Skip to main content

काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ३० (उद्यापन): ३ एप्रिल २०२२:

चौफेर समाचार दिवाळी २०२२ मध्ये माझ्या टॅक्सीनाम्याविषयी विस्तृत लेख प्रसिद्ध झाल्याने, (संपादक अरुण नाईक ह्यांचे विशेष आभार)

शेवटचे दोन लेख लगेच ऐसीवर टाकले नाहीत.

ते आत्ता टाकतोय.

-------------------------------
शेवटचा दिवस...

खरं सांगायचं तर मीही आता ह्यातून बाहेर पडायला आतुरलेलो.

ह्यानंतर रविवारी दुसरं काय काय करता येईल ह्याचे प्लॅन्स ऑलरेडी डोक्यात चालू झालेले.

शनिवारी रात्री पार्ट्या करणं, रविवारी आधी पोहे आणि मग मटण खाऊन लोळत पडणं, किंवा वीकेंड गेटवेजचे प्लान्स करणं हे सगळं राहून जात होतं.

अर्थात हे साक्षात भेंचोत फर्स्ट वर्ल्ड आहे आणि खऱ्या टॅक्सी ड्रायव्हर्सना ही डाव सोडता येण्याची लक्झरी अजिबात नाहीये हे मान्यच!

पण प्रांजळ असलेलंच बरं!

फारसा इव्हेंटफुल न होता आजचा दिवस मंडेन जावा असं आतून वाटत होतं आणि तसंच झालं.

गव्हर्नमेंट कॉलनी ते बी डी डी चाळीत एका यंगीश कपल आणि त्यांच्या लहान मुलाला सोडलं

रविवार साधून दामोदर / रवींद्र किंवा जवळपास कुठेतरी नाटक गाठायचे प्लान्स चाललेले होते त्यांचे.

अगदी ठाणे (गडकरी) किंवा कल्याणला (आचार्य अत्रे नाट्यगृह) जायचीही तयारी होती त्यांची.

हाच हाच तो रसिक उत्साही मायबाप प्रेक्षक असं म्हणत मी समाधानाने मराठीची काळजी काळजावरुन उतरवून टाकली आणि हलका हलका झालो :)

नवरा गंभीर बायको उत्फुल्ल आणि मुलगा माफक आगाऊ होता.

बायकोला प्रशांत दामलेचं "सारखं काहीतरी होतंय" बघायचं होतं.

तिनं तेवढ्यात चान्स मारला, "तुलाही सारखं काहीतरी होतच असतं ना!"
आणि ती शरद पोंक्षेसारखं खिक खिक हसली.

कॉल मी एम. सी. पी. पण बायकांचे टॉण्टस आणि टायमिंग वेगळीच लेव्हल असतेय.

लेझर सर्जरीसारखी प्रीसाईज जखम करू शकतात त्या.

पुरुष एकतर ओव्हर जाऊन समोरच्याला रक्तबंबाळ करतो नाहीतर अंडर जाऊन काहीतरी फदुकल्यासारखं बोलून वार फुकट घालवतो.

असो.

मग एका छान स्त्रीला आणि तिच्या लहान मुलीला सिद्धिविनायक वरून आस्वादला सोडलं.

ती "सिंगल मदर" असावी असं मला का कोण जाणे उगीचच वाटलं.

मग आणखी थोडी भाडी मारून लंच ब्रेक घ्यायला माझ्या आवडत्या जागी आलो: बॅलार्ड इस्टेट.

आज शेवटचा दिवस असल्यामुळे थोडी चैन करायची ठरवली.

ग्रँड हॉटेलच्याच बाजूला "बॉम्बे कॉफी हाऊस" आहे.

शांत, प्रकाशात न्हायलेली निवांत जागा आहे ही.

त्यांचं क्रॉसाँ क्लब सँडविच आणि कोल्ड कॉफी सुंदर असते.

आता तिकडचा स्टाफ थोडा ओळखीचाही झालाय.

आठवणीनी क्रॉसाँ सॅन्डविच मधून फ्राईड एग वगळतात माझ्या ऑर्डरला.

का कोण जाणे मला माझ्या बर्गर, सँडविच किंवा रस्त्यावरच्या चायनीजमध्ये वरतून टाकलेलं फ्राईड एग डोक्यात जातं.

हे ते शेजवान ट्रिपल वर फ्राईड एग टाकायची आयडिया कोणी आणली कोण जाणे च्या मारी.

BCH

chashma

Kursi

ब्रेकनंतर बॉम्बे हॉस्पिटलच्या जवळपास आणि काही भाडी मारली आणि धाडकन सहाच वाजले.

पॅकअप करायचं ठरवलं.

मुकेश चौकाजवळच्या पंपावर टॅक्सीचा गॅस फुल्ल केला.

