काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: उपसंहार / सिंहावलोकन / रेट्रोस्पेक्टिव्ह वगैरे:

आधी आपण बघूया प्रोजेक्टच्या सुरुवातीला सेट केलेले अजेंडे आणि नियम किती साध्य झाले वगैरे:

( पहा उपोद्घात )

१. मन्नत:

नवस तर फिटलाच असं म्हणता यावा. सो इकडे मी स्वतःला १०० % मार्क दिल्यास कोणाची हरकत नसावी.

२. मुंबूड्या:

मुंबईत जन्मलो आणि वाढलो तरी गेली १५ वर्षं पोटापाण्यासाठी पुण्यात राहून काम करतोय.

आई आणि बहिणीसाठी मुंबईला येणं होत रहायचं पण एकंदरीत धबडग्यात मुंबईचा टच सुटल्यासारखाच झालेला.

ह्या प्रोजेक्टच्या निमित्ताने तो काही दशांशाने का होईना परत मिळाला हे छानच.

मुंबईच्या बेसिक रस्त्यांची थोडीफार आयड्या आली.

चुकत माकत, कधी पाशिंजरांच्या शिव्या खात,

चर्चगेट ते व्ही टी स्टेशन, चर्चगेट ते कुलाबा, व्ही टी ते माझगाव, हाजीअली ते महालक्ष्मी आणि पुढे परेल भोईवाडा

वगैरे वगैरे महत्त्वाचे रस्ते कळून आले.

गूगल मॅप्सची मदत अर्थातच झाली.

पण बहुतेक वेळा पाशिंजरांनी न रागावता माहीत नसलेले रस्ते दाखवले.

खास करून मध्य आणि दक्षिण मुंबईचा ब्लू प्रिंट समजून आला.

तीन महत्त्वाचे रूट्स म्हणता यावेत.

जे एकमेकांना समांतर जातात. (पुण्यातल्या जे एम / एफ सी / आणि एस बी रोडसारखे पण त्यापेक्षा मोठया स्केलमध्ये )

पश्चिमेला समुद्रालगत जाणारा कॅडल रोड - वरळी - हाजीअली - पेडर रोड - चौपाटी हा एक: तिघांतला सगळ्यात पॉश

सायन - दादर टी टी - नायगाव - परेल - के ए एम - भायखळा - जे जे - व्ही टी ला जाणार दुसरा: बराचसा कनिष्ठ मध्यमवर्गीय

वडाळा - शिवडी - रे रोड - डॉकयार्ड - बी पी टी वाला तिसरा: हा तर साक्षात इंडस्ट्रीयल. ह्याचा चेहेरामोहरा हातावर पोट असलेल्यांचा.

हे झालं भूगोलाविषयी.

शिवाय थोडी खवैय्येगिरी करता आली.

प्रकाश, सरदार पावभाजी, बॉम्बे कॉफी हाऊस, सुरती भोजनालय अशा काही आवडत्या जागांना भेट देता आली.

रविवार दुपारची निवांत दक्षिण मुंबई चाखता आली.

काही सुंदर पण भण्ण, भग्न, खिन्न जागा बघितल्या.

चिंचोळ्या किचाट गर्दीच्या रस्त्यांवरून जीव मुठीत घेऊन गाडी चालवली.

ठिकठिकाणचे सी एन जी पंप वाले, खास टॅक्सीवाल्यांसाठीचा अति गोड चहा बनवणारे चहावाले आणि बरेच टॅक्सीवालेसुध्दा ओळखीचे झाले.

आणि बरंच काही...

मुंबई अर्थातच कॉम्प्लेक्स, जगड्व्याळ, कधीच हातात न येणारी निसरडी म्यूझ आहे.

तिला पूर्ण जाणणं अजिबातच अशक्य आहे हे मला नीटच कळलं.

सो ह्या कॅटेगरीत मी मला ५५ % मार्क देईन.

