"जाड जाहले बूड "
जाड जाहले बूड
सांभाळा ते धूड
हृदयावरती सूड खास हा
हृदयावरती सूड !
बस ती चुकली
गाडी हुकली
शयनगृहातिल प्रणयाराधनी
जाईल सारा मूड ,
सांभाळा ते धूड!
रक्तवाहिन्या अती सूक्ष्म त्या
पौंडामागे दोन मैल त्या
सोपे नाही रक्त ढकलणे,
(संपावरती जाईल ना ते !)
घेईल तेही सूड !
सांभाळा ते धूड, मित्रहो
सांभाळा ते धूड!
xxx
- Read more about "जाड जाहले बूड "
- 3 comments
- Log in or register to post comments
- 3136 views
"वेदन -विरहित"
वेदन-विरहित सोफ्यावरती
वेदन -विरहित बसणे
आणि स्वच्छ त्या फरशीवरती
वेदन -विरहित उठणे.
वेदन -विरहित त्या फ्रिजमध्ये
मटण -कोंबडी नसणे
वरण -भात तो खाता खाता
वेदन -विरहित हसणे .
प्रसिद्ध लेखक बनणे सुद्धा
क्षितिजावरती नसणे
वेदन-विरहित जुने सिनेमे
पहाता पहाता हसणे!
कसे करावे जीवन अपुले
वेदन-विरहित आता?
विचारात त्या पडलो आहे
चिवडा खाता खाता!
xxx
- Read more about "वेदन -विरहित"
- 3 comments
- Log in or register to post comments
- 2764 views
दुसऱ्या लाटेचा मागोवा ...
Taxonomy upgrade extras
किरण लिमये यांनी महाराष्ट्रातील दुसऱ्या लाटेचा घेतलेला पूर्णपणे विदाधारित (डेटा बेस्ड) मागोवा.
- Read more about दुसऱ्या लाटेचा मागोवा ...
- 2 comments
- Log in or register to post comments
- 3196 views
नीतीमत्ता - उपजत की संस्कारित?
एक स्वयंचलित ट्रॉली रेल्वेच्या रुळावरून वेगाने येत आहे. त्यामुळे रुळाच्या मध्यभागी खेळत असलेल्या पाच मुलांच्या जीवाला धोका आहे. अपघात होऊन पाची मुलं मरण्याची शक्यता आहे. आरडाओरडा करूनही उपयोग होणार नाही. धोका टाळण्यासाठी ट्रॉलीला दुसऱ्या रुळावर ढकलू शकणाऱ्या झडप यंत्रणेपाशी आपण उभे आहात. दुसऱ्या रूळाच्या मध्यभागीसुद्धा एक मुलगी एकटीच खेळत आहे. जर आपण ट्रॉलीसाठी रूळ बदलल्यास त्या मुलीचा जीव जाईल. रूळ न बदलल्यास मुलं मरतील.
- Read more about नीतीमत्ता - उपजत की संस्कारित?
- 7 comments
- Log in or register to post comments
- 6899 views
नातं निसर्गाशी - गंगेच यमुने चैव गोदावरि सरस्वति - भाग १
गंगेच यमुने चैव गोदावरि सरस्वति।
नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधि कुरू।।
पाण्याला जीवन असं म्हणतात आणि भारतीय संस्कृतीमध्ये वाहत्या पाण्याचं फार महत्त्व आहे. भारतातच कशाला जगाच्या अनेक सुरुवातीच्या संस्कृती या मोठ्या नद्यांच्या काठी वसल्याचे पुरावे आहेत. तर या आजच्या गप्पांच्या भागात आपण जल परिसंस्थांपैकी नदीच्या परिसंस्थेविषयी केतकीकडून जाणून घेणार आहोत.
- Read more about नातं निसर्गाशी - गंगेच यमुने चैव गोदावरि सरस्वति - भाग १
- 5 comments
- Log in or register to post comments
- 3545 views
फाफे फॅफि
"ट्टाॅक्!" अक्साच्या समुद्रकिनाऱ्यावरचा वाॅचटाॅवर बघून बनेश आपसूक उद्गारला.
"उचलली जीभ, लावली टाळ्याला!" प्रसादने त्याला चिडवण्याची संधी सोडली नाही.
"मी विचार करतोय; ऐतिहासिक गडकिल्ल्यांवर टेहळणी बुरूज असायचे, त्यांचीच ही अर्वाचीन आवृत्ती ना?" बनेश म्हणाला.