ये SSS य सुट्टी!!!

पण टॅक्सी द्यायला जाता जाता मुच्छड पानवाल्याजवळच्या सिग्नलवर तीन छान टीन एजर पोरींनी मला डेस्परेट हातवारे करून थांबवलंच.

जवळच रमाबाई रोडवर जायचं होतं त्यांना बाबुलनाथजवळ.

इतक्या गोड मुलींना काही मला नाही म्हणवेना.

दिल्लीच्या होत्या बहुधा त्या.

दिल्लीच्या ठाशीव अक्सेंटमध्ये चिवचिव करत, भारी परफ्युमचा घमघमाट सोडत आणि थँक्यू भैया बोलत गोड हसून त्या छू झाल्या.

मी जरा सुन्न झालो. प्रॅक्टिकली शेवटचं भाडं होतं प्रोजेक्टचं!

सुसाट टॅक्सी मारत राजकुमारला भेटलो.

तो पुढच्या शिफ्टसाठी तयारीतच होता.

त्यालाच घेऊन सी-लिंक वरून मस्त गप्पा मारत घरी आलो.

मोठ्ठं काहीतरी संपल्यासारखं हलकं हलकं वाटत होतं.

नाही म्हटलं तरी २०१६ पासून जवळ जवळ साडेपाच वर्षं ह्या सगळ्या पाठी मी हात धुवून लागलो होतो.

आज ३० सेशन्स झाली फायनली.

आज आणि हा आठवडाभर जरा चिल.

आजची कमाई: ५२० रुपये

RajKumar

30

उपसंहाराचा लेख लवकरच!
आधीचे दुवे:
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: उपोद्घात
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २८ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३१ जानेवारी २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ मार्च २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २०१८
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९ उत्तरार्ध
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ५ व १२ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ फेब्रुवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १८ मार्च २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २४ मार्च ते १२ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २० एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २६ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३० एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ मे आणि २९ मे २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १५ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २२ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट माईलस्टोन: २० जुलै २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २० जुलै ते डिसेंबर पहिला आठवडा २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १ (८ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २ (१५ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ३ (२२ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ४ (२९ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ५ (१९ जानेवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ६ (२६ जानेवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ७ (२ फेब्रुवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ८ (९ फेब्रुवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ९ (२३ फेब्रुवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १० (१ मार्च २०२०)
टॅक्सी दिवस ११: ८ मार्च २०२० (विमेन्स डे)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १२ (१नोव्हेम्बर २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १३ (१५ नोव्हेम्बर २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १४: (३ जानेवारी २०२१)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १५: (१४ फेब्रुवारी २०२१)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १६: २१ फेब्रुवारी २०२१
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १७: २९ ऑगस्ट २०२१
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १८: १२ सप्टेंबर २०२१
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १९: १९ सप्टेंबर २०२१
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २०: २४ ऑक्टोबर २०२१
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २१: ६ नोव्हेंबर २०२१
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २२: ७ नोव्हेंबर २०२१
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २३: २८ नोव्हेंबर २०२१
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २४: १९ डिसेंबर २०२१
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २५ ते २७: २३ जानेवारी ते २० मार्च २०२२:
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २८: २७ मार्च २०२२:
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २९ (सेकंड लास्ट): २ एप्रिल २०२२:

Node read time
5 minutes

ललित लेखनाचा प्रकार

5 minutes

चिमणराव Tue, 28/03/2023 - 04:44

मालिका त्या दिवाळी अंकात एका बैठकीत सलग वाचली होती,इथे खरडफळ्यावर नोंदवलं होतं.
उपक्रमाचा हेतू सफल झाला. तुम्ही हे केलं नसतं तर कळलं नसतं. स्वतःचे अनुभव म्हणून विशेष महत्त्व.
( टॅक्सीत प्राइवसी नसते, पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये असते हे माझे मत.) 😀
अवांतर - सी-लिंकवरून पूर्वी बेस्ट बस जायच्या त्या आहेत का अजून?

नील Tue, 28/03/2023 - 14:16

आभार!
माझ्या माहितीनुसार सी लिंकवरून जायला बेस्ट बसेसना परवानगी नाही.

पाषाणभेद Tue, 28/03/2023 - 14:56

सर्व लेख वाचतच होतो. शेवट नेहमीसारखा झाला. अर्थात अनुभवाची बाजू जड झालीये हे नक्की. का कुणास ठाऊक पण माझा टॅक्सी, रिक्षा किंवा कोणत्याही ड्रायव्हर विषयी सॉफ्ट कॉर्नर आपोआप तयार होतो. अगदी मी दुचाकीवर असेल अन शेजारून, मागून, समोरून कुणी चारचाकीवाला आला की आपसूक जागा देणे होते.