काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २०: २४ ऑक्टोबर २०२१

आज सकाळी माझा टाइम्स ऑफ इंडियातर्फे टॅक्सीनामा प्रोजेक्टविषयी इंटरव्ह्यू झाला.

Techie Taxiwala

बऱ्याच जणांनी ती लिंक पाहिली आणि प्रेमाने पाठ थोपली, शिवाय आणखी लोकांत आवर्जून पसरवली हे मस्तच.

सगळ्यांचे आभार.

इंटरव्ह्यूमध्ये तसा बराच वेळ गेला.

मग थोडी फार भाडी मारून गाडी उभी करताना हे आमचे मलबार हिलच्या नाक्यावरचे नेहमीचे ड्रायव्हर रमण झा भेटले.

ह्यांच्याशी आज थोड्या गप्पा छाटल्या.

Za

त्यांच्याच टॅक्सीला टेकून हा फोटो काढलाय.

हे टॅक्सीतच झोपतात रात्री.

असे बरेचसे टॅक्सीवाले आहेत मुंबईत ज्यांचं बिऱ्हाड टॅक्सीतच आहे.

त्यांच्या आणि रमण झांच्या आयुष्यात अजिबातच क्लटर नाहीये.

आठवडाभर ते टॅक्सी चालवतात.

प्रातर्विधी सुलभमध्ये पैसे देऊन.

दुपारी बाहेरच काही मिळेल ते खातात.

रात्रीचा त्यांनी डबा लावलाय.

नऊ साडेनऊला गाडीतच जेवण करून ते सीट पाठी करून झोपतात.

मलबार हिलचा हा शांत कोपरा त्यांच्या वर्षानुवर्षं ओळखीचा असल्याने कोणी त्यांना त्रास देत नाही.

आजूबाजूला पॉश बिल्डिंगचे सिक्युरिटी असल्याने त्यांना सुरक्षितही वाटतं.

रविवार थोड्याफार फरकाने असाच.

फक्त रविवारी ते जास्त भाडी शोधत न बसता दुपारी चार-पाच वाजताच गाडी लावून निवांत बसतात किंवा उभे राहतात.

फोनही साधाच आहे त्यांच्याकडे पण त्यांना मनोरंजन, सोशल मिडीया बिडीयाची फारशी गरज वाटत नाही बहुतेक.

जगत रहाणं हेच त्यांचं नेटफ्लिक्स आणि ऍमेझॉन असं म्हणूया हवं तर.

"पण त्यांना काही पैसे, महत्त्वाच्या वस्तू वगैरे ठेवायच्या असतील तर?",

मी विचारलं.

अशावेळी त्यांची एक खोली असते तिकडे बरेच जण आपलं मोजकं महत्वाचं सामान ठेवतात.

हेही खरं तर मुंबईला नवीन नाहीच.

मिल्स बहरात असतानाही कोकण + घाटावरील प्रत्येक गावाच्या गिरणगावी खोल्या असत.

तिकडे दहा एक जण झोपायला असत आणि आणखी दहाएक जणांच्या ट्रंका असत.

तसंच हे.

उगीचच जी. के. ऐनापुरेंचं "रिबोट" आठवलं.

कमोडवर बसून आरामात पेपर वाचता येणं, गरम शॉवर, निवांत बसून टेबलावर करता येणारा ब्रेकफास्ट ह्या गोष्टी आपण बिनदिक्कत गृहीत धरल्या तरी सगळ्यांना ही चैन परवडत नाही .

आणि आपणही ह्या चैनीबद्दल कमीतकमी ग्रेटफुल तरी रहावं हेच बरं.

मला थोडा फ्रान्सिस मकडॉर्मांचा "नोमॅड लँड"ही आठवला.

