सामाजिक

मायभूमीला मदत करण्यासाठी आपल्या देशातच राहणे गरजेचे आहे का?

Taxonomy upgrade extras: 

आत्ताच मनोगतावर एक लेख वाचला. मटा मधील या बातमीचा संदर्भ असलेल्या या लेखात शेवटी एक वाक्य आहे की

मात्र , हे ज्ञान मिळवून तिला परत यायचे आहे ते मायभूमीत. आपल्या संशोधनाचा उपयोग इथे करण्यासाठी.

एक अप्रकाशित पत्र

Taxonomy upgrade extras: 

वृत्तपत्रांमधून जे काही छापून येतं, त्यावरील सोयीच्या असतील तितक्याच प्रतिक्रिया छापल्या जातात, हा एक अनुभव.
प्रतिक्रिया छापताना 'संपादकीय धोरण' नावाची गोष्ट आढळत नाही, हा दुसरा अनुभव. त्यामुळे अनेकदा चुकीची माहिती प्रसारित होते.
तर इंटरनेटमुळे अशा गोष्टी लोक ब्लॉगवर, फेसबुकवर लिहून टाकताहेत आणि त्यामुळे पुष्कळ गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचू शकताहेत, हे आनंदाचेच.
उल्का महाजन या कार्यकर्त्या मैत्रिणीने लोकसत्तातील एका अग्रलेखाबाबत मतभेद नोंदवणारे एक दीर्घ पत्र लिहिले आहे. त्याचा दुवा इथे देते आहे. इथे त्याची चर्चा झाली, तर मतेमतांतरे समजू शकतील, असे वाटले, म्हणून आवर्जून देत आहे.

भारत - सद्य स्थिती

Taxonomy upgrade extras: 

नमस्कार मित्रांनो . आपण रोज पेपरमध्ये वाचत असालच की आज या आपल्या देशात काय चालले आहे. सध्या अंतर्गत समस्याच एवढ्या आहेत की आपल्याला बाहेर लक्ष द्यायला वेळ नाही . पण अंतर्गत किती ही असल्या तरी बाहेरच्या समस्यांना दुर्लक्षुन चालणार नाही. पाकिस्तान व चीन हे भारताच्या इतर देशांना श्रीलंका,बांग्लादेश ( नेपाळला सुद्धा )बरोबर घेऊन खिळखिळा करण्याचा प्रयत्न करत आहे . घुसखोरी ,दहशतवाद,बनावट चलन छापुन ते अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याच्या प्रयत्नात आहेत. आणि आपण रोज पाहतो त्याप्रमाणे राजकिय पक्ष फक्त इतरांना पाण्यात पाहण्यातच आपली शक्ती खर्च करत आहेत.

कशाकशाचा बाजार असावा/नसावा?

Taxonomy upgrade extras: 

गेल्या दोनतीन चर्चांच्या निमित्ताने हा प्रश्न सध्या ऐसीवर ऐरणीवर आला असला तरी तो कायमच सर्वच मानवजातीला पडलेला प्रश्न आहे. काय खरेदी करावं? काय विकावं? काय विकणं योग्य नाही? काय खरेदी करणं योग्य नाही? हा नुसता बाजार, खरेदीविक्रीचा प्रश्न नाही. कारण खरेदी विक्री व्यापार सर्वसाधारण जनव्यापाराचा एक उपसंच आहे. समाजात वावरताना एकमेकांशी काय प्रकारचं आदानप्रदान व्हावं, हा नीतीमत्तेचा आणि कायद्याचा प्रश्न आहे.

ये तो होना ही था!

Taxonomy upgrade extras: 

वसईसारख्या लहान शहरात रेल्वे स्टेशनजवळ मी पहिला डान्सबार पाहिला. नाचणार्‍या मुली, भोजपुरी अश्लील गाणी, अंधुक उजेड आणि सर्व टेबलं खच्चून भरलेली.
तेव्हा दुकानात ७० रु. ना मिळणारी बिअर इथं ३०० रु. ला मिळत होती. जसजसं मुंबईच्या दिशेचे बार पाहत गेले ही रक्कम ६००० पर्यंत गेली. कारण इतकंच की समोर मुली नाचताहेत.

