Skip to main content

गद्य

अक्कल दाढ ????

काल दुपारी कार्यालयात एक विशिष्ट फाईल वाचत होतो. फाईल वाचत असताना आपली दाढ दुखते आहे ही जाणीव होऊ लागली. काही वेळातच दाढेचे दुखणे वाढू लागले आणि त्या बरोबर वेदनाही. डोक्यात गरगर सुरु झाली. अखेर वैतागून मी फाईल वाचणे थांबविले. ती फाईल लाल फितीत व्यवस्थित बांधून अलमारीत ठेऊन दिली. संध्याकाळी घरी आलो, दाढेच्या दुखण्यामुळे रात्री व्यवस्थित जेवता ही आले नाही. गरम पाण्यात मीठ टाकून गुळणे केले, लवंग ही तोंडात ठेवली. पण काही फायदा झाला नाही. सारी रात्र दाढेच्या दुखण्यामुळे तळमळत काढली.

ललित लेखनाचा प्रकार

मी विणायला लागते.

मी आता विणकाम शिकले आहे, इतकेच नव्हे तर चक्क विणू लागले आहे.

माझी खात्री आहे की हे वाक्य वाचून पुष्कळ भगिनीमंडळी भुवया उंचावून म्हणतील, ’इश्श त्यात काय एवढं, मी तर कित्ती लहानपणीच विणायला शिकले आणि विणतेच आहे तेव्हापासून!’

खरं म्हणजे अगदी लहानपणी नाही तरी ज्या वयात मुलीच्या जातीला यायलाच हव्या अशा विविध गोष्टी, म्हणजे गृहकृत्यदक्षता, थोडीफार कलाकुसर, विणकाम ह्या बाबींमध्ये आपल्या मुलींना निपुण करायच्या मागं आईमंडळी लागायची त्या वयात मी असतांना माझी आईहि माझ्या मागं हात धुवून लागली होती की मी विणायला शिकावं. माझ्या विविध आकारांच्या पोळ्या, अर्धवट भरलेले उशांचे अभ्रे आणि विणण्याचा तीव्र कंटाळा बघून ’तू आणि तुझं नशीब’ असे जातायेता वैतागानं म्हणत मला गुणसंपन्न करायचा नाद तिनं नंतर सोडला. माझा छळ तात्पुरता थांबला असं मला वाटलं.

पण छे, तेव्हढं कोठलं माझं नशीब? मला कलासंपन्न विद्यार्थिनी बनवण्याचं माझ्या आईचं अपुरं कार्य शाळेतल्या शिक्षकमंडळीनं हातात घेतलं. शाळेत शिवण्याटिपण्यासाठी दोन तास असत. आता विणकामाबरोबरच शिवणकामाचीहि कटकट मागं लागली. ह्या सलग दोन तासांमध्ये हातात शिवणकामाचं नाहीतर विणण्याचं सामान धरून गप्पा मारणंच मला अधिक आवडायचं. उलटेसुलटे टाके जेमतेम कळले पण गप्पांच्या नादात सुईवर मोजून घातलेले टाके केव्हा ओघळून जात तेच मला कळत नसे. ह्या कौशल्यावर परीक्षेत मोजे विणून मार्क कसे मिळणार ह्या चिंतेमध्ये मी असतांना एक मैत्रीण मदतीला आली. तिनं मला मोजे विणून दिले आणि त्याच्या बदल्यात माझ्याकडून एक वही लिहून घेतली. मीहि आनंदानं माझ्या विणण्याच्या आवडीची किंमत दिली.

लग्नानंतर आपणहून नाही पण माझ्या जावेच्या आग्रहाला आणि इच्छेला मान देण्यासाठी मी तिच्याकडून विणकामाचे धडे घ्यायला लागले. लवकरच मी विणत असलेली अगम्य आकाराची कलाकृति आणि तिचा वाढता आकार पाहून ती छोटया मुलासाठी आहे की हत्तीच्या पिलासाठी ह्याचा अंदाज न आल्याने मला शिकवण्याच्या बाबतीत तिनं सपशेल माघार घेतली आणि माझ्या विणकामाला पुन: विराम मिळाला. ’न धरी शस्त्र करी मी’च्या चालीव ’न धरी सुया करी मी’ असं म्हणत मी सुया खाली ठेवल्या.