"किल्ल्याविना बुरूज!" प्रसादने उत्तर दिले. "आणि याचा हेतूही पूर्ण निराळा आहे. कोणी उगाचच समुद्रात पोहायला गेलं आणि गटांगळ्या खायला लागलं, तर या वाॅचटाॅवरवरच्या गार्डला दिसतं, आणि तो बुडणाऱ्याला वाचवायला धावत जाऊ शकतो."
"धावत? मला वाटलं की पोहत जावं लागेल." सुभाषने विनोद करायचा प्रयत्न केला.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about फाफे फॅफि
- 7 comments
- Log in or register to post comments
- 4938 views
नातं निसर्गाशी: अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा
गेल्या तीन भागांमध्ये आपण हळूहळू ग्लोबल इकॉलॉजी ते लोकल इकॉलॉजी असा प्रवास करत आहोत. पहिल्या दोन भागांत आपण एकूण पृथ्वीच्या इकॉलॉजीविषयी थोडक्यात बोललो. तिसऱ्या भागात आपण भारताचे भौगोलिक स्थान आणि इकोलॉजीच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा काही गुणवैशिष्ट्यांविषयी गप्पा मारल्या. आता या भागात आपण केतकीशी आपल्या महाराष्ट्राच्या इकॉलॉजीविषयी गप्पा मारणार आहोत.
- Read more about नातं निसर्गाशी: अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा
- 9 comments
- Log in or register to post comments
- 5446 views
तीन इच्छा
मी दहावी पास झाल्यावर माझ्या बाबांच्या माझ्याबद्दलच्या अपेक्षा फार वाढल्या. आपला मुलगा कमीत कमी इंजिनिअर होणारच होणार आणि लगेच पहिले विमान पकडून अमेरिकेला जाणार अशी दिवास्वप्ने त्यांना पडू लागली. ती स्वप्ने खरी झाली आहेत अश्या थाटांत कॉलर ताठ करून ते कॉलनीत फिरू लागले. तरी बरं मला फक्त एकोणसाठ टक्के गुण मिळाले होते. गणितात माझी अवस्था वादळांत सापडून वाताहात झालेल्या जहाजावरील खलाशासारखी होती. एखाद्या फळकुटाला पकडून, वादळ आणि लाटांनी अस्त व्यस्त मार खाऊन अर्धमेला झालेला खलाशी शेवटी देवाच्या दयेने किनाऱ्याला पोहोचतो तसा मी गणिताच्या पस्तीस गुणांच्या काठाला येऊन थडकलो होतो.
- Read more about तीन इच्छा
- 6 comments
- Log in or register to post comments
- 6844 views
शुभवर्तमान...? (भाग २)
Taxonomy upgrade extras
कोरोनाविरुद्ध अजिबात प्रतिकारशक्ती नसलेली लोकसंख्या महाराष्ट्र राज्यातील कुठल्या जिल्ह्यात जास्तीत जास्त किती टक्के असेल याचे एक अनुमान आणि त्याआधारे वर्तवलेले भविष्य...
- Read more about शुभवर्तमान...? (भाग २)
- 13 comments
- Log in or register to post comments
- 13986 views
नायजेरियन गुन्हेगाराचा शोध अथवा युरोपियन वसाहतवादाचे परिणाम
"ही बातमी वाचली का? कुख्यात नायजेरियन गुन्हेगार अनुआ चिचेबे फरार - शोध चालू - माहिती देणाऱ्यास दहा लाखाचे इनाम," मह्या एका दमात बोलला.
"काय स्मगलर वगैरे आहे काय भेंजो?" मी विचारलं.
"नाय रे. नायजेरियन लाॅटरी फ्राॅड करतो. पण जरा माहिती काढून मेल पाठवतो म्हणे, खरे वाटतील असे."
"म्हणजे, तुमचे काका इंजिनिअर फ्रेडरिक हळदणकर यांचा घानामध्ये मृत्यू झाला आणि तुम्हाला इस्टेट ठेवलीय असले नाहीत?" मी टाळीसाठी हात पुढे केला, पण मह्या गंभीरपणे कायतरी विचार करत होता. अशा वेळेला जरा थांबलं की मग तो विचारांची जुळवाजुळव करून बोलू लागतो.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about नायजेरियन गुन्हेगाराचा शोध अथवा युरोपियन वसाहतवादाचे परिणाम
- 3 comments
- Log in or register to post comments
- 3067 views