सामाजिक

धर्म-अर्थ-पोर्न-मोक्ष: देशी आणि विदेशी

Taxonomy upgrade extras: 

भारतीय संस्कृतीतील 'धर्म-अर्थ-काम-मोक्ष' या संकल्पनेचा सहजगम्य, सुटसुटीत अर्थ "वैयक्तिक जीवनात आपल्या धर्माचे पालन करत (वा विशिष्ट गुणांची जोपासना करत), अर्थप्राप्ती करून घेत, हरघडी उत्पन्न होणार्‍या नानाविध कामनांची पूर्ती करत जीवन व्यतीत करावे आणि शेवटी या सर्वातून निर्माण होणार्‍या गुंत्यातून, व्यापातून, बंधनातून स्वत:ला मुक्त करत उर्वरित आयुष्य पाशरहित, निष्काम, तणावामुक्त असे घालवावे" असा लावता येइल.परंतु या चर्चेपुरते जरा वेगळ्या अंगाने याकडे बघूया:

मराठी लिखाण आणि लैंगिकता

Taxonomy upgrade extras: 

डिस्क्लेमर : या धाग्याच्या शीर्षकापासून आतल्या मजकूरामधे काही प्रक्षोभक लिहावे असा माझा हेतू नाही. साहित्य, साहित्याचे वाचन यातील एका (माझ्या मते अदुर्लक्षणीय , पण सभ्यतेपायी न बोलल्या जाणार्‍या) पैलूबद्दल मी लिहितो आहे अशी माझी भावना आहे. इतरांना यात वावगे तर वाटू नयेच , पंण यात कुणाला भर घालावीशीही वाटावी अशी माझी आशा आहे. इथे प्रश्न एकंदरीत "जेंडर बेस्ड इशूज ऍंड् सेक्शुआलिटी"चा आहे. मराठीत या दोन्ही संज्ञांना "लैंगिकता" असाच शब्द आहे. मात्र या दोन गोष्टी अर्थातच वेगवेगळ्या होत.

मराठी संकेत स्थळां चा "तेचतेच" पणा

Taxonomy upgrade extras: 

गेल्या आठवड्यात मी मराठीतील तीन संकेत स्थळांची सदस्यता घेतली. त्याचं मुख्य कारण म्हणजे मला हि मराठी / देवनागरी मधे ड्रूपल वापरुन एक "आग्रिगेटर ब्लॉग / संकेत स्थळ" तयार करावं अशी इच्छा आहे. ह्या स्थळां वर लिहिणार्या लोकांशी ओळखी करुन घेणे आणि त्यांच्या कडुन काहि सल्ला घेणं हा हि ह्या मागचा उद्देश !
मराठी संकेत स्थळां विषयी माझी निरीक्षणे : (ऐसी अक्ष्र्रे , मिसळपाव , मीमराठी )

१) तेच तेच लेख आणि त्याच लोकांचा ( आय डि / हॅन्डल्स) चा तिनही साइटस वर वावर !
२) जरी मेंबर्स बरेच असले तरी अ‍ॅक्टिवली भाग घेणारे / लिहिणारे हे मोजकेच आहेत
३) एकच लेख हे तिनहि साइटस वर टाकतात .. असे का ते कळत नाहि

जोडीदाराचे फेसबुक किंवा इमेल खाते चोरुन वाचणे कितपत योग्य आहे?

Taxonomy upgrade extras: 

ही बातमी वाचून प्रश्न डोक्यात आला- आपल्या जोडीदाराचे फेसबुक किंवा इमेल खाते चोरुन वाचणे कितपत योग्य आहे?

त्या मित्राने चीटींग (विश्वासघात किंवा व्यभिचार) केला हे योग्य की अयोग्य हा प्रश्न तूर्तास बाजूला ठेऊ. माझ्यामते ते अयोग्यच पण तूर्तास हा प्रश्न बाजूला ठेऊ.

पण खातं उघडं दिसलं म्हणून त्यात डोकावणे/मेसेजेस वाचणे कितपत योग्य आहे? त्याने केलेल्या गुन्ह्याइतकाच त्या मैत्रिणीचाही गुन्हा अक्षम्य नाही का? का आपला जोडीदार आहे म्हणून सगळे हक्क गृहीत धरायचे?

तुमचा बातम्यांचा प्रमुख सोर्स काय आहे?

