आपल्या विश्वाच्या शेवटाची सुरुवात कशी असेल?
मानवी अस्तित्वाच्या अंताबद्दल भाकीत करताना आपल्या विश्वाचा मृत्यूसुद्धा त्यास कारणीभूत ठरू शकेल असे म्हणावे लागते. हे विश्व कशाप्रकारे कोसळून जाईल याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मुळात यांची चाचणी कशी घ्यावी, त्यांची शहानिशा कशी करावी याबद्दलच अनेक शंकाकुशंका आहेत. उत्सुकता शमवण्यापोटीच हा मुद्दा उपस्थित केला जातो असेही वाटण्याची शक्यता आहे. हे विश्व पूर्णपणे गोठून जाईल (deep freeze), की कृष्णविवरात नाहीसे होईल की अस्टेरॉइड्सच्या माऱ्यामुळे तुकडे तुकडे होऊन ब्रह्मांडात सामावून जाईल की….आणखी काही तरी ?