३. पर्स्पेक्टिव्ह:

आधीच म्हटल्याप्रमाणे हा रस्त्यावर उतरून जगण्याचा प्रयत्न होता तो सफल झाला का?

निर्दयपणे म्हणायचं तर बऱ्याच अंशी नाही!

पण त्याला माझी मानसिक तयारी होतीच.

केवळ तीस सेशन्समध्ये मी स्कॉर्सेसीच्या "ट्रॅव्हीस बिकल"सारखा हार्ड कोअर टॅक्सीवाला होईन ह्याची शक्यता कमीच होती आणि ते झालंही नाही.

पण एक वेगळ्याच जगाची तोंडओळख का होईना करून घेता आली.

बऱ्याच लोकांचं आयुष्य उबदार, सुरक्षित, जमाडी जमतीनं भरलेलं नसतं हे कळलं.

आपण होंडा सिटी चालवताना रस्त्यावरच्या बाकीच्या इतर ड्रायव्हर्समध्ये जी क्षमाशीलता आणि दिलदारपण असतो तो आपण टॅक्सी ड्रायव्हर असल्यास एकदम घटतो असा अनुभव आला Smile

रोड रेज अनुभवले, अरेला कारे केलं, शिव्या खाल्ल्या शिव्या दिल्या...

टॅक्सीवालेच टॅक्सीवाल्यांची मारताना पाहिले.

बंधुभावाला जागून मदतही करताना पाहीले.

बरेचसे ड्रायव्हर आयुष्यभर टॅक्सीतच रहातात झोपतात त्यांना आपल्यासारखं घट्टंमुट्टं घरच नसतं हेही बघितलं.

थोडक्यात सांगायचं तर पॅरासाईट किंवा भाऊबळी पिक्चरचा पॉईंट अजून थोडा नीट कळला.

चालवायला टॅक्सी शोधताना एक ड्रायव्हर बोललेला भाई आप एक दिन भी नाही टिकोगे ते आठवलं.

(तीस दिवस का होईना पण टिकलो)

हे आयुष्य मी त्यांच्यासारखं जगू शकेन का? तर नाही.

आपण असं जगू शकणार नाही पण लोक काही पर्याय नसल्याने असं जगतात हे भान आलं.

हेही किंचित यशच.

म्हणजे कसं आहे ना संगीत शिकताना आपण ऑफ बीट जातोय ही समजणं सुद्धा मोठी गोष्ट असते...

ऑन बीट वाजवणं ही तर पुढची पायरी.

तर ती पहिली पायरी नीटच समजली इथे: You know that you don't know!

इकडे मी मला काठावर पास होण्यापुरते ३५ % देईन.

आता आपण उपोद्घातातील नियम किती पाळले ते बघूया:

नियम: इमानदारीत टॅक्सी चालवायची. कुठेही नियम वळवा-वाकवायचे नाहीत.

हा नियम चांगलाच पाळला. प्रसंगी पाशिंजरांच्या शिव्या खाऊनही सिग्नल तोडले नाहीत किंवा नो एंट्रीत कोणी बघत नसतानाही गाडी घातली नाही.

टॅक्सीचा बॅजही थ्रू प्रॉपर चॅनेल जाऊनच मिळवला.

थोडा नेट लावला तर सरळ मार्गाने झोलझाल न करता कामं होतात, सिस्टीमचे लोकंही मदत करतात हे पाहून छान वाटलं

नियम : पाशिंजरला होईल तितकी मदत करायची.

हे ही बऱ्याच अंशी पाळलं.

होता होईल तो मदत केली.

पैशासाठी अडवलं नाही.

रस्ता चुकवल्यास सरळ पाशिंजरांची क्षमा मागून टाकली.

नियम: नाही बोलणारे टॅक्सी-रिक्षावाले असंख्यवेळा आपल्या डोक्यात तिरके गेलेयत सो कुणालाही नाही म्हणायचं नाही. येईल ते भाडं स्वीकारत जायचं.