पण त्या सुया माझ्या नशिबात असाव्यातच. सुया पुन: हातात धरण्याचा योग तब्बल ५० वर्षांनी २०१४ साली पुन: आला. प्रत्येक वेळी कोणीतरी हितचिंतक माझ्या हाती सुया द्यायला उत्सुक असतोच.

मी राहते त्या सीनियर बिल्डिंगमध्ये एक विणणार्‍यांचा ग्रुप आहे. तेथे मी नेहमी जाते आणि तेथे बसून मला जमत असलेले भरतकाम करत करत आणि गप्पा मारत इतरांचे कौशल्य बघत असते. ह्या गटातल्या आज्या-पणज्या ७० ते ९० वयाच्या युरोपियन, मेक्सिकन आणि मी एकमेव इंडियन. त्यातल्या एका डच आजीनं, जी गेली ८० वर्षं विणत आहे, तिनं मला विणायला शिकवायचा चंग बांधला आणि माझ्या हातात पुन: सुया दिल्या. ’दिल्या’ म्हणण्याऐवजी ’कोंबल्या’ असं म्हणणं अधिक योग्य ठरेल. मी ज्या पद्धतीनं सुया धरल्या त्यामुळं आणि एकंदरच माझी विणकामाशी चाललेली झटापट बघून सर्वांची मोठी करमणूक झाली आणि सर्वांनी 'knitting is not for you' असा एकमुखानं निर्णय देऊन माझी पुन: सुटका केली. ’ग्रुपला यायचं सोडू नकोस’ असंहि प्रेमानं सांगितलं.

नंतर गेल्या वर्षी साधारण ह्याच सुमाराला माझी मैत्रीण देवयानी हिनं तिच्या नातवाचा आपल्या आईसाठी तो स्कार्फ विणत असतानाचा फोटो दाखविला. एकाग्रतेनं आणि नकळत जीभ बाहेर काढून विणतानाचा त्याचा तो फोटो पाहून माझं मन कौतुकाने भरून आलं. मनात असा विचार आला की एवढंसं मूलहि विणू शकतं, आपण नुसतेच वयानं मोठे झालो आहोत. त्यानंतर मी पुन: विणायला शिकण्याचा निश्चय केला आणि माझं शिकणं पुन: सुरू झालं. कोठलीहि गोष्ट शिकण्याची प्रेरणा देणारा वयानं लहान असला तरी त्यानं काय फरक पडतो? मला विणायला शिकायची पुन:प्रेरणा देणार्‍या त्या छोटयाचे मी मनापासून आभार मानते.

मी पुन: विणायचे ठरवल्यावर माझ्या ग्रुपनं मला खूप मदत केली. त्यांच्या मदतीनं मी आता स्कार्फ, विंटरहॅट्स् आणि छोटी ब्लॅंकेट्स् विणू लागले आहे. माझा उत्साह आणि झपाटा पाहून ’knitting is not for you’ असा मला बजावणार्‍या माझ्या मैत्रिणी ’we have created a knitting monster' असं आता म्हणू लागल्या आहेत. माझ्या मतानं माझं विणकाम अजून प्राथमिक अवस्थेतच आहे पण मी माझ्या जेव्हा होतील त्या पतवंडांसाठी काहीतरी विणू शकेन अशी मला खात्री वाटत आहे. (माझ्या दोन नातवंडांची १४ साली लग्नं झाली आहेत, आता पतवंडांची वाट पाहाते आहे - पण जरा विषयान्तर झालं...)

आमच्या बिल्डिंगमधल्या महिला आमच्या ग्रुपला त्यांची घरात पडून असलेली लोकर देतात. आम्ही काही जणी स्वत: दुकानात जाऊनहि सर्वांसाठी लोकर आणतो. आमच्या ग्रुपमधली सर्वांची आवडती एक आजी अलीकडेच वारली. तिच्या इच्छेनुसार तिची उरलेली लोकर, सुया आणि अन्य काही साहित्य तिच्या मुलानं आम्हाला दिलं. तिच्या लोकरीतून तिच्याच आठवणी काढत नव्या वस्तु आम्ही बनवत आहोत.

