काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १८: १२ सप्टेंबर २०२१

आज जरा गंमतच झाली.

बिकोला दिनेशभाईंना भेटायचं होतं म्हणून तीही आली बरोबर.

आम्ही जरा फोटो-बिटो काढले.

biko

Dinesh

तितक्यात एक मुलगा आला. त्याच्या म्हाताऱ्या आईला फणसवाडीत (चिराबाजार) सोडणार का विचारायला लागला.

मला बिकोला खरंतर उबर पकडून द्यायची होती आणि मग धंदा चालू करायचा होता पण भाडं सोडवेना.

मी त्याला विचारलं पुढे बसून बिको आली तर चालेल का?

तो म्हणाला नो प्रॉब्लेम.

हैद्राबादहाऊसच्या पॉश बिल्डिंगमधून त्याच्या आईला घेतलं.

शुभ्र मऊशार केसांची छान म्हातारी होती.

ग्रॅन्टरोड - ऑपेरा हाऊस - गिरगाव करत ठाकूरद्वारी आलो पण तिकडून फणसवाडीला जाणारा रस्ता मेट्रोमुळे बंद होता.

मग बिकोलाच मॅप लावायला सांगितला.

गिरगावच्या लॅब्रिंथाइन गल्ली-बोळांतून एक टॅक्सीवाला टॅक्सी चालवतोय,

त्याची हॉट बायको शेजारी बसून त्याला गाईड करतेय,

आणि पाठी एक गोड म्हातारी मधनं मधनं चिरचिर करत त्यांची डायरेक्शन्स ओव्हरराईड करतेय

हे दृश्य मी स्वतःच सूक्ष्म देहानी (ते कोणतरी स्वामी की ज्योतिषी सूक्ष्म देहानी मंगळावर जाऊन यायचे तसं) बाहेर जाऊन बघितलं आणि खूप हसलो Smile

बरं तिला सोडल्या सोडल्या लालबागचा दुसरा ड्रॉप मिळाला तोही भाई (माझ्या) बिकोला पुढच्या सीटवर बसू द्यायला तयार झाला.

मागच्या लेखातल्या "काइंडली ऍडजस्ट"चाच हा थोडा वेगळा प्रकार. ( काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १७: २९ ऑगस्ट २०२१ )

मुंबईकर सर्व्हिस मिळत असेल तर दिलखुलासपणे थोडा वळा-वाकायला तयार असतो ते असं.

तिघंही गप्पा मारत त्याला लालबागच्या राजाजवळ सोडला.

फिरत फिरत माटुंग्याला आलो.

आयकॉनिक अंबा-भवनला खायचं होतं.

अंबा-भवन वर डिटेलमध्ये लिहायचंय पण ते बंद होतं सो पुन्हा कधीतरी.

तितक्यात फुलबाजारजवळ शिवडीचं एक कपल मिळालं.

बिको पुढच्या सीटवर कायम म्हणजे साक्षात सुई-धागा पार्ट २ वगैरे Smile
suidhaga

शिवडीला त्यांना सोडून खास मित्र कार्तिकला भेटायला माटुंग्याला आलो.

कार्तिक हाही स्वतंत्र लेखाचा विषय आहे पण तेही पुन्हा कधीतरी.

मग तिघांनी रुईयाजवळ डी. पी. मध्ये बसून खाल्लं आणि माटुंग्याच्या एका शांत सुंदर रस्त्यावर (देवधर रोड) अजून थोडे फोटो काढले.

Matunga1

Matunga2

मग मात्र आम्ही तिघं (फायनली) आपापल्या मार्गानी गेलो.

अजून थोडी काही भाडी एकट्यानी मारली.

छान पाऊसही पडला.

त्याचाही फोटो.
Kosla

पण खरं सांगू का...

खूप उत्साहानी कोसला ठेवलंय खरं ह्या फोटोत आणि ते दिसतंय ही छान.

पण नंतर वाचायला बसल्यावर काही जमलं नाही समहाऊ.

कसं-बसं पांडुरंग सांगवीकरच्या मेसच्या घोळापर्यंत रेटलं पण नंतर काही पुढे गेलो नाही.

त्याच्या मनीविषयी वगैरे खूप ऐकलंय पण तिथे पोचण्याचा पेशन्स माझ्यात नाही हेच खरं.

खूपच पाठच्या काळातलं आहे म्हणून की थोडं असंबद्ध आहे म्हणून कोण जाणे?

असंबद्ध 'हिंदू'ही आहे पण भारी वाचनीय वाटलं. तो ठोकळा जवळ जवळ एका बैठकीत संपवला.

इकडे मात्र...

कदाचित किरण गुरवांच्या 'जुगाड' आणि भीमराज पालकरांच्या 'एटीकेटी' मधलं (दोन्ही फकिंग अप्रतिम पुस्तकं प्लीज वाचा) जास्त समकालीन होस्टेल लाईफ वाचल्यावर हे कोसला सबकॉन्शसली झेपलं नसेल.

असो...

नेमाडेसर सॉरी!

आजची कमाई ३५० रुपये

क्रमश:
आधीचे दुवे:
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: उपोद्घात
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २८ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३१ जानेवारी २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ मार्च २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २०१८
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९ उत्तरार्ध
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ५ व १२ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ फेब्रुवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १८ मार्च २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २४ मार्च ते १२ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २० एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २६ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३० एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ मे आणि २९ मे २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १५ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २२ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट माईलस्टोन: २० जुलै २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २० जुलै ते डिसेंबर पहिला आठवडा २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १ (८ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २ (१५ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ३ (२२ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ४ (२९ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ५ (१९ जानेवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ६ (२६ जानेवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ७ (२ फेब्रुवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ८ (९ फेब्रुवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ९ (२३ फेब्रुवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १० (१ मार्च २०२०)
टॅक्सी दिवस ११: ८ मार्च २०२० (विमेन्स डे)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १२ (१नोव्हेम्बर २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १३ (१५ नोव्हेम्बर २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १४: (३ जानेवारी २०२१)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १५: (१४ फेब्रुवारी २०२१)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १६: २१ फेब्रुवारी २०२१
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १७: २९ ऑगस्ट २०२१

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वाचत होतो पण नंतर छोटे छोटे होत गेल्याने मध्यंतरीचे सोडले होते. हा आणि अगोदरचा वाचला. मजेदार होत आहे. फोटो चांगले देत आहात.
लहानपण झायनलाच गेले आणि आठवण झाली. माझा पहिली ते चौथीतला वर्गमित्र शाळेसमोरच राहायचा. पाडगावकरांच्या शेजारच्या इमारतीत. मित्राचे वडील ट्याक्सीवर होते आणि मित्रही नंतर तेच करू लागला पुढे. सर्व आठवले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आभार!
सायन,कोळीवाडा, प्रतिक्षानगरचं ही एक वेगळंच कल्चर आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0