उत्तराखंड आपत्ती आणि तुम्ही-आम्ही

Taxonomy upgrade extras: 

उत्तराखंड राज्यातील सद्य भयावह परिस्थितीवर नक्की काय लिहायचे कसे लिहायचे हा मोठा प्रश्न मला पडला होता. या वर लिहायला घेतले खरे पण या लेखनाचा नक्की साचा कसा असावा हे ठरवू न शकल्याने मुक्त स्वगत लिहीत आहे. यात अनेक मुद्द्यांना स्पर्श केला आहे मात्र त्यात सुसूत्रता असेलच असे नाही.

=========

उत्तराखंड प्रलय...

Taxonomy upgrade extras: 

देव खरंच दयाळू आहे. आपला तर विश्वासच बसला बुवा ! महाराष्ट्रात काळुबाईने अशीच दया दाखवली होती चार पाच वर्षामागे. लहान लहान लेकरं सुध्दा उचलून घेतली. मागे कुंभमेळ्यात पण असाच दयेचा धुरळा उडवला होता. उत्तराखंडच्या देव लोकांनीच का म्हागं रहावं ? लोक भेटायला गेले की हे देव भाडे खुष होतात आणि म्हणतात ही भेट काय खरी नाही गड्याहो. थेटंच भेटाय या ! चला या पटापट वरती. खरंच दयाळू है भाड्या...

"वटपौर्णीमा

Taxonomy upgrade extras: 

मी 'लीव इन रिलेशनशिप " मधे रहाणारी एक तरुणी आहे माझी हि पहिलिच "वटपौर्णीमा "आहे

मी हे व्रत कसे साजरे करु>?? सभासद मार्ग दर्शन करतिल का मला??

अशा लेखांतून काय साध्य करायचे आहे?

Taxonomy upgrade extras: 

मी ऐसी अक्षरेचा गेल्या वर्षीपासून सदस्य आहे. वाचनाची आवड आहे म्हणून सदस्य झालो. वेळ मिळेल तसा वाचत असतो. अलीकडे सतीश वाघमारे यांचे पुरोगामी महाराष्ट्र आणि जयंती हे दोन लेख वाचनात आले. लेखकाची शैली उत्तम आहे. लेख ललित या श्रेणीत आहेत. याचाच अर्थ ते काल्पनिक असावेत. पण लेखा खालील प्रतिक्रियांतून लेख सत्य घटनेवर आधारित आहेत, असा आभास निर्माण होतो. दोन्ही लेखांचा रोख पाहता, हे लेख निर्भेळ आहेत, असे म्हणवत नाही.

पांडुरंग सांगवीकर सम लैंगिक आहे का?

Taxonomy upgrade extras: 

कलाकृति मधलि एखादि व्यक्तिरेखा आपली चौकट मोडुन वाचक अथवा प्रेक्षक यांच्या मनोव्यापाराचा हिस्सा बनते तेंव्हा ती कलाकृती यशस्वी होते असे म्हणायला हरकत नाही. शेरलॉक होम्स च बेकर स्ट्रीट वरील घर बघायला अनेक पर्यटक जायचे. मध्यंतरी हॅरी पॉटर या अती लोकप्रिय मालिकेमधले Dumbeldore हे पात्र कसे 'गे' आहे हे अहमहीकेने सांगणार्‍या लेखांचा वरवा पाडण्यात आला होता. उल्लेखनीय बाब अशी की दस्तुर्खुद लेखिका जे.के. रोलिंग बाई नि पण या थियरी ला दुजोरा देऊन एकच खळबळ उडवून दिली. या कपोकल्पित पात्राना मानवी गुणधर्म चिकटवने हा वाचकांचा / प्रेक्षकांचा अट्टहास असतो.

पाने

Subscribe to RSS - सामाजिक