समाज

अहो, आमचंही जगणं मान्य करा...!

Taxonomy upgrade extras: 

"शेतकऱ्यांचा लाल रंगाच्या झेंड्याचा मोर्चा, लाल रक्ताचा मोर्चा व्हायला नको....!"
सावधान वणवा पेट घेत आहे...!

गोऱ्या रंगाच्या कातडीचं ब्रिटिश सरकार घालवण्यासाठी आम्ही लय हाल सोसलं. त्यांनी विशिष्ट पिकांची शेती त्यांनी सांगेल त्या भावात करायच्या सक्तीनं आमची माती केली होती. म्हणून आम्ही जीव तोडून लढलो आणि स्वातंत्र्य मिळवलं. अपेक्षा होती नवं आमच्या लोकांचं म्हणजे सावळ्या कातडीच्या लोकांचं सरकार आमच्या भल्याचा विचार करेल पण कपाळमोक्ष झालाच... कातडी बदलली,कातडीचा रंग बदलला पण परिस्थिती तशीच राहिली...

कापडाचोपडाच्या गोष्टी

बरेच दिवसांपासून वेशभूषेचा इतिहास या विषयाला धरून काहीतरी लिहायचं मनात होतं.
वेशभूषेचा इतिहास शिकताना समाज, राजकारण, अर्थशास्त्र, विज्ञान अश्या सर्व गोष्टींच्या इतिहासाला समजून घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. थोडक्यात आपले कपडे हे आपल्या जगाची कहाणी सांगतात असं म्हणता येईल. हे सगळं कसं एकमेकांशी जोडलेलं असतं ते मला फार गमतीशीर आणि महत्वाचं वाटतं.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

आगामी कार्यक्रम / उत्स्फूर्त कट्टे - कोणकोण येतंय? - ५

दरवेळी ऐसीवरची मित्रमंडळी भेटतात तेव्हा तो जाहीर केलेला कट्टा असतोच असं नाही. कारण बऱ्याच वेळा कट्टा भरवणं, एकत्र भेटणं वगैरे ठरवायला चिकार वेळ लागतो. आणि दरवेळी पंधरा वीस लोक जमवणं शक्यही नसतं. कधीकधी चार टाळकी एकत्र जमली तरी मैफल जमू शकते. असे उत्स्फूर्त, इंप्रॉम्प्च्यू कट्टे अधिक वारंवार व्हावेत यासाठी हा धागा.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

मूल दत्तक घेणे हा मूर्खपणा आहे का?

सुरुवातीलाच हे स्पष्ट करतो की हा प्रश्नच मूर्खपणाचा आहे. पण तो मला पडलेला नाही. वसुधाने(बायको) मानसिक समुपदेशक म्हणून काम करायला सुरुवात केल्यापासून एक एक वल्ली येऊन भेटतात त्यातल्याच एकाने विचारलेला हा प्रश्न! आता बायकोकडे येणाऱ्या रुग्णांबद्दल लिहिणे नैतिकतेला धरून नसल्याने त्याबद्दल जास्त लिहित नाही पण या प्रश्नाने विचार चक्र सुरु झाले.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

प्रार्थनेने आजार बरे होऊ शकतात का?

अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील गर्भधारणेवर संशोधन करणाऱ्या तज्ञांनी वैज्ञानिकांना बुचकळ्यात टाकणारा एक शोधनिबंध 2001 साली प्रसिद्ध केला होता. त्यांच्या निष्कर्षानुसार ख्रिश्चन बांधवाने केलेल्या प्रार्थनेमुळे सुखद बाळंतीण होण्याचे प्रमाण प्रार्थना न केलेल्या बाळंतिणींच्या दुप्पट आहे. प्रार्थनेचा अशा प्रकारच्या उपयोगाबद्दलचा हा निष्कर्ष ख्रिश्चन धार्मिकांना सुखावणारा होता आणि इतर धार्मिकसुद्धा आपापल्या धर्मातील प्रार्थनेविषयक गोष्टींना पुनरुज्जीवित करण्यास प्रेत्साहन देणारा होता.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

सरन्यायाधीशांच्या विरोधात चार वरिष्ठ न्यायाधीशांचे बंड

सरन्यायाधीश दीपक मिश्रा ह्यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाच्या चार अन्य न्यायाधीशांनी निवेदन दाखल केले आहे असे आत्ताच वाचले. त्यामुळे सरन्यायाधीश दीपक मिश्रा ह्यांची परत आठवण झाली.

