आरोग्य

डीकोडिंग स्पॅनिश फ्लू (भाग ३)

‘स्पॅनिश फ्लू’. १९१८ साली उद्भवलेल्या या विषाणूने जगात ५ कोटी लोकांचा, तर भारतात १.८० कोटी लोकांचा बळी घेतला. १९५१ नंतर हा विषाणू ‘डीकोड’ करण्याचे प्रयत्न झाले. गाडलेले मृतदेह उकरून त्यातून काही नमुने घेण्यात आले आणि या विषाणूच्या जनुकांचा क्रम शोधता आला. त्यासाठी ८० वर्षं जावी लागली. आता त्याच्याही पुढचा थरारक आणि अतिशय धोकादायक प्रयत्न होणार होता. काय होता हा प्रयोग? लिहिताहेत, राष्ट्रीय पेशीविज्ञान संस्थेतील (NCCS) वरिष्ठ संशोधक डॉ. योगेश शौचे

बखर....कोरोनाची (भाग ५)

इतिहास घडतोय, आपल्यासमोर... वेगाने, इतक्या की गेल्या महिन्यात काय होते हे आपण आज कदाचित विसरणार आहोत. म्हणून या आज घडणारा इतिहास, आपल्याला दिसेल तसा इथे नोंदवत जाऊयात का? बखर वगैरे म्हणजे काय असतं? हेच ना? चला, लिहुयात बखर कोरोनाची!

डीकोडिंग स्पॅनिश फ्लू (भाग २)

‘स्पॅनिश फ्लू’चा विषाणू इतका जहाल कसा बनला, त्याने इतका विध्वंस कसा केला, असे अनेक प्रश्न संशोधकांना भेडसावत होते. त्यातूनच एक अफलातून कल्पना बाहेर आली. ती प्रत्यक्षातसुद्धा उतरली, पण त्यासाठी तब्बल ८० वर्षे उलटावी लागली. काय होती ही कल्पना?
लिहिताहेत, राष्ट्रीय पेशीविज्ञान संस्थेतील (NCCS) वरिष्ठ संशोधक प्रा. योगेश शौचे.

ऑस्ट्रेलियात करोना - एक टाईमलाईन

मूळच्या पुण्याच्या आणि आता सिडनीवासी असलेल्या योगिनी लेले यांनी सूक्ष्मजीवशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे व त्याच क्षेत्रात काम करतात. त्यांच्याकडून मिळालेली एक रोचक टाईमलाईन -

१०० वर्षांपूर्वीच्या 'स्पॅनिश फ्लू'च्या आठवणी

कोरोनाच्या साथीमुळे आपण हतबल आहोत, मग शंभर वर्षांपूर्वीच्या त्या साथीमध्ये आपण काय केलं असतं? कारण त्या साथीमध्ये जगभर ५ कोटी लोक मरण पावले. एकट्या भारतात १ कोटी ८० लाख. ना औषध, ना लस, ना कम्युनिकेशन, ना आरोग्याच्या सुविधा. वर्ष होतं, १९१८ आणि साथ होती, 'स्पॅनिश फ्लू'ची. ही साथ बरंच काही शिकवून जाते. लिहिताहेत, राष्ट्रीय पेशीविज्ञान संस्थेचे (NCCS) वरिष्ठ संशोधक डॉ. योगेश शौचे.

लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर...?

फार थोड्या ठिकाणी नवीन रुग्णांची संख्या सातत्याने कमी होताना दिसते आहे. किंबहुना बहुतेक ठिकाणी लॉकडाऊन शिथिल होणं, आणि रुग्णसंख्या वाढणं हे बरोबरीने होत आहे. देश ‘खुला’ करून आपण व्हायरसच्या आगीत तेल ओतणार आहोत. आपल्याला आवडो न आवडो, हे घडणारच आहे. त्यामुळे धोका कमी कसा करायचा यासंबंधी मार्गदर्शन करायचा इथे प्रयत्न केला आहे.

बखर....कोरोनाची (भाग ४)

आज आपण सर्व एका महत्त्वाच्या 'ट्रान्झिशन टाइम' मध्ये आहोत.

