सामाजिक

आपण स्वत:ला फसवणे टाळू शकतो का?

आत्मवंचना ही एक सर्व सामान्य, (सर्वमान्य?) व पटदिशी कळणारी गोष्ट आहे याबद्दल कुणाच्याही मनात शंका नसावी. परंतु तुम्ही स्वत:लाच कसे काय फसवू शकता असे विचारल्यास इतरांना फसविण्यापेक्षा ही गोष्ट फार सोपी आहे हे लक्षात येईल.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

फसवा फसवी

आपल्यासारख्यांचा जीवनाचा प्रवास हा नेहमीच भरपूर खाच – खळगे - खड्डे असलेल्या रस्त्यावरून होत असतो. त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट म्हणजे त्यातील प्रत्येक टप्प्याला शेवट असतो व आपण हुश्श्श.... म्हणून तो संपवतो. टप्पा पार केल्याचा (क्षणिक) आनंद घेत असतो. त्यामुळे त्या टप्प्यापुरता केलेल्या प्रवासाचे ओझे वाटत नाही. आपले शिक्षण, आपल्याला मिळालेली नोकरी वा पत्करलेला व्यवसाय, घर-दार, प्रेम – लग्न यातील रुसवे – फुगवे, कधीतरी संपणार व सारे कसे शांत शांत होईल या आशेवर आपण जगत असतो व एकंदर जीवन आपल्याला निराश करत नाही असा सामान्यपणे सर्वांचा अनुभव असतो.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

वैचारिक क्षमतेवर पसरलेली श्रद्धेची गडद छाया (उत्तरार्ध)

पूर्वार्ध

वैचारिक क्षमतेवर पसरलेली श्रद्धेची गडद छाया असलेली ही मानसिकता कशा कशामुळे घडत असावी याचा थोडासा जास्त खोलात जाऊन विचार करू लागल्यास आणखी काही गोष्टी लक्षात येतील.

आपण आपल्या श्रद्धा-विचारांशी पूरक असलेल्या गोष्टीच फक्त लक्षात ठेवतो.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

वैद्यकीय इच्छापत्र

२२ ऑगस्ट २०१५ रोजी कोथरुड येथे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात माझ्या सुखांताचा माझा विचार या विषयावर परिसंवाद झाला होता.खाली नमूद केली वैद्यकीय इच्छापत्र हे नमुन्या दाखल आहे. यात प्रत्येक व्यक्ती आपल्या इच्छेनुसार बदल करु शकते. ऎड असीम सरोदे यांनी स्थापन केलेल्या सहयोग ट्रस्ट तर्फे इच्छामरण या विषयावर समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जातात. डॉ शिरीष व डॉ आरती प्रयाग ( वैद्यकीय क्षेत्र) असीम व रमा सरोदे ( कायदा क्षेत्र) मंगला आठलेकर, डॉ रोहिणी पटवर्धन ( वृद्धकल्याणशास्त्र) शुभदा जोशी, विद्या बाळ व रविंद्र गोरे असा एक गट या विषयावर काम करतो आहे. वैद्यकीय इच्छापत्रा आधारे इच्छामरणाला कायदेशीर आधार मिळवण्यासाठी सहयोग ट्रस्ट काम करत आहे. आपण जर हे वैद्यकीय इच्छापत्र संमती व शक्य असल्यास त्यांचे कडे पाठवले तर जनहित याचिकेला जोडता येईल.
सहयोग ट्रस्ट
१, प्रथमेश सहकारी गृहरचना सोसा, प्रभात रोड गल्ली नं ५, पुणे ४११००४
फोन नं- ०२० २५४५९७७७
sahayogtrust.in

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

फाळणी आणि ५५ कोटी

भारतीय प्रवृत्ती ईतिहासाचा गमजा करण्याची आणि त्यात अडकुन पडण्याची आहे हे झोबणारं असलं तरी सत्य आहे. मग ते सोन्याचा धुर असो, शिवरायांचा ईतिहास किंवा भारताची फाळणी.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

वैचारिक क्षमतेवर पसरलेली श्रद्धेची गडद छाया (पूर्वार्ध)

माणूस हा एक विचित्र प्राणी आहे. या प्राण्याला नाविन्याची फार हौस आहे. त्याच्यात सर्जनशीलतेची क्षमता आहे. गुंतागुंतीच्या समस्यांना योग्य उत्तरं शोधण्याची हतोटी आहे. त्यानी केलेल्या तंत्रज्ञानातील अफाट प्रगतीमुळे मानवी जीवन सुसह्य होत चालले आहे. स्वत:च्या आरोग्य स्थितीवर संशोधन करत तो आता जास्तीत जास्त वर्षे जगण्याचा प्रयत्न करत आहे. दुर्धर समजलेल्या रोगांवर औषधोपचार शोधल्यामुळे निरोगी आयुष्य जगणे त्याला आता शक्य होत आहे. परंतु एवढे करूनसुद्धा अजूनही तो अविचारांना, चुकीच्या विचारांना बळी पडतोच आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

फ्लश करा व विसरून जा !