हा मात्र काहीवेळा मोडला. दुसऱ्या शिफ्टचा ड्रायव्हर आपली वाट पहात असताना शेवटच्या क्षणी भाडं घेणं शक्य नसतं.

अशा वेळी अपराधीपणे सॉरी पुटपुटून निघून गेलो.

टॅक्सीवाले बरेचदा उगीच नाही म्हणत असले तरी बरेचदा त्यांची जेन्युईन अडचण असते हे समजलं.

आधी रिक्षावाल्यांशी बरेचदा तावातावाने भांडायचो ते (अर्थातच) आता अजिबातच करावंसं वाटत नाही Smile

गम्मत म्हणजे आत्ताशा सिव्हिल कपड्यांतही मला रिक्षा टॅक्सीवाले कुठे जायचं असेल तर पटकन हो म्हणतात.

त्यांना भावकीतले लोक ओळखू येण्याचा सेन्स असावा बहुतेक.

हे अजून काही बोनस फायदे:

इन जनरल बरेच टॅक्सीवाले चांगले मित्र झालेत. दिनेशभाई, राजकुमार इत्यादी.

फेसबुक, ऐसी अक्षरे, सहकारी, मित्र, शेजारी आणि बऱ्याच जणांनी ह्या प्रोजेक्टचं भरभरून कौतुक केलं आणि माझी कॉलर टाईट केली.

लिहिण्यात नोंदी करण्यात काही एक शिस्त आली.

आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही एक संकल्प आरंभापासून अंतापर्यंत तडीस नेण्याचं निखळ समाधान लाभलं.

शेवटी ह्या ऍब्सर्ड, व्यर्थ, बरेचदा भंजाळून टाकणाऱ्या आयुष्यात प्रत्येकाला काही ना काही प्रोजेक्ट लागतोच.

मग कोणी वारीला जातो, कोणी सचिनच्या प्रत्येक मॅचला हजेरी लावतो, कोणी नवीन ऑपरेटींग सिस्टीम लिहितो, कोणी लोकांना व्याकरण शिकवतो आणि कोणी कबुतरं पाळतो.

तसंच हे ही...

पुढे काय?

काही तरी नवीन!

बघूया कसं जमतंय ते!!

------- समाप्त --------

आधीचे दुवे:
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: उपोद्घात
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २८ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३१ जानेवारी २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ मार्च २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २०१८
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९ उत्तरार्ध
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ५ व १२ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ फेब्रुवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १८ मार्च २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २४ मार्च ते १२ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २० एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २६ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३० एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ मे आणि २९ मे २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १५ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २२ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट माईलस्टोन: २० जुलै २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २० जुलै ते डिसेंबर पहिला आठवडा २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १ (८ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २ (१५ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ३ (२२ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ४ (२९ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ५ (१९ जानेवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ६ (२६ जानेवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ७ (२ फेब्रुवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ८ (९ फेब्रुवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ९ (२३ फेब्रुवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १० (१ मार्च २०२०)
टॅक्सी दिवस ११: ८ मार्च २०२० (विमेन्स डे)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १२ (१नोव्हेम्बर २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १३ (१५ नोव्हेम्बर २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १४: (३ जानेवारी २०२१)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १५: (१४ फेब्रुवारी २०२१)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १६: २१ फेब्रुवारी २०२१
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १७: २९ ऑगस्ट २०२१
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १८: १२ सप्टेंबर २०२१
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १९: १९ सप्टेंबर २०२१
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २०: २४ ऑक्टोबर २०२१
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २१: ६ नोव्हेंबर २०२१
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २२: ७ नोव्हेंबर २०२१
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २३: २८ नोव्हेंबर २०२१
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २४: १९ डिसेंबर २०२१
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २५ ते २७: २३ जानेवारी ते २० मार्च २०२२:
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २८: २७ मार्च २०२२:
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २९ (सेकंड लास्ट): २ एप्रिल २०२२:
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ३० (उद्यापन): ३ एप्रिल २०२२:

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

१. रस्ते -वाहनचालकांना गूगल मॅप्स आहेत. पण अगदी नव्यांना ओफलाईन मोबाईलमध्ये ठेवणे जड (खूप डेटा) आहेत.
OsmAnd app बरंय. (Maharashtra 190MB, Karnataka 185MB)रस्ते,रेल्वे स्टेशन्स आणि मुख्य जागांची नावे.