Taxonomy upgrade extras: 

हा धागा "ही बातमी समजली का?" चाळता चाळता सहजच डोक्यात विचार आला म्हणून. तुम्ही रोजच्या बातम्या कुठुन मिळ्वता? सर्व बातम्यांसाठी एकच सोर्स वापरता का प्रत्येक प्रकारच्या बातमी साठी वेगळा वेगळा? एखाद्या सोर्स ला तुम्ही का प्राधान्य देता?

माझ्या पासून सुरुवात करतो:

१. news.ycombinator.com

नक्षली हिंसेच्या निमित्ताने...

Taxonomy upgrade extras: 

डाव्या-पुरोगामी विचारांना अभिप्रेत असलेली समानता, एकात्मता वगैरे मूल्ये ही जुन्या धर्मतत्त्वांनादेखील आदर्शस्वरुपात अभिप्रेत होती/ आहे हे दिसून येतं. एखादा कडवा धार्मिक अनुयायी देखील जगाची शांती हे धर्माचे उद्दिष्ट असल्याचे सांगून जाईल आणि पुरोगामी कार्यकर्तादेखील हेच पोटतिडकीने मांडत बसेल. पण मानवी पशुत्व किंवा आदिम लोभ-द्वेष-स्वार्थ-अहंता वगैरे भावना हे त्या आदर्श तत्त्वांहून अधिक नागडे, सनातन सत्य आहे. ते त्या-त्या आदर्श तत्त्वांना फाडून-फेकून पुन्हा पुन्हा प्रकट होत राहतं.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा...!!

Taxonomy upgrade extras: 

मराठी भाषा अभिजात व्हावी या संबंधीच्या मागणीविषयीची चर्चा इथे ऐकली/पाहिली.
त्यासंदर्भांने पडलेले काही प्रश्न:

१) अभिजात भाषा असल्याचा दर्जा प्रदान करण्याचा पायंडा कधीपासून /का पडला? केवळ 'भाषेचा विकास करायचा' हे उद्दिष्ट असेल तर असले मुद्दे (आधीच इतर राजकारण-विषयांचा गलबला असताना) पुढे आणण्याचे कारण काय?

खेळांतली अनिश्चिती

Taxonomy upgrade extras: 

हा विषय कित्येक दिवस डोक्यात असला तरी सध्या IPL T20 निर्वाणीच्या अवस्थेत असल्यामुळे त्याबद्दल लिहायचं ठरवलं. लिहीत असताना तो किती जगड्व्याळ आहे हे लक्षात यायला लागलं, पण तरीही सुचतील तसे काही मुद्दे मांडतो.

खेड्याकडे चला..

Taxonomy upgrade extras: 

खुप दिवसानी राजेश आपल्या ग़ांवी आला होता,ग़ांव सोडुन त्याने तब्बल पाच वर्ष झाले होते,आता तो शहरात राहुन तो शहरी झाला होता,आता ग़ावात त्याच्या भावाचे घर होते, तो त्याच्याच घरी आला होता.
भाऊ शेती करुन आपले पोट भरत होत.
त्याला दोन मुलं होती.घरी येताच घरची परस्थिती पाहुन खुप दु:खी झाला आणि आपला भाऊ रमेशला म्हणाल,' हे काय घर आजुन जसेच्या तसे,मला वाटले थोडीतर प्रग़ती झाली आसेल तुझी?'
'आता खेड्यात कसली प्रग़ती हुत्यायं,खायला मिळाले तर खुप झाले',रमेश म्हणाला,
'आसलं जग़ंन काही बरे नाही,'राजेश म्हणाला,
'मग़ काय करु म्हणतोस',रमेश वैताग़ुन म्हणाला,

धमाल वासलेकर....

Taxonomy upgrade extras: 

श्री संदिप वासलेकर हे नाव काही महिन्यांपूर्वी ऐकलं. त्यानंतर अमेरिक अर्थव्यस्थेबद्दलच्या धाग्यात , सौर ऊर्जेच्या उत्पादनातील आशावादाबद्द्ल वाचून ननि ह्यांना त्यांच्याबद्दल वाटणारा आदर कमी झाल्याचं दिसलं.
.
आताच इ-सकाळवर त्यांच्या नावानं पुढील मजकूर प्रकाशित झालाय.
(दुवा देत नाहीये; कारण लोकसत्ता काय किम्वा इ सकाळ काय ह्यांचे दुवे काही काळातच गंडल्यासारखे होतात. कालांतराने उघडतही नाहित.
त्यापेक्षा आख्खा लेखच पेस्टवतोय.(त्यांच्या नावासकट जशास तसा देत असल्यानं इथे प्रकाशित करायला हरकत नसावी असा माझा अंदाज आहे.))
.

पाने

Subscribe to RSS - सामाजिक