आमच्या विणलेल्या वस्तु घेऊन जायला आम्ही इथल्याच सेंट जोसेफ हॉस्पिटलच्या व्हॉलंटिअर ग्रुपला बोलावलं. ते लोक येऊन आमचे आभार मानून आमच्या बनवलेल्या गोष्टी घेऊन जातात. ह्या वस्तु म्हणजे बेबी हॅट्स्, स्कार्फ, आणि ब्लॅंकेट्स् त्यांच्या कीमोथेरपी, डायलिसिस, मॅटर्निटी आणि इमर्जन्सी भागात वापरल्या जातात असे त्यांनी आम्हांस सांगितले. आपण करत असलेल्या गोष्टींचा योग्य उपयोग होत आहे हे ऐकून आम्हा सर्वांना आन्तरिक समाधान मिळाले आहे.

सध्या आमच्याजवळ भरपूर लोकर आहे आणि सर्वजण उत्साहानं काम करीत आहेत. नुकताच एप्रिलमध्ये आमच्या विणलेल्या वस्तूंचा दुसरा लॉट आम्ही हॉस्पिटलला दिला.

शिकायच्या प्रयत्नातल्या अनेक अर्धवट गोष्टी माझ्या आईनं पाहिल्या होत्या. आता उशीरानं का होईना पण मला विणता येऊ लागलं हेहि तिनं पाहयाला हवं होतं असं राहून राहून वाटतं.

ग्रुपमध्ये बसून सुखदु:खाच्या गोष्टी बोलत हसत खेळत घातलेले टाके, त्यातून घडणार्‍या गोष्टी नवजात बालकांना आणि आजारी व्यक्तींना ऊब देत आहेत. विणत असतांना मनात येतं की नव्यानं सापडलेला हा छंद मला सामाजिक बांधिलकीच्या कार्यात खारीचा वाटा उचलायला मदत करतो आहे. ह्या आनंदानं माझं मन भरून पावलं आहे.

ललित लेखनाचा प्रकार

एक उनाड उन्हाळी दिवस - - सीपीचा सेन्ट्रल पार्क आणि अमलतास

मे आणि जून ह्या दोन महिन्यात सूर्य क्रोधाने लाल होऊन आग ओकीत असतो. या आगीत जिथे धरणी माताच होरपळून जाते, तिथे पृथ्वीवरील प्राण्याची काय बिसात. दिल्लीत रस्त्यावर फिरणार्या आवारा गायी व कुत्रे दिवसभर सूर्याच्या क्रोधापासून स्वत:ला वाचविण्यासाठी सावली आणि पाण्याच्या शोधात भटकत राहतात. दुपारच्या वेळी तर झाडावर पक्षी ही झाडाच्या कोटरात दुबकून राहतात.

ललित लेखनाचा प्रकार

एक आठवण - गोटू आणि क्रिकेटचा चेंडू

तेंव्हा माझे वय १२ वर्षांचे असेल. अर्थात थोडा मोठा झालो होतो. खेळायला मित्रांसोबत गल्लीच्या बाहेर जाऊ लागलो. जुन्या दिल्लीत आमचे खेळायचे ठिकाण म्हणजे मोरीगेटच्या बाहेर यमुने पर्यंत पसरलेले विस्तीर्ण बगीचे. मोरीगेटच्या बाहेरच क्रिकेट खेळण्यासाठी एक मोठे मैदान होते. मैदानाच एक भाग स्टीफन कॉलेजचा होता. म्हणून त्या मैदानाला लोक स्टीफन ग्राउंड म्हणून ओळखायचे. सुट्टींच्या दिवसांत २५-३० क्रिकेट टीम मैदानात खेळत असे. एवढ्या भीड-भाड मध्ये कोणत्या क्षणी डोक्स्यावर कुठून चेंडू येऊन लागेल याची कल्पना करणे ही शक्य नव्हते.

ललित लेखनाचा प्रकार

एका दिवसाची कहाणी - सोनेरी किरणे

नांगल ते धौला कुआँ या ५ किमी रस्त्याच्या दोन्ही बाजूला कडू लिंबाची झाडे आहेत. अधिकांश झाडे फार जुनी अर्थात अंग्रेजांच्या काळातील असतील. काल रात्री वादळ आणि पाऊस आला होता. अश्या वादळी पाऊसात जुनी झाडे नेहमीच पडतात. संध्याकाळी कार्यालयातून परतताना, चार्टर बस क्रिबीपेलेसच्या लाल बत्ती वर थांबली. खिडकीतून बाहेर पाहिले रस्त्याच्या बाजूला एक वाळलेले, पोखरलेले झाडाचे खोड पडलेले होते. बहुतेक काल रात्रीच्या वादळात कोलमडून पडले असावे. गेल एकदाच हे ही झाड म्हणत मी हळहळलो. गेल्या ३० वर्षांपसून मी या रस्त्यावरून जात आहे, पूर्वी हे झाड हिरवेगार होते.

