ्यापर्यंत .

ललित लेखनाचा प्रकार

rtPCRच्या मेसेजमुळे तुम्हीही फसलात का?

Taxonomy upgrade extras

rtPCRच्या मेसेजमुळे तुम्हीही फसलात का?

डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे)

RTPCR तपासणी फ्लू आणि कोविड यातील भेद ओळखू शकत नाही म्हणून CDCने ही तपासणी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे आणि आपल्या सर्वांची भली मोठी फसवणूक होत आहे आणि आपल्याला गुलाम बनवत आहेत अश्या अर्थाचा मेसेज WA ने तुमच्यापर्यंत पोचवला असेलच ना?

अमेरिकेतली स्कूल शूटिंग्ज: जबाबदारी (कुणा)कुणाची?

पूर्वप्रसिद्धी ‘लोकमत’ १९ जानेवारी २०२२

अमेरिकेतली स्कूल शूटिंग्ज: जबाबदारी (कुणा)कुणाची?

जेव्हा अदम्य ऐसी

जेव्हा अदम्य ऐसी
निद्रा कवेत घेते
आकाशभाषितांना
ध्वनिचित्ररूप येते

अंधार भिनत जाता
भवताल स्तब्ध होते
संवेदनांस अवघ्या
व्यापून शून्य उरते

दिग्बंध सैल होती
तर्कास काम नुरते
कालौघ थांबतो अन्
आभास सत्य होते

अज्ञातशा स्वरांचा
अनुनाद ऐकू येतो
एकेक जाणिवेचा
अस्पष्ट बिंदू होतो

निद्रा अशी कृृृृपाळू
अंकी तिच्या मी क्लांत
मी शून्य एरवी, पण
निद्रेत मी अनंत

अफवा आवडे सर्वांना!

जगभरात ठिकठकाणी हैदोस घालत असलेल्या कोरोना विषाणूमुळे भीतीचे व अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून जगातील एकूण एक सर्व राष्ट्रे भांबावून गेलेले असताना या भीतीची तीव्रता वाढविण्यात समाजमाध्यमावरून पसरत असलेल्या अफवांना कसे अटकाव करावे हा मोठा प्रश्न सर्व संबंधितांच्या समोर उभा आहे. कोरोना संसर्गाला आटोक्यात आणून ठप्प झालेल्या जागतिक स्तरावरील सर्व व्यवहारांना पूर्वस्थितीवर आणण्यासाठी सर्व पातळीवरून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

॥उजेड पाडला तुळशीपाशी॥

तुळशीबागेतल्या ब्रा तशा रिकाम्याच असतात. म्हणजे ॲलर्जीसारख्या, नुस्तीच लक्षणं खरा रोग नाहीच.

समीक्षेचा विषय निवडा