सिनेमागृहांमध्ये राष्ट्रगीत सक्तीने वाजविण्याचा निर्णय ह्याच दीपक मिश्रा ह्यांनी दिला होता. त्याचे परीक्षण करणारा एक धागा मी येथे सुरू केला होता. त्या धाग्याची येथे आत्ता प्रकर्षाने आठवण झाली.

न्यायमूर्ति मिश्रा हे पुरेशी Legal propriety दाखवत आहेत काय असा माझा तेव्हा प्रश्न होता. तो प्रश्न अगदीच गैरलागू नव्हता असे आता मला म्हणता येईल.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

आनंदवन प्रयोगवन - पुस्तकातला काही मजकूर

'आनंदवन, प्रयोगवन' या पुस्तकातला काही मजकूर, सचिन कुंडलकरचे लेख (लेख क्र १, लेख क्र २) आवर्जून वाचणाऱ्या किंवा न वाचणाऱ्या, लेखांवर खरडफळ्यावर चर्चा करणाऱ्या आणि न करणाऱ्या सर्वांना सप्रेम.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

नो रिग्रेट्स

काही काही गाणी प्रचंड नशीबवान असतात.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

हे सारे कसे बदलेल??

अंधश्रद्धा नावाचे अविवेकी वादळ आचारविचाराचे जणू एक वादळ आज समाजात घोंघावतच आहे. जादूटोणा ,देवदेवस्की ,भूत ,भानामती अशी उघड स्वरूपातील अंधश्रद्धा देखील विज्ञान वा शिक्षणाच्या प्रभावाने कमी होताना दिसत नाही .महाराज ,साधू,बाबा,स्वामी ह्यांचा धंदा तर भलताच तेजीत चालताना दिसतो आहे .आपल्या भक्ताचे भौतिक समृद्धि ,पारलौकिक कल्याण ,आध्यात्मिक उन्नती ह्यात भर दिवसेंदिवस पडतोच आहे . नागरी सुविधेवर ह्याचा प्रचंड ताण पडतो श्रद्धेचा भाग समजून सर्वसाधारण लोक ही बुवाबाबाला भक्तीचे एकमेव द्वार त्याच्या चरणावर असते असे समजून त्यांना शरण जातात .

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

आयडेंटिटीच्या बंधनात...

जन्माला आलेल्या प्रत्येकाला (आवडणारे वा न आवडणारे) नाव/आडनाव असते; व त्या नावाने आपली ओळख करून दिली जात असते. परंतु काही महात्वाकांक्षी व्यक्तींना फक्त नाव/आडनाव यात समाधान मिळत नाही. म्हणून आपल्या नावापुढे/आडनावापुढे काही तरी हवे म्हणून ते आटापिटा करत असतात. उच्च शिक्षितांना तर नावाच्या पुढे लावण्यासाठी इंग्रजीतील सव्वीसपैकी सव्वीस मुळाक्षरही कमी पडतात. काहींना आपल्या घराण्याचा अभिमान असतो म्हणून त्याला अधोरेखित करतात. काहींना आपल्या धर्माबद्दलचा वा (जातीबद्दलचा) अभिमान झाकता येत नाही म्हणून काही चित्रविचित्र पद्धत वापरून आपली आयडेंटिटी व्यक्त करत असतात.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

पाने

Subscribe to RSS - समाज