ललित लेखनाचा प्रकार

गाथा सागरतळाच्या सफरीची

समुद्राच्या अंतरंगात, सागरतळाशी असलेलं समुद्री जीवांचं व प्रवाळांचं विश्व आणि त्यातलं नाट्य हे किती मती गुंग करणारं आहे! त्या नितांतसुंदर आणि अद्भुत विश्वाची, नुसती पुस्तकी ओळख न होता, त्या विश्वाची अद्भुत सफरही घडली. तिची ही गाथा...

ललित लेखनाचा प्रकार

31 डिसेंबर

Happy New Year"काय मग ह्या वेळी ३१st चा काय प्लॅन ?" मला वाटत हा डिसेंबर मधला सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न असावा. आणि त्याची शेकडो उत्तरे असली तरी "काही नाही जेवून दहा वाजतात गुडूप होऊ " हे उत्तर ०. ०००१ % सुद्धा नसेल हे नक्की. खर ना ?
सध्या सगळ्यांचे ३१ डिसेंबर च्या पार्टीचे प्लॅन्स चालू असतील. सरत्या वर्षाची उजळणी करत नवीन वर्षाच्या स्वागताला सगळी दुनिया सज्ज असते. श्रीमंतांच्या क्रूझ पार्ट्या किंवा सामान्यांच्या सोसायटीच्या गच्चीवर वर केलेल्या पार्ट्या सगळ्यांचा भाव तोच!

ललित लेखनाचा प्रकार

महाराष्ट्राचा निकाल: आकड्यांचे निष्पक्ष विश्लेषण

महाराष्ट्राचा निकाल अनेकांना धक्कादायक वाटत असेल. महाराष्ट्रातल्या गेल्या लोकसभा निवडणूकीचे आकडे तपासले तर सहज लक्षात येते हा निकाल अपेक्षित होता. निवडणूकीचे आकडे तपासल्यावर अनेकांचे भ्रम दूर होतील. या वेळी 66 टक्के मतदान झाले. लोकसभेपेक्षा 4.70 टक्के जास्त मतदान झाले. अल्पसंख्यक समुदाय 90 टक्के मतदान करतो मग मतदान 55 टक्के असो की 65 टक्के. याचा अर्थ वाढलेली 90 टक्के मते बहुजन समाजाची होती. त्यातील 90 टक्के मते महायुतीच्या खात्यात जाणार हे स्पष्ट डोळ्यांनी दिसत होते. दिल्लीत ही 2019 असो की 2024 लोकसभेत विधानसभेपेक्षा 5 टक्केपेक्षा जास्त मतदान जास्त झाले होते.

ललित लेखनाचा प्रकार

समोसे आणि व्हीआयपी समोसा

बिहार मध्ये एक म्हण प्रसिद्ध आहे, " जब तक रहेगा समोसे में आलू, बिहार में रहेगा हमारा लालू". ही आहे समोसेची महत्ता. माझ्या आयुष्याचा सुरवातीचा कालखंड जुन्या दिल्लीत गेला. जुन्या दिल्लीत अनेक बाजारांची नावे त्या बाजारात मिळणार्‍या वस्तूंवर आहे. आम्ही गली तेलियान मधून खाण्याचे तेल विकत घ्यायचो. बतासे वाली गल्लीत साखर, बतासे, गुड, मुरब्बा ते चॉकलेट पर्यन्त गोड पदार्थ मिळायचे. तसेच एका गल्लीचे नाव समोसे वाली गल्ली आहे. या गल्लीत विभिन्न प्रकारचे समोसे मिळतात. त्यात मुगाच्या आणि चण्याच्या डाळीचे समोसे सर्वात जास्त प्रसिद्ध आहेत. हे समोसे काही महीने टिकतात.

ललित लेखनाचा प्रकार