B.1.1.529
मश्गूल मानवा
थेट डिवचून
हताश करून
पुरे मास्कवून
ज्ञानविज्ञानाला
कुंठित करून
जुन्या गृहितांना
निष्प्रभ करून
चाकोर्या ,आडाखे
मोडून तोडून
कल्पने पल्याड
पायंडे पाडून
वाटले गेला तो
कायम निघून...
गनिमी काव्याने
माघार घेऊन
कोण हे बोलते?
अस्पष्ट, दुरून,
"पुन्हा मी येईन"
"पुन्हा मी येईन"
- Read more about B.1.1.529
- 4 comments
- Log in or register to post comments
- 3330 views
दोन कविता
अस्मितावाद्यांनी ठोकून काढलं
एकदा मी मराठ्यांवर
विद्रोही कविता केली
महाराष्ट्रातल्या अस्मितावाद्यांनी
मला ठोकून काढलं
मग मी गुजरात्यांवर
विद्रोही कविता केली
गुजराती अस्मितावाद्यांनी
मला ठोकून काढलं
नंतर मी सरदारांवर
विद्रोही कविता केली
पंजाबी, हरियाणातील अस्मितावाद्यांनी
मला ठोकून काढलं
मग मी चिडून हिंदी भाषिकांवर
विद्रोही कविता केली
उत्तरेतल्या अस्मितावाद्यांनी
मला ठोकून काढलं
थोडसं सावरून तमिळींवर
विद्रोही कविता केली
तमिळनाडूतल्या अस्मितावाद्यांनी
मला ठोकून काढलं
- Read more about दोन कविता
- 13 comments
- Log in or register to post comments
- 5004 views
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २०: २४ ऑक्टोबर २०२१
आज सकाळी माझा टाइम्स ऑफ इंडियातर्फे टॅक्सीनामा प्रोजेक्टविषयी इंटरव्ह्यू झाला.
बऱ्याच जणांनी ती लिंक पाहिली आणि प्रेमाने पाठ थोपली, शिवाय आणखी लोकांत आवर्जून पसरवली हे मस्तच.
सगळ्यांचे आभार.
इंटरव्ह्यूमध्ये तसा बराच वेळ गेला.
मग थोडी फार भाडी मारून गाडी उभी करताना हे आमचे मलबार हिलच्या नाक्यावरचे नेहमीचे ड्रायव्हर रमण झा भेटले.
ह्यांच्याशी आज थोड्या गप्पा छाटल्या.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २०: २४ ऑक्टोबर २०२१
- 3 comments
- Log in or register to post comments
- 3812 views
वात्रटिका : पीएची नौकरी
हलक्याने घ्या. दरबारी नौकरी पाहिजे तेवढी सौपी नसते. एका निष्ठावंत पीएला काय काय करावे लागते त्याची एक छोटीसी झलक
साहेबांच्या आदेश म्हणजे
काळया दगडावरची रेख.
साहेबांना जे जमत नाही
पीएला ते जमवावे लागते.
पीएच्या शब्दकोशात
असंभव हा शब्दच नसतो.
वीज पाण्याची बिले असो
वा! घरचा सगरा किराणा.
साहेबांच्या कुत्र्याचा
रोजचा मोर्निंग वाक.
पीएच्या सरकारी
नोकरीचाच भाग.
साहेबांच्या म्हातारीने
मागितले रक्ताचे दान.
पीएने स्वखुशीने केले अर्पित
माऊलीच्या चरणी अपुले रक्त.
- Read more about वात्रटिका : पीएची नौकरी
- 7 comments
- Log in or register to post comments
- 4401 views
"Creative Pasts" : गए दिनोंका सुराग़
प्रा. प्राची देशपांडे लिखित "Creative Pasts" हा प्रबंधवजा ग्रंथ वाचून काही काळ उलटून गेला पण त्याबद्दल लिहायचे राहून गेले. राहून गेले म्हणा; त्याबद्दल लिहायला झेपेल असं वाटेना म्हणा. अलिकडे ते पुन्हा हाताशी लागलं. म्हण्टलं जमेल तशी ओळख करून द्यावी. म्हणून हे टिपण. संशोधनाच्या शिस्तीच्या अभावातून ते जन्माला आलेलं आहे त्यामुळे "आपणपण लिहायला काय जातं" असा त्याचा नूर आहे.

धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about "Creative Pasts" : गए दिनोंका सुराग़
- 8 comments
- Log in or register to post comments
- 7700 views
बीबरबाखचे अनुमान
गणितातील कुठल्या गोष्टीचा केव्हा उपयोग होईल याचा नेम नसतो. म्हणून गणितातील काहीही काम कालबाह्य वा त्याज्य मानणे योग्य नसते. बीबरबाखचे अनुमान प्रमेय कसे झाले त्याची गोष्ट सांगताहेत प्रा. बालमोहन लिमये.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about बीबरबाखचे अनुमान
- 11 comments
- Log in or register to post comments
- 8105 views
आनंददायक चॅनल
आज शिवप्रीत सिंग यांचा चॅनल (https://www.youtube.com/channel/UCKwaFldGnEyuPVzuL3oO3BA) लावुन सुंदर शबद बाणी ऐकत बसले होते. कानांना 'हेड फोन' लावले होते. शिवप्रीत यांचा आवाज म्हणजे मूर्तिमंत माधुर्य आहे आणि त्यांच्या चाली म्हणजे असीम शांती. अक्षरक्षः आनंदडोहात डुंबत होते. आसपासचं भान तर अशा वेळी रहातच नाही. संगीतासारखा उच्च आनंद नाही. नवरा पहात होता व म्हणाला - इतकी मान डोलावते आहेस. तंद्री लागली आहे. या जगातच नाहीयेस. ठीक आहेस ना? कुठे हरवलीयेस?
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about आनंददायक चॅनल
- Log in or register to post comments
- 2228 views
बखर....कोरोनाची (भाग १०)
Taxonomy upgrade extras
आज आपण सर्व एका महत्त्वाच्या 'ट्रान्झिशन टाइम'मध्ये आहोत.
म्हणजे असं, की आत्ता जे घडत आहे ते आपल्या सगळ्यांकरता एका प्रकारचं 'once in a lifetime' घटना आहेत.
माझ्या वडिलांच्या पिढीने कदाचित दुसऱ्या महायुद्धाच्या परिणाम वाचले, बघितले आणि क्वचित भोगले असतील.
आजोबांच्या पिढीने कदाचित प्लेग बघितला असेल त्याचे परिणाम भोगले असतील.
पण अर्थातच हे सर्व जागतिकीकरणपूर्व काळातील आहे.
आणि त्यामुळे मर्यादित भागात परिणाम करणारं.
पण आज जे घडताना दिसतंय ते सर्वदूर आणि दूरगामी परिणाम करणारं आहे असं वाटतंय.
- Read more about बखर....कोरोनाची (भाग १०)
- 81 comments
- Log in or register to post comments
- 48346 views
जयंत पवार : माणूस । लेखक । मित्र - राजीव नाईक
जयंत पवार यांच्याविषयी सांगताहेत राजीव नाईक : हा लेख म्हणजे विश्लेषण नाही, संस्मरणच आहे. जवळचा माणूस चांगला लेखक असला की गोची होते. त्याच्या उंचीचा अंदाज नीट येत नाही. जयंता माझा खूप जवळचा मित्र होणार होता. त्याआधीच तो असा दूर गेला. पण इतकं मात्र म्हणेन की तो मला मित्र मानण्याइतपत जवळ आला, ह्यातही मी लकी आहे.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about जयंत पवार : माणूस । लेखक । मित्र - राजीव नाईक
- 5 comments
- Log in or register to post comments
- 8591 views
गणितज्ञांच्या इतिहासातील (काही) सोनेरी पाने...8
गणितामार्फत विश्वाचा शोध घेणारा रेने देकार्त
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about गणितज्ञांच्या इतिहासातील (काही) सोनेरी पाने...8
- Log in or register to post comments
- 2275 views