इतर

अप्रिय आठवणींपासून सुटका

मे २००७ च्या सुरवातीला जीवनविद्या मिशने मांडलेल्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करायला मला सुचवले गेले होते. मला माझ्यातल्या नकारात्मक भावनांवर ताबा मिळवण्यासाठी हे सुचवले गेले आहे हे मला त्यावेळी माहीत नव्हते. २००७ च्या सुरवातीपासून अंदाजे दीड वर्षे मी अभ्यास करीत होतो.

ललित लेखनाचा प्रकार: 

काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट:टॅक्सी दिवस १ (८ डिसेंबर २०१९)

टॅक्सी मिळत नसल्याने माझा मोजो जरा ढिला पडत चालला होता.

वीकेंड्स फ्री ठेवले होते टॅक्सी चालवायची म्हणून...

पण टॅक्सी मिळत नसल्याने वैतागून साल्साचा क्लास लावून टाकला.

केतकीचा पुण्यात बचाता क्लास आणि माझा मुंबईत साल्सा असं थोडे शनिवार-रविवार चालू होतं.

तशाच एका शनिवारी रात्री केतकीचा मेसेज आला:

गुड न्यूज टुमारो इज युअर मीटिंग.

१० :३० मॉर्निंग हॅंगिंग गार्डन सिमला हाऊस.

दिनेश भाई ...

ही होल्ड्स ३ टॅक्सीज !

मी थरथरलोच.

फायनली...

ललित लेखनाचा प्रकार: 

घन तमी शुक्र बघ राज्य करी

https://www.aathavanitli-gani.com/Images/Photo/Lyrics/Bha_Ra_Tambe.jpg
.

ललित लेखनाचा प्रकार: 

काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: करोना चॅप्टर ३१ मे ते २ जून

निघताना नाही म्हटलं तरी आतून थोडं हलकं वाटत होतं.

युनिव्हर्सच्या जगड्व्याळ...(बाय द वे हा 'जगड्व्याळ' शब्द भारी आवडतो मला) भांड्याला आपण सूक्ष्म काही का होईना पोचा मारला असं काहीतरी फिलींग येत होतं.
थोडा खुशीतच नाशिकच्या निवांत रस्त्यांवरून सरसर परत निघालो.

जाता जाता दिसलेला एका निवांत सरकारी कॉलनीतला हा देखणा रस्ता:

ललित लेखनाचा प्रकार: 

आंबेडकर नगरमधला करोना-बदल

साधकबाधक चर्चा करून आमच्या सोसायटीने मदतनीस बायकांना बोलावलं. तसं कळवल्यावर आमची मंदा म्हणाली, घरी बसून पगार खाणं बंद होऊदे. आणि धावत आली कामासाठी.

ललित लेखनाचा प्रकार: 

करोना, झोप, स्वास्थ्य आणि संकीर्ण.

करोना (कोरोना?) पसरला त्याला तीन महिने होत आले. आरोग्य आणि नोकरी यांची अनिश्चितता यांनी आपल्यापैकी अनेकांना या काळात केव्हा न केव्हा पछाडलं असणारेय. तसंच सलग इतके दिवस घरी अडकून पडल्याचे दुष्परिणाम वेगळेच. त्याबद्दल पुन्हा केव्हा तरी.

ललित लेखनाचा प्रकार: 

डिप्रेशनवर बोलू काही

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे नैराश्य हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. मला यासंदर्भातील माझा अनुभव लिहावासा वाटला, म्हणून हा लेखप्रपंच.

ललित लेखनाचा प्रकार: 

काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: करोना चॅप्टर ३१ मे २०२०... डी-डे

चला ऑल सेट !

रात्री मास्क, ग्लोव्ह्ज वगैरे सगळी तयारी केली.

बायको तर बॉर्डरवर चाललेल्या जवानासाठी होतात तशी सेंटीमेंटल झाली होती.

"अय जाते हुए लम्हो जरा ठेहरो" वाजणार असं वाटायला लागलं...

महादेवाची फॅन असल्याने बिचारीने रुद्राक्षाची माळसुद्धा बॅगेत टाकली.

सकाळी झटपट उठून वाकड ब्रिजवर तीन मुलं आणि पुण्यातील सत्संगी कोऑर्डिनेटर हरीश ह्यांना भेटलो.

अमित पटेल, कुशलेंद्र पटेल आणि सिजू पटेल.

तिघेही लहानखुऱ्या चणीचे.

अमित आणि कुशलेंद्र देखणे टीनएजर,

ललित लेखनाचा प्रकार: 

काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: करोना चॅप्टर ३० मे २०२०

शुक्रवारी मित्राशी पुन्हा एकदा कन्फर्म केलं.
तो म्हणाला आज थोडं काम असल्यामुळे शनिवारी निघेल त्या पोरांना घेऊन.
म्हटलं ठीक आहे तीनही मजूर पोरांचं आधार-कार्ड, मेडिकल सर्टिफिकेट वगैरेचे फोटोज वगैरे रेडी करूयात तोवर.
सगळी तयारी करून मी शेळ्यांची स्वप्नं बघत पुन्हा शुक्रवारी झोपलो.

शनिवारी उठल्या उठल्या मित्राचा मेसेज,
"बायको अजिबात हो म्हणायला तयार नाहीये, सॉरी"

भरोशाच्या म्हशीला टोणगा #$%^

ललित लेखनाचा प्रकार: 

काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: करोना चॅप्टर २८ मे २०२०

"टॅक्सीनामा"ची पुढची काही प्रकरणं लिहून तयार होती पण टाकायची इच्छाच मरगळल्यासारखी झाली.

पायपीट करणाऱ्या अश्राप जीवांचे हाल बघवेनात.
आपलं टॅक्सी चालवणं म्हणजे एक सुरक्षित उच्चभ्रु पोराचा गिमिकी चूष असल्यासारखं माझं मलाच वाटायला लागलेलं.
तसंही ते लॉकडाऊनमध्ये पॉजवर गेलेलं...

आतून काही छान वाटेना...

शनिवार-रविवार माझ्या गाडीतून साधारण २ (/३?) लोकांना ८ ते १० तासांचा ड्राइव्ह करून पोचवण्याचा ऑप्शन मांडला.
पण आपण काय सोशल मिडीया इन्फ्लुएन्सर वगैरे नसल्याने आधी कोणाचा फारसा प्रतिसाद आला नाही.

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - इतर