शहरी भागात फ्लॅट विकत घेताना किंवा शहरात वा खेड्यात बंगला/घर बांधताना फ्लश प्रकारच्या संडासांचा आग्रह नेहमीच धरला जातो. पांढऱ्या स्वच्छ सिरॅमिक फरशा त्यावर ठेवलेले संडासपात्र, त्यामागे असलेली पाण्याची नाजूक टाकी....बोटाने कळ दाबल्यानंतर धबधब्यासारखे सळसळत वाहणारे स्वच्छ पाणी... व मलमूत्र गायब! जे दिसत नाही त्याबद्दल विचार करायचे नाही या मानसिकतेमुळे फ्लश संडासातील घन व द्रव पदार्थांचे काय होते याची काळजी कुणीही करत नाही. बिल्डर, काँट्रक्टर, इंजिनीअर, नगरपालिका, शासन, इत्यादींचा तो प्रश्न आहे, ते बघून घेतील, अशी मनाची समजूत करून घेत आपण स्वस्थ असतो.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

यशाची गुरुकिल्ली

अशोक शंकर चव्हाण नावाची अनेक माणसं आपल्याला महाराष्ट्राभर सहज सापडतील. परंतु त्यापैकी मुख्यमंत्रीपद भूषविणारे मा. अशोक(राव) शंकर(राव) चव्हाण हे एकमेव असतील. व इतरामध्ये कुणी शेतमजूर, कुणी गवंडी, कुणी जिल्हा परिषदेच्या कार्यालयात कारकून वा कुणी वरच्या हुद्यावरील अधिकारी..... अशी असू शकतील. एकजण यशाची पायरी चढत चढत वरपर्यंत पोचतो व इतर मात्र जीवनाच्या रहाटगाडग्यात अडकून पडलेले, कसेतरी दिवस ढकलत असलेले सापडतील. हे असे का? या प्रश्नाचे उत्तर तसे सोपे नाही. काहींना यशाची गुरुकिल्ली सापडते व ते पुढे पुढे जात ते आयुष्यात यशस्वी होतात, व इतर त्यापासून वंचित आहेत एवढेच आपण म्हणू शकतो.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

ऑटीझम अवेअरनेस डे / ऑटीझम अवेअरनेस मंथ

आज काय लिहू कळत नाही. बराच वेळ ऑटीझम अवेअरनेस डे व मंथबाबत काहीतरी लिहीलेच पाहीजे ह्या विचाराने बसले आहे. पण काहीच सुचत नाही. मुलाचा स्प्रिंग ब्रेक चालू असल्याने मागे त्याचा दंगा, कर्कश आवाज काढणे इत्यादी चालू असल्याने ह्या परिस्थितीत काही विचार करून लिहीणे जरा अवघडच.! Smile

गेल्या फेब्रुवारीपासून मी ऑटीझमवर लिहीत आहे. अजुनही पुष्कळ लिहीण्यासारखे आहे. मात्र सध्या डोक्यात सैतानाने घर करू नये म्हणून बिझी राहण्याच्या दृष्टीने हजारो व्याप मागे लावून घेतले आहेत. स्वस्थ बसून वाचन/लिखाण होणे सध्या दुर्मिळ बाब बनत चालली आहे. Anyhoo, I am loving' it ! Smile

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

[मुलाखत] गोवंशहत्याबंदी कायदा: १० लाख लोकांना बेरोजगार करणारा कायदा - श्री विजय दळवी

गोवंशहत्याबंदी कायदा महाराष्ट्रात लागू झाला. गायीसोबत, बैल व वासराचे मांस (बीफ) साठवणे, विकणे वा बाळगणे हा गुन्हा घोषित झाला. ही बातमी वाचल्यावर ’ऐसी अक्षरे’वरही थोडी चर्चा झाली होती. तदनंतर हा निर्णय किती उपयुक्त आहे हे काही दिवसांत कळेलच असे म्हणून मी नंतर या विषयाकडे दुर्लक्ष केले. दरम्यान योगायोगाने माझे बोलणे श्री. विजय दळवी यांच्यासोबत झाले आणि या विषयाशी संबंधित इतर अनेक बाबतीतली माहिती मला मिळाली, आमच्यात झालेल्या लहानश्या चर्चेचा/गप्पांचा गोषवारा ऐसीकरांना लेखरूपात वाचायला आवडेल व काही अधिकची तथ्ये वाचकांना समजतील या उद्देशाने हा लेख लिहीत आहे. श्री.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

पाने

Subscribe to RSS - सामाजिक