म्हणजे असं, की आत्ता जे घडत आहे ते आपल्या सगळ्यांकरता एका प्रकारचं 'once in a lifetime' घटना आहेत.

माझ्या वडिलांच्या पिढीने कदाचित दुसऱ्या महायुद्धाच्या परिणाम वाचले, बघितले आणि क्वचित भोगले असतील.
आजोबांच्या पिढीने कदाचित प्लेग बघितला असेल त्याचे परिणाम भोगले असतील.

पण अर्थातच हे सर्व जागतिकीकरणपूर्व काळातील आहे.
आणि त्यामुळे मर्यादित भागात परिणाम करणारं.
पण आज जे घडताना दिसतंय ते सर्वदूर आणि दूरगामी परिणाम करणारं आहे असं वाटतंय.

बखर....कोरोनाची (भाग ३)

आज आपण सर्व एका महत्त्वाच्या 'ट्रान्झिशन टाइम' मध्ये आहोत.

म्हणजे असं, की आत्ता जे घडत आहे ते आपल्या सगळ्यांकरता एका प्रकारचं 'once in a lifetime' घटना आहेत.

माझ्या वडिलांच्या पिढीने कदाचित दुसऱ्या महायुद्धाच्या परिणाम वाचले, बघितले आणि क्वचित भोगले असतील.
आजोबांच्या पिढीने कदाचित प्लेग बघितला असेल त्याचे परिणाम भोगले असतील.

पण अर्थातच हे सर्व जागतिकीकरणपूर्व काळातील आहे.
आणि त्यामुळे मर्यादित भागात परिणाम करणारं.
पण आज जे घडताना दिसतंय ते सर्वदूर आणि दूरगामी परिणाम करणारं आहे असं वाटतंय.

व्हेन्टिलेटर्स – त्यामागील विज्ञान आणि गैरसमज

व्हेन्टिलेटर्स या जीव वाचविणाऱ्या यंत्रांबद्दल असलेले अनेक गैरसमज दूर करून, सत्यपरिस्थिती काय आहे हे लोकांसमोर आणणे हे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी हा प्रपंच...
मूळ इंग्रजी लेख डॉ. प्राची साठे (एम.डी., एफ.आर.सी.पी., एफ.सी.सी.सी.एम.) यांच्या ब्लॉगवर ५ एप्रिल २०२० रोजी पोस्ट केला गेला आहे. डॉ. साठे या पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये अतिदक्षता विभागाच्या (आय.सी.यू.) संचालिका आहेत.

माहितीमधल्या टर्म्स: 

करोनाविरुद्ध प्रतिकारशक्ती अशा प्रकारे निर्माण होते

हा व्हायरस आपण दरवाजे खुले केल्याशिवाय आपणहून आपल्या शरीरात प्रवेश करू शकत नाही. आपल्या इम्यून सिस्टिममधलं कोणतं अस्त्र कोव्हिड-१९च्या बाबतीत सर्वश्रेष्ठ आहे? यावर व्हायरॉलॉजिस्ट्स आणि इम्यूनॉलॉजिस्ट्स अहोरात्र काम करत आहेत. मानवाने गेली अनेक दशकं अशा प्रकारचं संशोधन केलं आहे. आतापर्यंतचं उपलब्ध ज्ञान आणि अनेक तज्ज्ञ, आणि दानशूर व्यक्तींनी पुढे केलेले हात, यांच्या जोरावर फार मोठं संशोधन चालू आहे.

टीप : मूळ लेख १० एप्रिलच्या ‘द गार्डियन’मध्ये प्रकाशित झाला होता. त्याच्या लेखिका झानिया स्टामाटाकी व्हायरल इम्यूनॉलॉजिस्ट असून त्या बर्मिंगहॅम विद्यापीठात ज्येष्ठ व्याख्यात्या आणि संशोधिका आहेत.
अनुवाद: डॉ. अजेय हर्डीकर

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

पाने

Subscribe to RSS - आरोग्य