२. मुंबई तशी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने पकडतात गवसतात. समुद्र असणे हे इतर शहरांच्या तुलनेत मोठी गोष्ट.

३.युपिआइ पेमेंटमुळे सुटे पैसे देणे घेण्याबद्दल भांडाभांडी खूपच कमी झाली असावी.

४.एरपोर्टला/रेल्वे टर्मिनस येथे लाईनीत टॅक्सी लावल्यावर अगदी जवळचे भाडे मिळाल्यावर चालक चिडतात आणि अधिक पैसे मागतात. उदाहरणार्थ कुर्ला टर्मिनस‌‌‌ ते छेडानगर चेंबूर. तसा काही प्रसंग मालिकेत लिहिला आहे काय?

५. टॅक्सीला वरती कॅरेज नसल्याने कटकट करतात का?

६. कमाई = गल्ला वजा पेट्रोल वजा मालकाचे द्यायचे भाडे?

७. पुढे काय? हा प्रश्न पडला हाच पटला. आपल्या सवडीने दिवसातले पाच सहा तास छंदासाठी काढून मोकळे होणे हे इथे जमले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

४.एरपोर्टला/रेल्वे टर्मिनस येथे लाईनीत टॅक्सी लावल्यावर अगदी जवळचे भाडे मिळाल्यावर चालक चिडतात आणि अधिक पैसे मागतात. उदाहरणार्थ कुर्ला टर्मिनस‌‌‌ ते छेडानगर चेंबूर. तसा काही प्रसंग मालिकेत लिहिला आहे काय?

बरेचसे टॅक्सीवाले तसं करतात पण टेक्निकली एरपोर्टला/रेल्वे टर्मिनस येथे लाईनीत टॅक्सी लावल्यावर
तुम्ही भाडं नाकारू शकत नाही.

चर्चगेट स्टेशनला काही दीड शहाणे नाकारत पण मग त्या भाड्यांना (शिवी नव्हे Lol मी घेऊन जात असे.

६. कमाई = गल्ला वजा पेट्रोल वजा मालकाचे द्यायचे भाडे?

ह्या लेखमालेसाठी सी एन जी गॅस आणि मालकाला द्यायचे भाडे वजा केले नाहीये कमाईतून

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक नंबर लेखमाला झाली आहे -
ह्या सगळ्या प्रवासात फोटो/विडिओ आहेत का? त्याचं संकलन करून एक झब्री डॉक्युमेंटरी करणार का नीलभौ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आभार!

फोटो बरेच आहेत प्रत्येक लेखात टाकले ही आहेत.

व्हिडिओ फारसे नाहीत.

बाय द वे हे टाईम्स ऑफ इंडिया च्या वेब एडिशनने केलेले फीचर
फीचर

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कुठल्या मराठी इ चॅनेल /वर्तमानपत्राने आपल्याकडे याविषयो काही विचारणा केली का आत्तापर्यंत ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बोले तो, त्यांनी मुंबईत टॅक्सी चालविण्याऐवजी, त्यांना जर एक शेपूट आणि (ऑप्शनली) दोन शिंगे असती, आणि ते जर मुंबईत चौखूर उधळले असते, तर मराठी माध्यमांनी त्यांची त्वरित दखल घेतली असती.

(अर्थात, इंग्रजी माध्यमांची स्थितीसुद्धा काही फार थोर राहिलेली आहे, अशातला भाग नाहीच.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाही केली विचारणा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सलाम…!

‘टाइम्स’ चं फीचर झकास आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0