Skip to main content

अरुण जाखडे : आदरांजली

अरुण जाखडे यांचं जाणं धक्कादायक, दुःखद आहे. पद्मगंधा प्रकाशनाची अनेक पुस्तकं संदर्भसाहित्य म्हणून खूप मोलाची आहेत. कॉलेजात असताना समीक्षा, भाषाविज्ञानासाठी अभ्यासाचा भाग म्हणून जेवढी पुस्तकं वाचली, त्यातली बहुतांश सगळी पद्मगंधाची होती. रा.भा.पाटणकर, म.द. हातकणंगलेकर, रा.ग. जाधव, द. भि. कुलकर्णी, द. दि. पुंडे, गंगाधर गाडगीळ, हरिश्चंद्र थोरात, श्री. व्यं. केतकर अशा अनेकांची पुस्तकं तेव्हा, वाचली, पाहिली, चाळली, हाताळली ती पद्मगंधाचीच. याशिवाय लोकसाहित्यावरची केवळ रा.चिं.ढेरे यांचीच नाही तर इतर भटक्या जमातींच्या जीवनावर त्यांनी प्रकाशित केलेली संशोधनभर पुस्तकं फार महत्वाची आहेत.

बातमीचा प्रकार निवडा

स्वगत

''दांडेकरांच्या राज्यात होळकरांची फौज आल्यावर कस काय व्हायचं?`` असा प्रश्न एकानं थोडं चिंतातूर होउन विचारल्यावर त्याला दुसरा म्हणाला, ''अरे त्यात काय? इथंच सोय झाल्यावर बाहेर धुंडत बसायला नको. साली पन साहेब लोकांची मज्जा !`` 'हित कशाला चांगल्या घरातल्या पोरीबाळी येताहेत. अहो इथं तसल्याच बाया येणारं. एकीकडं हे बी चालू दुसरीकडे नोकरी बी चालू` पोलीस खात्यात महिला पोलीस भरती मोठया प्रमाणात भरती जेव्हा होणार होत्या त्यावेळी उमटणारी ही स्पंदन.

ललित लेखनाचा प्रकार

नि:शब्द

नव्या अंतरिक्षी पुन्हा प्राणपक्षी
जसा झेप घेण्यास सरसावतो-

-खगोलातल्या अद्भुताच्या स्वरांनी
चिदाकाश व्यापून झंकारतो

-स्थलाच्या त्रिमितीत कालाक्ष थोडा
उगा विरघळावा तसा भासतो

-जिथे चुंबिते पाणरेषेस व्योम
तिथे कोणी नि:शब्द हाकारतो

मला पाहताना - भाग २

(याच लेखाचा पहिला भाग या लिंकवर वाचता येईल. )

जी आणि जशी मी आत्ता आहे, त्यातला महत्वाचा भाग होता/ आहे - सेल्फ लव्ह! स्वतःचा स्वीकार आणि स्वतःसोबत खूप कम्फर्टेबल असणं. हे किती महत्वाचं आहे, याची अजिबातच जाणीव मला नव्हती. स्वतःबद्दल सतत असमाधान असायचं. विविध प्रकारच्या अभावग्रस्ततेने ग्रासलेली माणसं आतून कुरतडलेली, पोखरलेली नि असमाधानी असू शकतात. पण म्हणून किती? तुमची भौतिक परिस्थिती, सामाजिक स्थिती, वर्ग बदलत असेल तर तेव्हा तरी हे निवळत जायला पाहिजे.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

कोविड आणि फ्लूची तुलना खरंच योग्य आहे का?

Taxonomy upgrade extras

कोविड आणि फ्लूची तुलना खरंच योग्य आहे का? सांगताहेत डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे)

मांजा (पूर्वप्रसिद्धी: हंस दिवाळी २०१७)

संक्रांतीपूर्वी एक आठवडा:
कॉलनीतल्या गच्चीवर पोरांचा गलका चालला होता.
'नारळ', 'तपेली' आणि मन्या सिनियर पतंगबाज.
नारळ काय काटाकाटीतला नव्हता. तो आपला सुम्ममध्ये पतंग बदवून मजा बघत बसायचा... कोणाच्या अध्यात ना मध्यात.
तपेलीचा पतंग नुकताच 'कायपो छे' झालेला आणि क्लासची वेळ झाल्यामुळे तो कल्टी मारायच्या तयारीत होता.
मन्या मात्र फुल्ल फॉर्ममध्ये होता. तसा तो नेहमीच असायचा.
लागोपाठ चार पतंगी कापल्या होत्या त्यानं.
चार तोळे कडक खरवाल्या बदामी मांजाची पूर्ण फिरकी बदवून आकाशात इवलूसा ठिपका दिसत होता त्याचा पतंग.

ललित लेखनाचा प्रकार

"हर्ड इम्युनिटी"ने सुरक्षा मिळेल का?

Taxonomy upgrade extras

हर्ड इम्युनिटी समजावून सांगत आहेत डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे).

रेषेच्या पलीकडचे बाळ ठाकूर

मुखपृष्ठाचा संदर्भ आणि आतली इलस्ट्रेशन्स या वेगवेगळ्या गोष्टी असतात. कुणीतरी सांगितलं आहे की, मुखपृष्ठ हे पोस्टरसारखं असतं. अंगुलीनिर्देश करण्यासारखं असतं. सगळा भाव त्याच्यात आणावा लागतो. मात्र इलस्ट्रेशन ही स्टोरीतल्या वेगवेगळ्या कॅरेक्टरशी निगडित असतात. त्यांचा अ‍ॅप्रोच वेगळा असतो. - बाळ ठाकूर

कोविडची लस संसर्ग टाळेल याची खात्री का दिली जात नाही?

Taxonomy upgrade extras

लस घेतली तरी काही प्रमाणामध्ये संसर्गाचा धोका रहातो. त्यामुळे लस घेतली तरीदेखील मास्क लावा आणि नियम पाळा असे सांगितले आहे. लस घेऊन सुरक्षा वाढवायची आणि नियम पाळून संसर्ग टाळायचा हे साधे सोपे गणित आहे. मग कोविडच्या लसीमुळे संसर्ग होणारच नाही खात्री द्या असे म्हणणेच चुकीचे नाही का?

झॅनॅक्स, क्लायमेट चेंज आणि डोन्ट लुक अप.

तुम्ही एकाच वेळी ब्राउझरच्या चार टॅब्ज खोलुन एकात वॉशिंग्टन पोस्ट, दुसर्‍यात एनवाय टाईम्स, तिसर्‍यात द गार्डीयन आणि चौथ्यात द व्हाईस/हफिंग्टन पोस्ट/स्क्रोल/ओपीइंडीया/लोकसत्ता/सनातन प्रभात/संध्यानंद वाचत असाल तर तुम्ही 'डोन्ट लुक अप' हा सिनेमा पाहिला असल्याची शक्यता ६० ट्क्क्यांहुन अधिक आहे. तुम्ही अद्याप हा सिनेमा पाहिलेला नसला तर तो सिनेमा पहाण्याची शक्यताही तशी मोठीच आहे.

समीक्षेचा विषय निवडा