पण ती तुलना अयोग्यच ठरेल सो क्षमस्व

एकतर तितकं चांगलं (हो तुलनेनी तिकडच्या भटक्यांनासुद्धा चांगलं इन्फ्रा मिळतं) इन्फ्रा रमण झांच्या नशिबी नाहीच

शिवाय रमण झा नोमॅड लँडमधल्या फर्नएवढे कुटुंबापासून अलिप्त अजिबातच नाहीयेत.

इकडे परिस्थितीवशात त्यांचं घर टॅक्सीत असलं तरी गावात त्यांचं आख्खं कुटुंब आहेच.

उत्तर प्रदेशातल्या त्यांच्या गावात त्यांचा हुशार आणि होतकरू मुलगा नुकताच जिल्हा परिषदेची निवडणूक अपक्ष राहून जिंकला.

बाकीच्या नेहमी हमखास निवडून येणाऱ्या नेत्यांनी रडीचा डाव खेळून पुन्हा काउंटिंग करवलं.

पठ्ठ्या त्यातही पुन्हा जिंकला.

पुन्हा काउंटींग करून मात्र त्याला हरवलं गेलं.

हे सगळं रमण झा थोडंसंच कडवट होऊन सांगतात,

आणि पुढच्या निवडणुकांत तो हमखास निवडून येणार हे ही.

भारतीय लोकशाही हे रसायनच काही अजब आहे हेच खरं.

निवडून येवोच रमण झांचा मुलगा.

जय भारत!

जय लोकशाही!!

जय टॅक्सी!!!

आजची कमाई:

१८० रुपये.

क्रमश:
आधीचे दुवे:
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: उपोद्घात
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २८ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३१ जानेवारी २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ मार्च २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २०१८
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९ उत्तरार्ध
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ५ व १२ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ फेब्रुवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १८ मार्च २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २४ मार्च ते १२ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २० एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २६ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३० एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ मे आणि २९ मे २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १५ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २२ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट माईलस्टोन: २० जुलै २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २० जुलै ते डिसेंबर पहिला आठवडा २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १ (८ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २ (१५ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ३ (२२ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ४ (२९ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ५ (१९ जानेवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ६ (२६ जानेवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ७ (२ फेब्रुवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ८ (९ फेब्रुवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ९ (२३ फेब्रुवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १० (१ मार्च २०२०)
टॅक्सी दिवस ११: ८ मार्च २०२० (विमेन्स डे)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १२ (१नोव्हेम्बर २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १३ (१५ नोव्हेम्बर २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १४: (३ जानेवारी २०२१)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १५: (१४ फेब्रुवारी २०२१)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १६: २१ फेब्रुवारी २०२१
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १७: २९ ऑगस्ट २०२१
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १८: १२ सप्टेंबर २०२१
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १९: १९ सप्टेंबर २०२१

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

नील,
सकाळीच लेख पाहिला पण प्रतिक्रिया द्यायला उशीर झाला कारण ती दिलेली टाईम्सची लिंंक लेखाची नव्हती, यूट्यूब विडिओची होती. म्हटलं तो पाहिल्यावरच लिहू. छोटासा विडिओ आवडला.
एकूण तुमचे विचार, कृती आणि छंद आवडला. स्वत: अनुभव घेऊन पाहायची कल्पना अमलात आणणे अवघड असते. ते तुम्ही करता आहात. आवडलं.
ऐसी अक्षरे संस्थळ निवडलंत लेख लिहायला हेसुद्धा विशेष आहे. कारण इथे कुणी सरसकट मत बनवत नाही किंवा पूर्वग्रह ठेवून वाचत नाही. लेख हळूहळू आणि छोटे का येत होते त्याचं कारणही कळल्यावर मग दोन तीन एकदम वाचत होतो.
टाईम्सचेही आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आभार चिमण सर _/\_
>>>>>
ऐसी अक्षरे संस्थळ निवडलंत लेख लिहायला हेसुद्धा विशेष आहे. कारण इथे कुणी सरसकट मत बनवत नाही किंवा पूर्वग्रह ठेवून वाचत नाही
>>>>>
अगदी खरं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0